1.
घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे राबविण्यात येणा-या कल्याणकारी योजना
2.
जनश्री विमा योजना
3.
अंत्यविधी सहाय्य
4.
विदेशी भाषा प्रशिक्षण
5.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठामार्फत पदविका व पदवी अभ्यासक्र
6.
नवीन योजना
घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे
राबविण्यात येणा-या कल्याणकारी योजना
सदर अधिनियमाच्या कलम
10 अन्वये
घरेलू कामगारांसाठी
पुढील कल्याणकारी योजनांची तरतूद केलेली आहे.अपघात घडल्यास लाभार्थींना
तात्काळ सहाय्य पुरविणे, लाभार्थींच्या
मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देणे, लाभार्थींच्या
अथवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीच्या आजारावर उपचार करण्यासाठी
वैदयकीय खर्चाची तरतूद करणे, महिला लाभार्थींकरीता
प्रसुती लाभाची तरतूद करणे,
लाभार्थीचा
मृत्यू झाल्यावर कायदेशीर
वारसाला अंत्यविधीच्या खर्चासाठी रक्कम प्रदान करणे.
मंडळातर्फे
देण्यात येणारे लाभ :
जनश्री विमा योजना
- घरेलू कामगारांना जनश्री विमा योजना लागू
झालेली आहे. सदर योजनेअंतर्गत खालील प्रमाणे लाभ दिले जातात.
- जनश्री सदस्याचा नैसर्गिक मृत्यु ओढवल्यास
त्याच्या वारसदारास रु.30000/- देण्यात येते.
- अपघाती मृत्यु ओढवल्यास त्याच्या वारसदारस
रु.75,000/- देण्यात येते.
- अपघातामुळे कायम स्वरुपी संपुर्ण अपंगत्व
ओढवल्यास सदस्यास रु.75,000/- देण्यात येते.
- अपघातामुळे कायमस्वरूपी अशत: अपंगत्व आल्यास
सभासदास रू.37,500/- देण्यात येते.
- याशिवाय सदस्यांच्या मुलांना शिक्षणाकरिता
शिक्षा सहयोग योजने अंतर्गत इयत्ता 9 वी ते 12 वी करिता तसेच आय.टी.आय. चा कोर्स करीत
असल्यास, दरवर्षी उर्त्तीण होत असल्यास, दर तिमाही करिता रु.300/- इतकी रक्कम प्रत्येकी (जास्तीत जास्त दोन मुलांकरिता ) देण्यात
येते.
- भारतीय आयुर्विमा महामंडळामार्फत एका जनश्री
सदस्याचा वारसदारास नैसर्गिक मृत्यूबाबत रू.30000/- रक्कम अदा करण्यात आली आहे.
अंत्यविधी सहाय्य
मृत घरेलू
कामगाराच्या कायदेशिर वारसास अंत्यविधी सहाय्य रु.2,000/- देण्यात
येते. त्यानुसार दोन सदस्यांना रक्कम अदा करण्यात आली आहे. मंडळाच्या दि. 07.08.2013 रोजीच्या
बैठकीत 12 अर्जांना
मान्यता देण्यात आली असुन त्याची एकुण रक्कम रु.24,000/- आहे.
3. कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत घरेलू कामगाराला
व त्यांच्या पाल्यांना शिकावू उमेदवार प्रशिक्षण व मॉड्यूलर एम्प्लॉएबल
स्किम अंतर्गत प्रशिक्षण देण्याचा ठराव करण्यात आलेला आहे. सदर योजना
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे राबविण्यात येणार आहे. तरी
संबंधित कार्यालयाशी पत्रव्यवहार चालू आहे.
घरेलू कामगार
मंडळाच्या दि. 28.09.2012
च्या
बैठकीत घरेलू कामगारांना प्रसुतीलाभ देण्याबाबत ठराव करण्यात आला असून त्याअंतर्गत
घरेलू कामगारास दोन अपत्यापर्यंत प्रत्येक प्रसुतीकरीता रु.5,000/- इतकी
मदत देण्यात येणार आहे.
विदेशी भाषा प्रशिक्षण
महाराष्ट्र कामगार
कल्याण मंडळामार्फत विदेशी भाषा शिकविण्याचे वर्ग घेतले
जातात. नोंदीत घरेलू कामगारांच्या पाल्यांना विदेशी भाषा शिकता यावी यासाठी
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या सहकार्याने त्यांना विदेशी
भाषा शिकण्याची संधी देण्यात येणार आहे व यावर होणारा खर्च घरेलू कामगार
कल्याण मंडळातर्फे करण्यात येणार आहे.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठामार्फत
पदविका व पदवी अभ्यासक्र
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र
मुक्त विद्यापीठामार्फत
घरेलू कामगारांसाठी घरेलू कामगार पदविका अभ्यासक्रम व यशवंतराव
चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत घरेलू कामगारांना व त्यांच्या
मुला-मुलींना पदवी अभ्यासक्रम उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पदविका
अभ्यासक्रमासाठी मंडळातर्फे रु. 900/- व पूर्वतयारी शिक्षणक्रमासाठी रु.
650/- मंडळातर्फे
देण्यात येणार आहे.
नवीन योजना
मंडळाच्या दि. 07.08.2013 रोजीच्या बैठकीत
दि. 01.08.2013 रोजी
55 वर्षे
पूर्ण केलेल्या नोंदित घरेलू कामगारांना सन्मानधन रू. 10,000/- देण्याचा
ठराव करण्यात आलेला आहे.
माहिती संकलन : छाया
निक्रड
->"घरगुती कामगारांसाठी कल्याण योजना"