Silk Farming Industry रेशीम शेती उद्योग


देशात रेशीम उद्योग आणि तुती लागवड क्षेत्र वाढत आहे. साठ हजाराहून अधिक खेड्यात हा उद्योग राबविला जातो. विदभार्तही मोठ्या प्रमाणात तुती लागवड क्षेत्र वाढले आहे. रोजगाराची प्रचंड क्षमता असणाऱया या उद्योगाचे ग्रामीण विकासात मोठे योगदान आहे. यशस्वी रेशीम उद्योगासाठी तुतीची शास्त्रीय दृष्टीकोनातून लागवड होणे गरजेचे आहे.

रेशीम उद्योग शेतीवर आधारित असा कुटीरोद्योग आहे या उद्योगातून ग्रामीण भागातील लोकांना तुती लागवड, कीटकसंगोपन व धागानिमिर्तीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतो तर अनेक नगदी पिकांच्या तुलनेत हा उद्योग फायदेशीर आहे. या उद्योगामुळे शहरी संपत्ती सहजपणे ग्रामीण नागरिकांकडे वळली जाते. रेशीम उद्योगातून दिवसेंदिवस आपल्या देशाला मिळणाऱ्या परकीय चलनात वाढ होत आहे. उच्च प्रतिच्या रेशीम धाग्यास जागतिक बाजारपेठेत भरपूर मागणी आहे मागणी लक्षात घेता दुबार (बायव्होल्टाईन  जातीच्या कोषउत्पादनाकडे वळणे अत्यंत गरजेचे आहे. तेंव्हा शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीच्या तंत्राचा वापर करून तुतीची लागवड करणे फायदेशीर ठरेल.


तुती व रेशीम उद्योगाचे यश हे तुतीच्या एकरी उत्पादित होणाऱ्या पानांवर अवलंबून असते. राज्याचे कृषी विषयक हवामान अवलंबून असते आपल्या राज्याचे हवामान. तुतीच्या व   वषर्भर पानांच्या निमिर्तीसाठी पोषक आहे .त्यामुळे तुती वाढीसाठी चांगले वातावरण मिळते

तुती लागवडीबाबत घ्यावयाची काळजी :
तुती लागव़ड वाहनांची वाहतूक जेथे जास्त आहे, अशा रस्त्याच्या कडेने करू नये. कारण पानांवर धूळ मोठ्या प्रमाणात बसल्यास अशी पाने रेशीमकीटकसंगोपनासाठी योग्य ठरत नाही कीटकनाशकांचा वापर ज्या पिकांवर वारंवार करावा लागणार आहे,त्या पिकांच्या जवळ तुती लागवड करू नये, त्यात किमान शंभर मीटर अंतर ठेवावे.


रेशीम शेती-उद्योगातून होणारे फायदे
1. रेशमाच्या अळयांची विष्ठा दुभत्या जनावरांना खाद्य म्हणून वापरता येते. यातून 1 ते दीड लिटर दूध वाढते. 
2. तुतीचा वाळलेला पाला व विष्ठेचा गोबरगॅस मध्ये उपयोग करुन उत्तम प्रकारे गॅस मिळतो. 
3. रेशीम उद्योगापासून देशाला परकीय चलन मिळते व देशाच्या विकासात हातभार लागतो.
4. तुतीची दरवर्षी तळ छाटणी करावी लागते .या छाटणी पासून मिळणारी तुती कोश शासना मार्फत खरेदी केली जातात. त्यामुळे जास्तीचे उत्पन्न प्रतीवर्षी मिळते.
5. तुतीच्या पानांमध्ये जीवनसत्वांचे प्रमाण बरेच आढळते. त्यामुळे तुतीचा पाला व रेशीम कोश प्युपा आर्युवेदीक दश्ष्टया महत्वाचा आहे. 
6. विदेशात तुतीच्या पानांचा चहा मलबेरी टी करतात. शिवाय वाईन करतात.
7. कोश मेलेल्या प्युपाचा आयुर्वेदीक औषधे व सौंदर्य प्रसाधनात उपयोग करता येतो.


SHARE THIS

->"Silk Farming Industry रेशीम शेती उद्योग"

Search engine name