राष्ट्रीय ग्रामस्वराज योजना (RGSY)

1.      योजने बाबत तपशील
2.      ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र
3.      पंचायत राज प्रशिक्षण केंद्र
4.      संयुक्त प्रशिक्षण केंद्र, गारगोटी, जि. कोल्हापूर

योजनेचे स्वरुप : केंद्र पुरस्कृत (केंद्र हिस्सा 75%, राज्य हिस्सा 25%)

योजने बाबत तपशील

पंचायत राज संस्थामधील लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना त्यांचे हक्क कर्तव्य व जबाबदा-या तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी यासाठी राज्य कृती आराखडयांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम ही केंद्र पुरस्कृत योजना (75:25) धर्तीवर यशदा यांच्यामार्फत राबविण्यात येते.
पंचायत राज संस्थातील प्रतिनिधीचा " प्रशिक्षणातून विकास " क्षमता बांधणी कार्यक्रम
1)
ठाणे 2) रायगड 3) रत्नागिरी 4) सिंधुदुर्ग 5) नाशिक 6) जळगांव 7) पुणे 8) सातारा 9) सांगली 10) सोलापूर 11) कोल्हापूर 12) जालना 13) परभणी 14) बीड 15) उस्मानाबाद 16) लातूर 17) बुलढाणा 18) अकोला 19) वाशिम 20) वर्धा 21) नागपूर या जिल्हयामध्ये राष्ट्रीय ग्राम स्वराज योजनेच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम राबवीण्यात येत आहे.
भारतीय राज्यघटनेच्या 73 व्या घटनादुरुस्ती नुसार जिल्हा तालुका ग्रामपातळीवरील पंचायत राज संस्थांना वैधानिक दर्जा दिला आहे. गेल्या 18 वर्षात या कायदयाच्या अंमलबजावणीमुळे लोकांच्या राजकीय सक्षंमतेचा उद्देश मोठया प्रमाणात साध्य झाला आहे. या पंचायत राज संस्थानी ग्रामीण भागात स्थानिक स्वराज संस्था म्हणून कार्य करावे असे अपेक्षित आहे. यासाठी ग्रामीण भागातील विकास कामाचे नियोजन, अंमलबजावणी व संनियंत्रण यासाठी पंचायत राज संस्थांना निधी ,कार्य व कार्यबलाचे (Funds, Functions and Functionaries) व्यवस्थापकीय जबाबदारीचे सक्षमीकरण आवश्यक आहे. यासाठी केंद्र शासनाने 21 जिल्हयामध्ये राष्ट्रीय ग्राम स्वराज योजनेच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
राज्य ग्रामीण विकास संस्था यशदा मार्फत पंचायत राज मधील सदस्यांच्या प्रशिक्षण कामाचे राज्यस्तरावरुन अंमलबजावणी व समन्वय केले जाते. राज्यामधील 11 पंचायत राज प्रशिक्षण केंद्र व 9 ग्रामसेवक प्रशिक्षण व 1 संयुक्त प्रशिक्षण केंद्र तसेच विविध जिल्हयातून निवडक स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षणासाठी उपयोग करण्यात येत आहे.
यशदा, पुणे याच्या स्तरावरून ग्रामपंचायत सदस्यांच्या प्रशिक्षणासाठी वाचनसाहित्य तयार केलेले असून ग्रामसेवक/पंचायत राज संयुक्त प्रशिक्षण केंद्राना तसेच स्वयंसेवी संस्थांना जिल्हा परिषदेमार्फत वितरीत करण्यात येते. अ) माहिती साठी 1800-233-3456 हेल्प लाईन तयार करण्यात आले. ब) ग्राम यशवार्ता हे मासिक प्रति दर महिन्यास प्रत्येक ग्रामपंचायतीना पाठविण्यात येते.

ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र

राज्यात कोबाड हिल ठाणे, गारगोटी, जि. कोल्हापूर, अमरावती, मांजरीफार्म, जि.पुणे, कसबा बावडा, जि. कोल्हापूर, बुलढाणा, परभणी, जालना, सिंदेवाही, जि.चंद्रपूर अशा एकूण 9 ठिकाणी ग्रामसेवक केंद्र कार्यरत आहेत. या केंद्रामार्फत राज्यातील ग्रामसेवक ,ग्रामविकास अधिकारी इ. ना सेवांतर्गत प्रशिक्षण देण्यात येते. या सर्व केंद्राना वेतन व वेतनेतर बाबीसाठी राज्य शासनाकडून दरवर्षी 100 टक्के अनुदान मंजूर करण्यात येते.

पंचायत राज प्रशिक्षण केंद्र

राज्यातील वर्ये जि. सातारा, मुरुड जि. लातूर, खामगाव जि.बुलढाणा, अमरावती, गारगोटी जि. कोल्हापूर, कोसबाड जि.ठाणे, पुसद जि यवतमाळ, खिरोदा जि.जळगांव, मूल जि. चंद्रपूर अशा एकूण 11 ठिकाणी पंचायत राज प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे. यासाठी प्रशिक्षण केंद्रामार्फत ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, इत्यादींना त्यांची दैनंदिन कर्तव्य कार्यक्षमतेने पार पाडण्यात यावीत या उद्देशाने प्रशिक्षण दिले जाते. या केंद्राच्या वेतन व वेतनेतर बाबीसाठी राज्य शासनाकडून दरवर्षी 100% अनुदान मंजूर करण्यात येते.

संयुक्त प्रशिक्षण केंद्र, गारगोटी, जि. कोल्हापूर

पंचायत राज संस्थेतील संबंधीत विस्तार अधिकारी/कक्ष अधिकारी यांना त्यांची दैनंदिन कर्तव्य योग्यरितीने व सक्षमपणे पार पाडण्याच्या उद्देशाने या प्रशिक्षण केंद्रामार्फत प्रशिक्षण दिले जाते.

->"राष्ट्रीय ग्रामस्वराज योजना (RGSY)"

Post a Comment