कुक्कुटपालन

आपल्या कडेच नव्हे तर संपूर्ण भारतात कोंबडी पालन हा शेतीला जोडधंदा म्हणून त्याचप्रमाणे खाजगी क्षेत्रात स्वतंत्र व्यवसाय म्हणून अत्यंत उपयुक्त, असल्यामुळे किफायतशीर ठरलेला आहे.

कुक्कुट पालनाची वैशिष्ट्ये
शेतीला पूरक जोडधंदा म्हणून कुक्कुट पालनाचा व्यवसाय मोठया प्रमाणावर केला जातो.
या धंद्यात गुंतवणूक केलेले भांडवल लवकरच मिळते.
कोंबड्या पासून अंडी, मांस तर मिळतेच त्यचबरोबर कोंबड्यांचे खत शेतीसाठी अतिशय उपयुक्त म्हणून मोठया प्रमाणावर त्याला मागणी असते.
जर मांसल कोंबड्या पाळल्या, तर ह्या धंद्यात नफा दोन महिन्याच्या आतच मिळतो. तसेच गुंतवणूक केलेले भांडवल पुन्हा धंद्यामध्ये गुंतवता येते.

कोंबडी पालनाचा धंदा कसा करावा हे देखील एक शास्त्र आहे. हा धंदा चार प्रकारे सुरु करता येतो. उत्कृष्ट जातीची उबवण्याची अंडी आणावयाची वं ती खुडुक कोंबडी खाली उबवायची. या पद्धतीत पिल्ले वाढवण्याची योग्य माहिती असणे आवश्यक आहे. एक दिवसाची पिल्ले विकत आणावयाची व त्या पिल्लांची योग्य निगा ठेऊन चांगली वाढवायची.
तीन महिन्याच्या मद्या विकत आणावयाच्या व धंदा सुरु करावयाचा.
चौथा मार्ग म्हणजे सरळ अंड्यावर आलेल्या पाच ते सहा महिन्याच्या माद्या खरेदी करावयाच्या. या पद्धतीमध्ये कोंबड्या जातिवंत व अंडी देणाऱ्या आहेत की नाही हे तपासून घेणे गरजेचे असते

कुक्कुट पालन धंद्यातील महत्वाच्या बाबी.
कोंबड्यांच्या सुधारित जाती, त्यांची निवड व पैदास.
कोंबड्यांचे खाद्य.
कोंबड्यांची जोपासना, निगा व घरे
कोंबड्यांचे आरोग्य प्रतिबंधक उपाय व औषधे.
योग्य पद्धतीने व वेळेवर अंड्यांची व मटणाची विक्री.
इतर सर्व गोष्टींचा विचार करणे अत्यंत गरजेचे असते. अशा प्रकारच्या आधुनिक ज्ञानाचे या धंद्यातून जास्तीत जास्त नफा मिळवता येईल.

व्यवस्थापन आणि संगोपन
कुक्कुटपालन हा एक महत्वाचा शेतीपूरक व्यवसाय आहे. जगात कोंबड्यांच्या एकूण ६६ जाती आहेत. त्यापैकी भारतात १८ जाती आढळून येतात. भारत हा अंडी उत्पादन करणारा जगात पाचवा तर मांस उत्पादनात जगात नववा देश आहे. कुक्कुट पालन हा व्यवसाय भूमिहीन मजुरांसाठी दुय्यम उत्पन्नाचा एक महत्वाचा स्त्रोत आहे. कुक्कुट पालनाचा व्यवसाय पारंपारिक तसेच व्यावसाईक अशा दोन्हीही पद्धतीने करता येतो.

खाद्य व्यवस्थापन
संतुलित खाद्य, रोग प्रतिबंधात्मक उपाय व शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन या तीन सूत्रांच्या आधारे कोंबड्यांच्या वयोगटानुसार त्यांच्या व्यवस्थापनाचे तीन टप्पे पडतात.
लहान पिलांची निगा राखणे (एका दिवसापासून सहा आठवड्यांपर्यंत) - या प्रक्रियेला बृडींग असे म्हणतात. या दरम्यान ‘चीकमेश’ प्रकारचे खाद्य पिलांस दिले जाते. त्यात २२ टक्के प्रथिने तर ३.४ टक्के स्निग्ध पदार्थांचे प्रमाण असते.

६ आठवड्यांपासून २० आठवड्यांपर्यंतची निगा - या कालावधीत शरीर वाढीसाठी ‘ग्रोअर मेश’ प्रकारचे खाद्य कोंबडीस दिले जाते.त्यात १६ टक्के प्रथिने तर ३.४ टक्के स्निग्ध घटक असतात.
२१ ते ७२ आठवड्यां दरम्यान निगा – २० आठवड्यांनंतर कोंबडी अंड्यावर आल्यानंतर तिला ‘ लेअर मेश’ प्रकारचे खाद्य दिले जाते. त्यात १८ टक्के प्रथिने व ३.४ टक्के स्निग्ध पदार्थ असतात.
कोंबड्यांच्या वयाच्या वेगवेगळ्या लसी त्या त्या वेळी देणे गरजेचे असते. त्यामध्ये मेरेक्स, लासोटा, गंबोरी, राणीखेत इ लसींचा समावेश होतो. त्याचप्रमाणे अंडी देणा-या कोंबड्यासाठी चोची कापणे व रोग प्रतिकारक लस टोचणे हे ही तितकेच महत्वाचे असते.

कोंबड्यांचे आजार आणि त्यावरील उपचार
कोंबडीच्या वाढीबरोबर त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे तितकेच महत्वाचे ठरते. योग्य वेळी योग्य उपचार झाले नाहीत तर त्याचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. आहार, स्वच्छता, रोगनिदान आणि उपचार या गोष्टींना या व्यवसायात अनन्य साधारण महत्व असते.

कोंबड्यांना खालीलप्रमाणे आजार होतात.
जीवाणू जन्य – कॉलरा, तुरा निळा होणे इ.
विषाणू जन्य – राणीखेत (मानमोडी), गंबोरी (रोग प्रतिकारक शक्ती नष्ट होणे), मेरेक्स (पिल्ले पांगळी होणे)
आदिजीवजन्य – कॉक्सीडीओसीस (रक्ताची हगवण)
भारत सरकारने देशातील शेतक-यांना कुक्कुटपालन विषयक सेवा एक खिडकी तत्वावर उपलब्ध करून देण्यासाठी चार ठिकाणी केंद्रीय पोल्ट्री विकास संस्था (Central Poultry Development Organization) स्थापन केलेल्या आहेत. त्या चंदीगड, भुवनेश्वर, मुंबई, आणि हेसरघट्टा येथे आहेत.भारत सरकारने ५ कुक्कुटपालन फार्मस (Poultry Farms) स्थापन केले आहेत. बेंगलोर, मुंबई, भुवनेश्वर, दिल्ली व सिमला या ठिकाणी ते फार्मस आहेत. या ठिकाणी जातीवंत कोंबड्या संकरीत करून वितरीत केल्या जातात.
कोंबड्यांच्या संशोधना बद्दलचे केंद्रीय एव्हीयन संशोधन हे केंद्र ( Central Avian Research Centre) उत्तरप्रदेशात इज्जत नगर येथे स्थापन करण्यात आले आहे.२००९ ते २०१० मध्ये सरकारने केंद्र पुरस्कृत पोल्ट्री विकास योजना (Poultry Development Schemes) नावाची योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण परसदार (पारंपारिक) कुक्कुट विकास (Rural Backyard Poultry) नावाची उपयोजना सुध्दा सुरु केली आहे.