- यंत्रणेची प्राथमिक माहिती
- ठळक वैशिष्ठये
- भांडवल व कर्जपुरवठा
- शेरा
आयुक्त, महिला व बाल विकास महिला व बाल विकास आयुक्तालय, 3 चर्च रोड, पुणे – 411 001.
दुरध्वनी क्रमांक 020-26126690
ई-मेल : commissionerwcd@vsnl.net
यंत्रणेची प्राथमिक माहिती
यंत्रणेचे नाव : महिला व बाल विकास विभागकोणासाठी :महिला
किमान शैक्षणिक पात्रता :9 वी उतीर्ण
वयोमर्यादा (वर्षे) : कमीत कमी 18
लिंग: महिला
कार्यक्षेत्र : ग्रामीण / शहरी
कौटुंबिक वार्षिक उत्पन्न (ग्रामीण भागासाठी) : आवश्यकता नाही
कौटुंबिक वार्षिक उत्पन्न (शहरी भागासाठी) :आवश्यकता नाही
ठळक वैशिष्ठये
आर्थिकदृष्ट्या मागास व दुर्बल घटकातील महिला व मुलींना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन त्यांना अर्थार्जनाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी महिला प्रशिक्षण केंद्र चालविणा-या स्वयंसेवी महिला मंडळांना / संस्थांना सहाय्यक अनुदान देण्यात येते. 30 महिलांसाठी 6 महिन्यांचे एक प्रशिक्षण सत्र या प्रमाणे प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येतो. यासाठी स्वयंसेवी महिला मंडळांना / स्वयंसेवी संस्थांना अनावर्ती अनुदान रू. 28,500/- व प्रती सत्र आवर्ती अनुदान रू. 21,500/- देण्यात येते. या योजनेखाली संगणक, रेडिओ/टी.व्ही. दुरूस्ती, विजेच्या उपकरणांची दुरूस्ती, टंकलेखन, लघुटंकलेखन, भरतकाम, फलोत्पादन, रेशीम उद्योग, बाहुल्या व खेळणी तयार करणे, कृषीसंबंधी व्यवसाय अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जातात.भांडवल व कर्जपुरवठा
कमाल कर्जमर्यादा: लागू नाहीबँकेचा सहभाग व व्याजदर : लागू नाही
स्वतःचा सहभाग : नाही
यंत्रणेचा सहभाग व व्याजदर : 100%
अनुदान : प्रति लाभार्थी दरमहा रू. 75/- विद्यावेतन
तारण : आवश्यकता नाही
इ. एम. आय. :लागू नाही
परतफेडीची सुरूवात : लागू नाही.
परतफेडीचा कालावधी :लागू नाही.
शेरा
या योजनेचा लाभ आर्थिकदृष्टया मागास कुटुंबातील महिला व मुलींना घेता
येतो. महिला व मुलींना तांत्रिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगारासाठी
प्रवृत्त करणे हे या योजनेचे उद्दीष्ट आहे. प्रशिक्षणासाठी संबंधित
जिल्ह्यांचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
टंकलेखन, लघुलेखन व संगणक प्रशिक्षणासाठी इ. 9 वी पास पात्रता आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असणा-या महिला / मुली या आर्थिकदृष्ट्या
मागास व दुर्बल घटकातील असणे आवश्यक आहे.
->"महिला प्रशिक्षण केंद्रास अनुदान योजना"