मौलाना आजाद थेट कर्ज योजना

मौलाना आजाद थेट कर्ज योजना ही राज्‍य शासन पुरस्‍कृत योजना असून मौलाना आजाद अल्‍पसंख्‍याक आर्थिक विकास महामंडळ मुंबईच्‍या विद्यमाने राज्‍यातील अल्‍पसंख्‍याक समाजातील आर्थिकदृष्‍ट्या कमकुवत असलेल्‍या वर्गातील बेरोजगारांना स्‍वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्‍ध करुन त्‍यांचा सामाजिक व आर्थिकस्‍तर उंचावण्‍याच्‍या दृष्‍टीने राबविण्‍यांत येत आहे. सदरहू थेट कर्ज योजना ही मौलाना आजाद अल्‍पसंख्‍याक आर्थिक विकास महामंडळाच्‍या भागभांडवलातून राबविण्‍यात येते. या योजनेंतर्गत वयाची 18 वर्ष पूर्ण केलेल्‍या मुस्‍लिम, ख्रिश्‍चन, शीख, बौध्‍द, पारशी आणि जैन समाजातील बेरोजगार उमेदवारांना 5000 रुपयांपासून 50 हजार रुपयांपर्यत कर्ज मंजूर करण्‍यात येते. यापैकी 95 टक्‍के रक्‍कम महामंडळाकडून कर्ज स्‍वरुपात दिली जाते आणि 5 टक्‍के रक्‍कम लाभार्थीनी स्‍वत: उभारावयाची आहे. कर्ज रकमेवर 6 टक्‍के द.सा.द.शे. दराने व्‍याजाची आकरणी केली जाते. कर्जाची परतफेड 5 वर्षाच्‍या कालावधीत 20 त्रैमासिक हप्‍त्‍यात करावयाची आहे. कर्ज मंजुरीचे आदेश प्राप्‍त झाल्‍यानंतर महामंडळाने विहित केलेले वैधानिक दस्‍तावेज व त्रुटींची पूर्तता केल्‍यानंतरच कर्ज मंजूरीचे खातेदेय असलेले धनादेश वितरीत करण्‍यांत येतात.

1)
कर्ज मर्यादा रु. 5 हजार ते 50 हजार पर्यंत 2) स्‍वगुंतवणूक 5 टक्‍के, कर्ज 95 टक्‍के 3) व्‍याजदर (द.सा.द.शे.) 6 टक्‍के 4) परतफेड-5 वर्षाच्‍या कालावधीत 20 त्रैमासिक हफ्त्यात
पात्रता: 1)अर्जदाराचे वय किमान 18 वर्ष पूर्ण असावे (2) अर्जदार हा अल्‍पसंख्‍याक समुदायातील (मुस्‍लिम/ख्रिश्‍चन/शीख/बौध्‍द/पारशी/जैन) असावा (3) अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्‍पन्‍न : शहरी भागाकरिता रु. 65,000/- व ग्रामीण भागाकरिता रु. 50,000/- च्‍या आत असावे (4) अर्जदार हा किमान साक्षर असावा (5) महिला/शारीरिकदृष्‍टया अपंग असलेल्‍या अर्जदारांस प्राधान्‍य देण्‍यांत येईल.
 
