कामांची मजूरी व कार्यान्वयन
प्रस्तावित
वा मंजूर आराखडयातील कामांची अंदाजपत्रके यंत्रणा वा ग्रामपंचायतीकडून जिल्हा
कार्यक्रम समन्वयकाने तयार करुन घेणे.
अंदाजपत्रकास
सक्षम तांत्रिक अधिका-याने मंजूरी देणे.
अंदाजपत्रकानुसार
ज्या कामात साहित्य,
कुशल, अर्धकुशल
मजूरी यांचा खर्च 40
टक्क्याहून (साहित्य, साधनसामुग्री इ.) अधिक नसावा.
अकुशल
मजूरीचा भाग किमान 60
टक्के असावा.
कार्यक्रम
अधिका-याने आवश्यकतेनुसार प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांना काम सुरु करण्याचे
आदेश दयावेत.
१. ते देताना वार्षिक आराखडयाच्या किंमतीच्या किमान 50 टक्के खर्चाची कामे ग्रामपंचायतीमार्फत कार्यान्वित करण्याची कायदयात तरतूद.
२.
नवीन काम सुरु करण्यास किमान 10
मजूर आवश्यक, सदर अट डोंगराळ व वनीकरणाच्या कामास
शिथिल.
३.
यंत्रणेने विहीत हजेरीपट ठेवणे.
४.
झालेल्या कामाचे मोजमाप घेऊन दरपत्रकाप्रमाणे
मजुरी हिशोबित करुन हजेरीपट संपल्याच्या दिनांकापासून जास्तीतजास्त 15 दिवसांच्या आत मजूरी पोस्ट वा बँकेत
मजुराच्या खात्यावर
जमा करणे.
५.
कुशल कामे खात्यामार्फत करणे
६.
कामावर कंत्राटदार न नेमणे
७.
मजुरांमार्फत करता येण-या कामांकरिता यंत्राचा वापर न करणे
८.
कामासंदर्भात सर्व माहिती कामावर,
ग्रामपंचायतीमध्ये व वेबसाईटवर उपलब्ध
करणे
९.
कामाच्या अकुशल भागाबाबत आदेशानुसार मजुरीवरील
खर्च एकूण खर्चाच्या 60
टक्के प्रमाणात ठेवावा. 40 टक्के कुशल खर्चामध्ये साहित्य सामुग्री, अर्धकुशल-कुशल मजुरी यांचा समावेश आहे.
->"मनरेगा - महाराष्ट्र : कामांची मजूरी व कार्यान्वयन"