आधारकार्ड म्हणजे काय ?



केंद्र सरकारने युनिक आयडेंटीफीकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अंतर्गत आधारकार्डची योजना अंमलात आणली. भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीचा विशिष्ट ओळख क्रमांक असावा. या उद्देशाने आधारकार्डची निर्मिती करण्यात आली. त्याला युनिक आयडेंटीफीकेशन नंबर/युआयडी (UID) म्हटले जाते. आधारकार्डवरील क्रमांक १२ अंकी असतो.
आधार कार्डसाठी अर्ज करताना शिधा पत्रिका, जन्माचे प्रमाणपत्र आणि पॅनकार्ड यांच्या छायांकित प्रती (झेरॉक्स) अर्जासोबत जोडाव्या लागतात. आधारकार्ड तयार करण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या बोटांचे ठसे, डोळ्याच्या रेटीनाचे (आयरिश स्कॅन) नमुने घेतले जातात. आधारकार्ड हे आयताकृती असून त्यावर संबंधित व्यक्तीचे छायाचित्र, पत्ता, ओळख क्रमांक, जन्मवर्ष, लिंग यांची महिती समाविष्ट केलेली असते.
‘आधारकार्ड’ हे ओळखपत्र पुरावा आणि रहिवासी पुरावा म्हणून बनवण्यात आले आहे आणि ते सर्व ठिकणी ग्राह्य धरले जाते. आधारकार्ड हे एलपीजी वितरक आणि बँकेशी संलग्न केल्यास तुम्हाला मिळणाऱ्या गॅसवर
सबसिडी (सवलत) मिळते. सबसिडीची रक्कम ही बँकेत हस्तांतरीत केली जाते. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा फायदा तुम्हाला आधारकार्डवर मिळतो. प्रत्येक नागरिकाला ओळख देणारे आधारकार्ड हे प्रत्येकाला महत्वाचे आहे. आधार कार्ड हे ‘सामान्य माणसाचा अधिकार‘ म्हणून ओळखले जाते.


या लेखामधून तुम्हाला आधारकार्डविषयी माहिती, आधारकार्ड बनवण्यासाठी लागणारी कागदपत्रे, सिलेंडर आणि बँकेतील आधारकार्डची नोंदणी व सबसिडी (सवलती), आधारकार्डचा उपयोग, आधारकार्डसाठी ऑनलाइन कार्यपद्धती, आधारकार्ड फायदे, इ. याबाबत माहिती देणार आहोत. त्यासाठी डाव्या बाजूवरील लिंक्सवर क्लिक करा.


Check  Aadhar Card 

SHARE THIS

->"आधारकार्ड म्हणजे काय ?"

Search engine name