मौलाना आजाद थेट कर्ज योजनेसाठी खालीलप्रमाणे दस्‍तऐवज/जोडपत्र जोडणे आवश्‍यक आहे.
1)
मौलाना आजाद थेट कर्जाचा विहित नमुन्‍यातील अर्ज: मौलाना आजाद थेट कर्ज योजनेचा विहीत नमुन्‍यातील परीपूर्ण भरलेला अर्ज दोन प्रतीत अर्जदाराचे अलीकडील पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र व स्‍वाक्षरीसह महामंडळाच्‍या जिल्‍हा कार्य यंत्रणेकडे सादर करावा.
2)
महाराष्‍ट्र राज्‍याचा रहिवासी पुरावा: महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या रहिवासी पुराव्‍याबद्दल शिधापत्रिका, निवडणूक आयोगाचे बहुउपयोगी ओळखपत्र, तहसिल/जिल्‍हा दंडाधिकारी यांनी दिलेले रहिवासी प्रमाणपत्र यापैकी कोणत्‍याही एका दस्‍ताऐवजाचे साक्षांकित छायाचित्र
3)
उत्‍पन्‍नाचे शपथपत्र : कुटुंब प्रमुखाचे वार्षिक उत्‍पन्‍न महामंडळाने ठरवून दिलेल्‍या निकषापेक्षा कमी असल्‍याबाबतचे विहित नमुन्‍यातील स्‍वयंघोषित शपथपत्र रु. 20/- च्‍या मुद्रांकावर (बॉण्‍डपेपर) कुटुंबप्रमुखाच्‍यावतीने मूळ प्रतीत देण्‍यात यावे.
4)
व्‍यवसायाच्‍या जागेचा पुरावा: अर्जदाराचा सद्यस्‍थितीत व्‍यवसाय अस्‍तित्‍वात असेल तर व्‍यवसाय करीत असलेल्‍या जागेचा भाडेकरारनामा/भाडेपत्र तसेच अर्जदार कर्जमंजुरीनंतर प्रस्‍तावित ठिकाणी व्‍यवसाय करणार असेल तर जागा मालकाचे संमतीपत्र मूळ प्रतीत अर्जासोबत सादर करावे. जागा मालकाचे मालकी हक्‍काबद्दलच्‍या पुराव्‍याची (पीआर कार्ड/8–अ चा उतारा/अलीकडील वर्षाचे स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था करपावती (लेटेस्‍ट टॅक्‍स रिसीट) यापैकी कोणतीही एक) साक्षांकीत छायाप्रत जोडावी.
5)
साधारण जामीनदाराचे शपथपत्र: मौलाना आजाद थेट कर्जयोजनेकरिता महामंडळाने विहित केलेल्‍या नमुन्‍यात जामीनदाराच्‍या अलिकडील रंगीत पासपोर्ट आकाराच्‍या छायाचित्रासहित रु. 100/- च्‍या मुद्रांकावर (बॉण्‍ड पेपर) साधारण जामीनदाराचे शपथपत्र मूळ प्रतीत सादर करावे.
6)
मौलाना आजाद थेट कर्ज योजनेस आवश्‍यक असणारे प्रतिज्ञापत्र: मौलाना आजाद थेट कर्ज योजनेकरीता महामंडळाने विहीत केलेल्‍या नमुन्‍यात आवश्‍यक असणारे प्रतिज्ञापत्र नोटरीसह मूळ प्रतीत सादर करावे. सदरील प्रतिज्ञापत्रासाठी कोणत्‍याही प्रकारचे मुद्रांक शुल्‍क आवश्‍यक नाही.
7)
बेबाकी प्रमाणपत्र: महामंडळाने विहित केलेल्‍या नमुन्‍यात खाते असलेल्‍या बॅंकेचे/वित्‍तीय संस्‍थेचे कोणत्‍याही प्रकारचे कर्ज/थकबाकी नसल्‍याबाबत बेबाकी प्रमाणपत्र ( नो डयूज सर्टीफिकेट) तसेच इतर कोणत्‍याही बॅंक/वित्‍तीय संस्‍थेचे कर्ज नसल्‍याबाबतचे सामायिक शपथपत्र मूळ प्रतित देणे आवश्‍यक आहे.

मौलाना आजाद थेट कर्ज योजना अर्जासोबत अधिकृत दरपत्रक, जामीनदाराचे मालमत्‍ताविषयक कागदपत्रे/वेतन प्रमाणपत्र, व्‍यवसाय नोंदणीबाबतचे प्रमाणपत्र, वयाचा दाखला, शिक्षणाचे प्रमाणपत्र व प्राथमिक प्रकल्‍प अहवाल देणे आवश्‍यक नाही. 4) वैधानिक दस्‍तावेज/ जोडपत्र: 

मौलाना आजाद थेट कर्ज योजनेकरीता करारनामा: कर्जदाराने महामंडळास द्यावयाचे हमीपत्र, सर्वसाधारण करारपत्र, जामीनदार करारनामा, श्‍युरीटी बॉन्‍ड (प्रतिभूती बंधपत्र), कर्जदाराची माहिती, प्रॉमेसरी नोट, मनी रिसिप्‍ट, युटीलायझेशन अहवाल, साधारण जामीनदाराची हमीपत्राची सत्‍यप्रत आवश्‍यक आहे. 

महामंडळाचे मुख्य कार्यालयाचा पत्‍ता
मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ मर्यादित, 2 रा मजला, डीडी बिल्डिंग, जुने कस्टम्स हाऊस, शहीद भगतसिंग मार्ग, मुंबई 400023 (दूरध्वनी क्रमांक
022-22672293) 

लेखक : राजेंद्र सरगजिल्‍हा माहिती अधिकारीपरभणी

->"मौलाना आजाद थेट कर्ज योजना"

Post a Comment