प्रत्येक व्यवसायावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. त्यामुळे व्यवसायाला शिस्त-नितीमूल्ये प्राप्त होऊन व्यवसाय नियंत्रणात राहतो.
कोणत्याही व्यवसायाचे आरोग्य हें त्याच्या नफा - तोटा पत्रक आणि ताळेबंद यावरून पहिले जाते. पैसा हें नफा मोजण्याचे परिमाण आहे. पैसा व तो मिळवून देणाऱ्या व्यवसायावर नियंत्रण ठेवण्याला महत्व आले आहे.व्यवस्थापन
कोणताही व्यवसाय हा आज उत्तम व्यवस्थापनाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. किंबहुना व्यवसाय म्हणजेच व्यवस्थापन असते. माणसं, मटेरियल, मशीन्स, मनी आणि मार्केटिंग यांचा व्यवस्थापन म्हणजे व्यवसाय व्यवस्थापन कमीत कमी वेळात जास्तीत जास्त नफा कमवण्यासाठी आणि कमीत कमी साधनातून जास्तीत जास्त आउटपूट काढण्यसाठी व्यवस्थापनशाश्त्राचा वापर केला जातो. उत्तम व्यवस्थापन करून व्यवसायावर नियंत्रण आपण ठेवू शकतो.
नफा-तोटा
कोणत्याही व्यवसायाचा उद्देश हा जास्तीत जास्त नफा मिळवणे हा असतो. रस्त्यावरच्या पण टपरीवाल्यापासून बहु राष्ट्रीय कंपनीच्या संचालाकापर्यंत प्रत्येकाला रोजची उलाढाल, फायद्या-तोट्याचे गणित, गुंतवणुकीचे निर्णय घावे लागतात. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त फायद्याचे गणित आखाव लागते. भांडवलाची उभारणी, मालाचं, माणसाचं व्यवस्थापन, ग्राहकांच समाधान, स्पर्धा यांचा विचार करावा लागतो. काळाप्रमाणे व्यवसायाचे स्वरूप सतत बदलत ठेऊन व्यवसायावर नियंत्रण ठेवता येते.
उद्देश
आपल्या जीवनाचा उद्देश फक्त नफा कमवणे किंवा नफा प्राफ्त करणे नाही. जीवनाचा उद्देशाचा याहून अधिक खोलवर विचार अनेक तत्वज्ञानात केलेला आहे. त्यामुळे आपण कोणताही व्यवसाय करताना त्या व्यवसायाचे भविष्यातील नियोजन योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे.
->"व्यवसायावर नियंत्रण ठेवा"