यंत्रचलित नौका बांधणी योजना

मत्स्यव्यवसायासाठी यंत्रचलित नौकाचे बांधकाम करुन मत्स्यव्यवसाय करु इच्छिणा-या कार्यालयास या योजनेचा लाभ होतो. मत्स्य व्यवसाय विभागाची ही योजना महाराष्ट्रातील फक्त 6 सागरी जिल्ह्यातच राबविण्यात येते. जिल्ह्याच्या ठिकाणी सहाय्यक मत्स्यव्यवसाय संचालक, मत्स्य व्यवसाय विभाग यांच्यामार्फत ही योजना राबविली जाते.

आयुक्त, मत्स्य व्यवसाय, तारापोरवाला मत्स्यालय, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड, मुंबई – 400 002. 

दुरध्वनी क्रमांक 022-22821622


यंत्रणेचे नाव
मत्स्य व्यवसाय विभाग
कोणासाठी
मच्छिमार सहकारी संस्थेसाठी
किमान शैक्षणिक पात्रता
4 थी उतीर्ण
वयोमर्यादा (वर्षे)
18 ते 35
लिंग
पुरूष / महिला
कार्यक्षेत्र
ग्रामीण / शहरी
कौटुंबिक वार्षिक उत्पन्न (ग्रामीण भागासाठी)
आवश्यकता नाही
कौटुंबिक वार्षिक उत्पन्न (शहरी भागासाठी)
आवश्यकता नाही
ठळक वैशिष्ठये
अनुदानाची रक्कम लाभार्थ्यास नौका बांधणीची कागदपत्रे, तपशिल इत्यादी सर्व बाबीची खात्री केल्यानंतर त्यांच्या बॅंकेच्या खात्यावर जमा करण्यांत येते.
कमाल कर्जमर्यादा
यंत्रचलित नौकेवर अवलंबून
बँकेचा सहभाग व व्याजदर
75% व व्याजदर बॅंक नियमाप्रमाणे
स्वतःचा सहभाग
नाही
यंत्रणेचा सहभाग व व्याजदर
25% अनुदान दिले जाते
अनुदान
25%
तारण
लागू नाही
इ. एम. आय.
बॅंकेच्या नियमानुसार
परतफेडीची सुरूवात
बॅंकेच्या नियमानुसार
परतफेडीचा कालावधी
60 महिने
शेरा
महाराष्ट्रातील 35 जिल्ह्यापैकी फक्त 6 सागरी जिल्ह्यात ही योजना राबविण्यांत येते. नौका बांधणीचा खर्च साधारणपणे शासनाने 1,20,000/- रुपये अपेक्षित धरला असून 75% बॅंक कर्ज व 25% अनुदान असा विभागला आहे

माहिती संकलन  -अमरीन पठाण

SHARE THIS

->"यंत्रचलित नौका बांधणी योजना"

Search engine name