बांबू पश्चिम घाटातील जंगलात सातपुडा तसेच विदर्भातील जंगलात नैसर्गिकरित्या वाढलेला आढळून येतो. परंतु याची लागवड शास्त्रोक्त पद्धतीने करणे जरुरीचे आहे. कारण बांबूस बाजारात चांगली मागणी असून चांगला भाव देखील मिळतो. बांबू हे बहुविध उपयोगी असल्याने शेतकऱ्यांसाठी हे पिक उत्पन्नाचे हुकमी साधन ठरू शकते.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या बच्चे सावर्डेच्या कृष्णाबाई पाटील यांच्याकडे शेती करण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता होती. मुले नोकरीला असल्यामुळे घरची शेती पडून राहात होती. या पडीक जमिनीत जास्त कष्ट न करता कमी मनुष्यबळात येणाऱ्या बांबूची लागवड करण्याचे त्यांनी ठरवले. मग जानेवारी महिन्यात एक एकरांवर १० फूट बाय ४ फूटांवर घन पद्धतीने बांबू लागवड केली. दहा महिन्यात हे बांबू ५ ते १५ फूटांपर्यंत उंच झालेत.
कृष्णाबाईंप्रमाणं कुंभोजच्या शितल कटकळेंनीदेखील २८ जुलैला १ एकरावर १० फूट बाय ४ फूटांवर बांबू लागवड केली. यासाठी त्यांनी उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीची निवड केली. बांबूला नियमित पाण्याची गरज असल्याने त्यांनी बांबूला ठिबक सिंचन केले आहे. यामुळे नियमित खते आणि पाणी देणे सोपं झालेलं आहे. त्या दररोज बांबूंना प्रतिरोप ४ लीटर पाणी देताहेत. अवघ्या चार महिन्यात या बांबूंची तीन ते सहा फुटांपर्यंत वाढ झाली आहे.
बांबू लागवडीसाठी कंद किंवा बियांपासून रोप तयार केली जातात. आता उतिसंवर्धन पद्धतीने बांबू लागवड यशस्वी ठरतेय. कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगल्यातील ग्लोबल कुलिंग फौंडेशन या स्वयंसेवी संस्थेने यासाठी पुढाकार घेतलाय. बिमा बांबूची टिशूकल्चर बांम्बोसा बल्कोवा वाणाची रोपे त्यांनी विक्रीस ठेवली आहेत. बांबू लागवडीसाठी एकरी लाख रुपयांचा खर्च येतो. एक एकरात १ हजार रोपांची लागवड केली जाते. यासाठी प्रतिरोप ३५ ते ५० रुपयांप्रमाणे ३५ ते ५० हजार रुपये खर्च येतो. तर ठिबक, खतं आणि लागवड खर्च मिळून लाख ते सव्वा लाख रुपये लागतात. त्यानंतर सलग तीन वर्षे केवळ खतं, पाणी आणि बांबू तोडणीच्या मजुरीसाठी ३० ते ३५ हजार रुपयांचा खर्च येतो. तीन वर्षानंतर दरवर्षी ३५०० ते ४००० बांबूंचे उत्पादन मिळते. यापासून बांबूच्या सध्याच्या ४० ते ४५ रुपये नगाच्या दरानुसार दीड लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळणार आहे. बांबूपासून १०० वर्षांपर्यंत उत्पादन घेता येणार आहे. विशेष म्हणजे बांम्बोसा बल्कोवा वाणाच्या बांबूला बाजूला फांद्या आणि काटे येत नाहीत. त्यामुळे याचा आर्थिकदृष्ट्या चांगला फायदा होतो.
प्रमुख प्रकार – लांबी व गोलाई यांवरून बांबूचे प्रकार पडले आहेत. ते पुढीलप्रमाणे.
- कळक
- मेज
- चिवा
- चिवारी
- हुडा बांबू
- मोठा बांबू
- पिवळा बांबू
बांबूचे चार भाग पडतात -
- कंद – बांबूच्या खोडाचा काही भाग जमिनीखाली वाढतो त्यास कंद म्हणतात.
- मुळ्या – जमिनीत वाढणाऱ्या कंदास मुळ्या फुटतात.
- बांबू – जमिनीवर वाढणाऱ्या सरळ काष्ठमय खोडस बांबू म्हणतात.
- पाने व फांद्या.
बांबू लागवडीचे प्रकार -
- कंद लावणे.
- कांड्या लावणे.
- बियांपासून रोपे तयार करणे.
लागवडीची पद्धत -
निचरा होणाऱ्या जमिनीत ५ × ५ मी. अंतरावर ६० × ६० से. मी. आकाराचे खड्डे खोदून लागवड करावी.
उपयोग -
बांबू हे गरीबांचे लाकूड म्हणून संबोधले जाते. अन्न, वस्त्र, निवारा आणि उपजीविकीचे साधन अशा अनेक प्रकारे बांबू उपयोगी पडतो.
निचरा होणाऱ्या जमिनीत ५ × ५ मी. अंतरावर ६० × ६० से. मी. आकाराचे खड्डे खोदून लागवड करावी.
उपयोग -
बांबू हे गरीबांचे लाकूड म्हणून संबोधले जाते. अन्न, वस्त्र, निवारा आणि उपजीविकीचे साधन अशा अनेक प्रकारे बांबू उपयोगी पडतो.
- घरबांधणी.
- शेती अवजरांसाठी.
- चटाया, हारे, टोपल्या तयार करण्यासाठी.
- जनावरांना चारा.
- कागदाचा लगदा करण्यासाठी महत्वाचा उपयोग होतो.
उत्पन्न -
प्रतिवर्षी ५००० ते ७५०० रुपये इतके उत्पन्न यापासून मिळते.
प्रतिवर्षी ५००० ते ७५०० रुपये इतके उत्पन्न यापासून मिळते.
->"Bamboo बांबूचे महत्व"