केंद्र
शासनाच्या सांसद आदर्शग्राम योजनेच्या
धर्तीवर राज्य शासनाने महाराष्ट्रातही आमदार आदर्श ग्रामयोजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत
राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदसदस्यांना
देखील आपल्या मतदारसंघातील तीन ग्रामपंचायतीची निवड करुन त्यांचाआमदार आदर्श ग्राम योजनेत समावेश करता
येईल. राज्य शासनाच्या यामहत्वाकांक्षी
योजनेविषयी थोडक्यात माहिती.
आमदारआदर्श ग्राम योजनेच्या ठळक
वैशिष्ट्यांमध्ये या योजनेची अंमलबजावणीसर्वसाधारणपणे
सांसद आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवरच करण्यात येणार आहे.प्रत्येक आमदारांना त्यांच्या
मतदारसंघातून जुलै 2019 पर्यंत तीनग्रामपंचायती आदर्श ग्राम म्हणून विकसित
करता येतील. आमदार आदर्श ग्रामयोजनेसाठी
आमदारांकडून निवडण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या किमानएक हजार असावी, मात्र आमदारांना आपले स्वत:चे वा आपल्या
पतीचे/पत्नीचे गावनिवडता येणार नाही.
विधानसभा सदस्यांचा मतदारसंघ जर शहरी आणि ग्रामीण भागातविभागला गेला असेल तर ते मतदारसंघाच्या
ग्रामीण भागातून ग्रामपंचायतीचीनिवड करतील. विधानसभा
सदस्यांचा मतदारसंघ जर संपूर्णपणे शहरी असेल तरत्यांच्या सोयीच्या दृष्टीने त्याच
जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीची निवडकरु
शकतील. मुंबई परिसरातील शहरी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे विधासनभासदस्य राज्यातील कोणत्याही
ग्रामपंचायतीची निवड करु शकतील. विधानपरिषदसदस्य
त्यांच्या इच्छेनुसार कोणत्याही जिल्ह्यातून ग्रामपंचायतीची निवड करुशकतील.
आमदारआदर्श ग्राम योजनेत केंद्र व राज्य
शासनाच्या अस्तित्वात असलेल्या विविधयोजनांच्या
कृतिसंगमाद्वारे अंमलबजावणी करण्यात येईल. निवडलेल्याग्रामपंचायतीमध्ये आमदार निधीतून
घेण्यात येणाऱ्या अनुज्ञेय असलेल्याकामासाठी
राज्य शासनाकडून जोड निधी देण्यात येईल, याबाबत मार्गदर्शक
सूचनाशासनस्तरावरुन
स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येत आहेत. भारत सरकारच्या www.saanjh.gov.in या संकेतस्थळाच्या
धर्तीवर आमदार आदर्श योजनेच्याप्रभावी
संनियंत्रणासाठी राज्यस्तरावर वेब पोर्टलची निर्मिती करण्यात येईल.राज्यात या योजनेच्या अंमलबजावणीकरिता
ग्रामविकास विभाग समन्वय विभागम्हणून काम करील. या
योजनेच्या व्यवस्थापनाकरिता येणारा प्रशासकीय खर्चग्रामविकास विभागाच्या राज्य
योजनेतंर्गत उपलब्ध नियतव्ययामधून जास्तीतजास्त
0.5 टक्के मर्यादेमध्ये
भागविण्यात येईल.
आमदारआदर्श ग्राम योजनेंतर्गत प्रामुख्याने
ग्रामस्थांमध्ये उत्तम आरोग्य आणिस्वच्छतेच्या सवयी
विकसित करणे, बालके व महिलांमधील
कुपोषणाविषयी जाणीवजागृती आणि प्रबोधनास
प्राधान्य दिले जाईल. गावकऱ्यांमध्ये व्यसनांचेदुष्परिणाम (दारु, तंबाखू, इ.
सेवन) याबाबत जागृती करुन सुदृढआरोग्याच्यासवयी
विकसित करण्यासही प्राधान्य दिले आहे. सर्वांना किमानदहावी पर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध
करुन देणे. सामाजिक एकोपा वशांतताप्रिय सहजीवन
असणारे ग्रामीण वातावरण तयार होण्यासाठी गावातीलगुन्हेगारी, बेकारी, लिंग
भेदभाव इत्यादी दूर करुन युवक व स्वयंसहाय्यतासमुहांचे ग्रामविकासात योगदान घेणे.
गावाचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी शेतीसंबंधातील
सेवांचा दर्जा उंचावणे, पशुसंवर्धन, पाणलोट विकास, लघु-ग्रामोद्योग व बँक क्षेत्रातील
विविध सेवा-सुविधा उपलब्ध करुन देणे.युवकांना
कौशल्यवृद्धी प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार व स्वयंरोजगारांच्यासंधी उपलब्ध करुन देणे. युवकांमध्ये
ग्रामीण विकासासाठी संघटनात्मककौशल्याची वृद्धी
करणे. गावामध्ये सुसज्ज ग्रामपंचायत भवन, उत्तम दर्जाचेरस्ते, पुर्णवेळ
वीज, अन्य सार्वजनिक
सेवा-सुविधा इंटरनेट सुविधा इत्यादीपायाभूत
सुविधा विकसित करणे. गावाच्या पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड, सार्वजनिक धन कचऱ्याचे व्यवस्थापन तसेच
नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन वसंवर्धन करणे.
निवडलेल्या ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता विषयक विविधकार्यक्रम जसे घनकचरा विल्हेवाट, सेंद्रीय कचऱ्याचे कंपोस्टिंग करुन खतवापरण्याची योजना इत्यादी कार्यक्रम
प्राधान्याने राबविण्याचे ध्येयबाळगण्यात आले आहे.
तसेच संबंधीत ग्रामपंचायतीत सांड पाण्यावर प्रक्रियाकरुन होणारे शुद्ध पाण्याचा फेरवापर
शेतीसाठी करण्यात येईल.
कोल्हापूरजिल्ह्यात आमदार आदर्श ग्राम योजनेची
प्रभावी आणि परिणाम कारक अंमलबजावणीकरण्यासाठी
जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतलाअसून जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय
यंत्रणांना आमदार आदर्श ग्राम योजनेंतर्गतकरावयाच्या
उपाययोजना विषयी सूचित करण्यात आले आहे. आमदारांनी त्यांच्यामतदा संघातील सूचविलेल्या तीन गावांमध्ये
सर्वच प्रशासकीय यंत्रणामार्फतकरावयाच्या विकास
तसेच अन्य कल्याणकारी कामांचा सूक्ष्म कृती आराखडा तयारकरण्यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना
जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी सर्वप्रशासकीय
यंत्रणांच्या प्रमुखांना दिल्या आहेत. जिल्ह्यात आमदार आदर्शग्राम योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुरु
असलेले नियोजन पाहता आमदार आदर्शग्राम योजना
जिल्ह्यात यशस्वी होईल, यात मात्र शंका नाही.
- एस.आर.माने माहिती
अधिकारी, कोल्हापूर. माहिती स्त्रोत :महान्युज

->"आमदार आदर्श ग्राम योजना"
Post a Comment