1. प्रस्तावना
2. अभियानांचा उद्देश
-
3. महाराष्ट्र राज्य
ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची वैशिष्टे :-
4. योजनेत समाविष्ट
जिल्हे व तालुके
प्रस्तावना
स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेचे राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानात
(National Rural Livelihoods Mission)
(NRLM) मध्ये
रुपांतर करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. राज्यात स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार
योजना ही राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान या
स्वरुपात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सदर अभियान केंद्र शासन 75% व राज्य शासन 25% पुरस्कृत आहे.
NRLP - केंद्र शासनाने राज्यातील 10 जिल्हयातील 36 तालुक्यांमध्ये जागतिक बँकेच्या कर्ज सहाय्यातुन NRLP हा कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला.
अभियानांचा
उद्देश -
"तळागाळातील गरीबांसाठी मजबूत अशा संस्थांची बांधणी
करुन त्याद्वारे लाभादायक स्वयंरोजगार व कुशल
वेतनी रोजगाराची संधी मिळविणे गरीब कुटुंबांना शक्य व्हावे व त्याद्वारे दारिद्रय कमी करणे, परिणामी कायमस्वरुपी तत्वावर त्यांच्या उपजिविकेत उल्लेखनीय सुधारणा
करणे"
महाराष्ट्र
राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची वैशिष्टे :-
- संवेदनशिल
सहाय्य रचना
- सर्वसमावेशक
सामाजिक सहभाग
- दारिद्रय
रेषेखालील स्वरोजगारींच्या संस्थांचे उन्नतीकरण
- मागणी
आधारित पतपुरवठा
- प्रशिक्षण
व क्षमता बळकटीकरण
- फिरता
निधी
- सर्व
समावेशक आर्थिक अंतर्भाव
- व्याजदरासाठी
अनुदान
- मुलभूत
सुविधा निर्मिती व विपणन सहाय्य
- अन्य योजनांचे एकत्रिकरण व समन्वय
राज्यामधील सर्वात कमी मानवी विकास निर्देशांक असलेल्या (1)ठाणे,(2)रत्नागिरी,(3)नंदूरबार,(4)सोलापूर, (5)जालना, (6)यवतमाळ,(7)उस्मानाबाद,(8)वर्धा,(9)गडचिरोली
(10)गोंदिया या 10 जिल्ह्यातील 36 तालुके प्रथम टप्प्यात निवडून तेथे
राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान
राबविण्यात येणार आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये सदर अभियान पुढील टप्प्यात राबविण्यात येणार
आहे.
योजनेत समाविष्ट जिल्हे व तालुके
या योजनेअंतर्गत खालील 10 जिल्ह्यांमधील 36 तालुक्यांकरिता सदर
योजना NRLP (Intensive) म्हणून राबविण्यात
येणार आहे.
अ.क्र.
|
जिल्हाचे नाव
|
निवडलेल्या तालुक्याचे नाव (NRLP)
|
1
|
ठाणे
|
तलासरी, जव्हार, शहापूर, पालघर, भिवंडी
|
2
|
रत्नागिरी
|
रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा
|
3
|
सोलापूर
|
मोहोळ, सांगोला, माळशिरस, बार्शी
|
4
|
नंदुरबार
|
अक्कलकुवा, शहादा, धडगाव
|
5
|
उस्मानाबाद
|
उस्मानाबाद, तुळजापूर, लोहारा
|
6
|
जालना
|
जालना, भोकरदन, घनसावंगी
|
7
|
यवतमाळ
|
कळंब,घाटंजी, बाभुळगाव, राळेगाव, पांढरकवडा
|
8
|
वर्धा
|
देवळी, वर्धा, सेलू
|
9
|
गोंदिया
|
सालकेसा, अर्जुनी-मोरगाव, तिरोडा
|
10
|
गडचिरोली
|
कुरखेडा, धानोरा, एटापल्ली, अहेरी
|
->"राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना)"
Post a Comment