युवक मंडळ अनुदान योजना

1.     योजनेची प्राथमिक माहिती
2.     योजनेची ठळक वैशिष्ठये
3.     कर्ज आणि अनुदान
4.     शेरा
ग्रामीण भागात स्थापन झालेल्या नविन युवक, महिला मंडळांना सुरुवातीच्या काळात उभे राहता यावे म्हणून नोंदणीनंतर तीन वर्षाचे आंत व्यवस्थापकीय अनुदानासाठी अर्ज करणा-या मंडळांसाठी केंद्रामार्फत आर्थिक सहाय्य देणेत येते. युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांचेकडील अर्थसहाय्य नेहरु युवा केंद्र संघठन या स्वायत्त संस्थेमार्फत प्रत्येक जिल्हयात युवक मंडळांना देणेत येते. जिल्हयाच्या ठिकाणी ही योजना जिल्हा युवा समन्वयक, नेहरु युवा केंद्र यांचेमार्फत राबविली जाते.


कार्यकारी निदेशक, ईस्ट प्लाझा, आय.जी.आय.स्टेडीयम, नवी दिल्ली – 110002

दुरध्वनी क्रमांक  011-23392521, 23392541 

ई-मेल : nyks@giasdio.1vsnl.in


योजनेची प्राथमिक माहिती
यंत्रणेचे नाव :  नेहरु युवा केंद्र संघठन
कोणासाठी  : युवक मंडळ, महिला मंडळ
किमान शैक्षणिक पात्रता : आवश्यकता नाही
वयोमर्यादा (वर्षे) : 18 ते 35
लिंग : पुरूष / महिला
कार्यक्षेत्र : ग्रामीण / शहरी
कौटुंबिक वार्षिक उत्पन्न (ग्रामीण भागासाठी) : आवश्यकता नाही
कौटुंबिक वार्षिक उत्पन्न (शहरी भागासाठी) : आवश्यकता नाही

योजनेची ठळक वैशिष्ठये
ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य, समाज विकास, युवकांना प्रोत्साहन, प्रेरणा, युवक कौशल्यवाढ, युवकांची सामाजिक, शाररीक व वैचारीक उन्नती करणे या सर्व बाबीसाठी व्यवस्थापकीय अनुदानाची रक्कम खर्च करावयाची आहे.

कर्ज आणि अनुदान
कमाल कर्जमर्यादा : लागू नाही.
बँकेचा सहभाग व व्याजदर : लागू नाही.
स्वतःचा सहभाग : नाही.
यंत्रणेचा सहभाग व व्याजदर : रू. 10,000/- अनुदानाच्या स्वरूपांत.
अनुदान : रू. 10,000/- अनुदान एकदाच दिले जाते.
तारण : लागू नाही.
इ. एम. आय. : लागू नाही.
परतफेडीची सुरूवात : लागू नाही.
परतफेडीचा कालावधी : लागू नाही.

शेरा
रु. 10,000/- व्यवस्थापकीय अनुदान हे रोख अथवा वस्तुच्या स्वरुपात दिले जाते. ज्या संस्थांना नोंदणी होऊन 3 वर्षे पूर्ण झाले आहेत त्या संस्था अनुदानास पात्र आहेत. मा. जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा संयोजन समितीकडून शिफारस झाल्यानंतरच अनुदान मिळते. आदिवासी / ग्रामीण भागातील सामाजिक, आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणा-या युवक मंडळांना रु. 15,000/- अनुदान दिले जाते. प्रथम युवक मंडळांचे ए, बी, सी असे वर्गीकरण करण्यात येते. प्रथम ए ग्रेड प्राप्त करणा-या 5 मंडळांना रोख रू.10000/- एका वित्तीय वर्षात तर बी ग्रेड प्राप्त करणा-या 10 युवक मंडळांना रोख रू.5000/- एका वित्ताय वर्षात याप्रमाणे अनुदान वाटप करण्यात येते.



SHARE THIS

->"युवक मंडळ अनुदान योजना"

Search engine name