1.
वारस हक्काचे अनाधिकारी :
हिंदू वारसा कलम 24 अनुसार,
2.
हिंदू वारसा कायदा सुधारणा 2005
3.
हिंदू वारसा (सुधारणा) कायदा
2005
ऍड. लक्ष्मण खिलारी, पुणे
एकाच वेळी एकाच परिस्थितीत मृत पावलेल्या व्यक्तींबाबत गृहीत तत्त्व :
जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती एकाच वेळी, एकाच परिस्थितीत उदा. अपघातात मरण पावल्या असतील व अशा वेळी संपत्तीच्या सर्व प्रयोजनासाठी वयाने लहान व्यक्ती वयाने मोठ्या व्यक्तीच्या मागे हयात राहिली असेल तर -

वारस
हक्काचे अनाधिकारी : हिंदू वारसा कलम 24
अनुसार,
1) कोणत्याही खातेदाराचे विनामृत्युपत्र मुलाची विधवा, विधवा सून वारसाधिकार उत्तराधिकार प्रारंभ होण्याच्या दिवशी पुनर्विवाहित
झाल्यास तिला संपत्तीत हक्क मिळत नाहीत.
2) जी व्यक्ती खातेदाराचा खून करेल किंवा खुनासाठी प्रवृत्त करेल त्या व्यक्तीला कलम 25 अन्वये संपत्तीत हक्क मिळणार नाहीत.
3) धर्मांतरित झालेल्या व्यक्तीस कलम 26 प्रमाणे हिंदू वारसाधिकार मिळत नाहीत.
4) कोणतीही व्याधी, वैगुण्य किंवा व्यंग आहे म्हणून कलम 27 प्रमाणे वारसाधिकार मिळण्यात अपात्र ठरत नाहीत.
5) कलम 30 अन्वये अनौरस संपत्ती सरकारकडे जमा होते.

हिंदू
वारसा कायदा सुधारणा 2005
हिंदू स्त्रीला संपूर्ण वारसा हक्क
मिळावेत म्हणून हा कायदा करण्यात
आला. या कायद्यान्वये मुलींना
मुलांप्रमाणेच वारसाधिकारात को-पार्सनरी
म्हणून स्थान मिळाले आहे. या कायद्याने
हिंदू वारसा कायदा कलम 23 व 24 पूर्णपणे रद्द करण्यात आले आहे. या कायद्याने जन्माद्वारे ज्या
रीतीने पुत्रहक्क असतात,
त्याच रीतीने तिला स्वतःच्या
हक्कांमध्ये जन्माद्वारे को-पार्सनरी होईल. याचाच अर्थ ती मुलगा म्हणून असती तर
जन्माद्वारे जे जे अधिकार मुलास मिळतात,
ते ते सर्व अधिकार तिला मिळाले आहेत.
सदर मिळकतीच्या बाबतीत ज्या जबाबदाऱ्या असतील,
त्या जबाबदाऱ्यांसह ती अधीन असेल. मात्र, 20 डिसेंबर
2004 पूर्वी वाटणी घडून आलेली असल्यास त्या वाटणीस किंवा मृत्युपत्र विनियोगासह झालेल्या हस्तांतरास या कायद्याद्वारे
बाधा येणार नाहीत. याचाच अर्थ वडील जिवंत असताना वाटणी मागण्याचा पूर्ण
अधिकार मुलीला पोचतो. याशिवाय हा कायदा अमलात आल्यानंतर कोणतेही न्यायालय खातेदारांचे पूर्वाधिकाऱ्याने घेतलेल्या थकीत कर्जाच्या वसुलीस मुली
जबाबदार असणार नाहीत.
हिंदू
वारसा (सुधारणा) कायदा 2005
मिताक्षर कायद्याने शासित झालेल्या
हिंदू अविभक्त कुटुंबामध्ये, मुलगी
ही जन्माने कुटुंबाची सहदायाद म्हणजे
को-पार्सनरी राहील. याचा अर्थ असा,
की
अ) जन्माद्वारे पुत्र ज्या रीतीने हक्क जन्माने कुटुंबाचा सहदायाद म्हणजेच को-पार्सनरी असतो, त्याचप्रमाणे कोणताही भेद न करता कन्या को-पार्सनरी राहील.
ब) ती जर पुत्र राहिली असती, तर तिला जे हक्क मिळाले असते, तेच हक्क कन्येला जन्माने मिळतील.
क) पुत्र म्हणून उक्त सहदायता मालमत्तेच्या बाबतीत ज्या जबाबदाऱ्या असतील, त्या जबाबदाऱ्यांसह ती अधीन असेल.
मात्र, 20 डिसेंबर 2004 पूर्वी जर वाटणी घडून आली, तर त्या वाटणीस किंवा मृत्युपत्रीय विनियोगासह कोणत्याही हस्तांतरास या कायद्याने बाधा येणार नाही. याचा अर्थ नोंदणीकृत किंवा कोणत्याही कायद्यातील तरतुदीनुसार अथवा न्यायालयाच्या आदेशांनी झालेली वाटणी, म्हणजेच वाटपात पुत्राला जसा हिस्सा मिळतो तसाच कन्येलाही मिळतो.
वडील जिवंत असताना मुलांप्रमाणे मुलीसुद्धा आता वाटप करून मागू शकतात; तसेच वडिलांनी, आजोबांनी घेतलेल्या कोणत्याही थकीत कर्जाची जबाबदारी कन्येची असणार नाही.

This comment has been removed by a blog administrator.
ReplyDelete