सागरी मत्स्यव्यवसाय मच्छिमार युवकांना प्रशिक्षण ६ महिन्याचा Marine Fisheries 6 months training for young fishermen


मच्छिमार युवकांना प्रशिक्षण
अ) सागरी मत्स्यव्यवसाय ६ महिन्याचा प्रशिक्षण कार्यक्रम :- नौकांचे यांत्रिकीकरणाद्वारे प्रगत मच्छिमारी तंत्राचा अवलंब करून सागरी मत्स्योत्पादन कसे वाढवावे याचे मच्छिमार युवकांना सर्वांगिण प्रशिक्षण देण्याचे उद्देशाने महाराष्ट शासनाने सातपाटी व वसई (ठाणे), वर्सोवा (मुंबई), आलिबाग (रायगड), रत्नागिरी (रत्नागिरी) व मालवण (सिंधुदूर्ग) येथे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रे स्थापन केली आहेत. या केंन्द्रात सागरी मत्सव्यवसाय नौकानयन, सागरीमासेमारीपध्दती, नौका इंजिनाची देखभाल व परिरक्षण इ. बाबतचे प्रशिक्षण देण्यात येते.
  • प्रशिक्षण कालावधी - ६ महिने.
  • प्रशिक्षण सत्रे - २ सत्रे (१ जानेवारी ते ३० जुन व १ जुलै ते ३१ डिसेंबर).
  • प्रशिक्षणार्थी क्षमता - २२ प्रशिक्षणार्थी प्रति सत्र प्रशिक्षणार्थी
  • प्रशिक्षणार्थी शुल्क - दारिद्रय रेषेखालील प्रशिक्षणार्थीस दरमहा रू. १००/- दारिद्रय रेषेवरील प्रशिक्षणार्थीस दरमहा रू. ४५०/-
पात्रता -
  • प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छिमार असावा.
  • प्रशिक्षणार्थीस मासेमारीचा किमान वर्षाचा अनुभव असावा.
  • प्रशिक्षणार्थी १८ ते ३५ वयोगटातील असावा.
  • प्रशिक्षणार्थीने शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे आवश्यक.
  • प्रशिक्षणार्थी किमान ४ थी पास असावा व लिहिता वाचता येणे आवश्यक.
  • प्रशिक्षणार्थीस पोहता येणे आवश्यक.
  • प्रशिक्षणार्थीस मच्छिमार सहकारी संस्थेची शिफारस आवश्यक.
ब) प्रशिक्षण शुल्क आकारून घेण्यात येणारे प्रशिक्षणक्रम. (लघु प्रशिक्षण कार्यक्रम) :- कृषि व पदुम विभागाचा शासन निर्णय क्र. मत्स्यआ/२००२/प्र.क्र.१०/पदुम-१२, दि. ३०.३.२००२ नुसार ९ विविध मत्स्यव्यवसाय लघुप्रशिक्षण विभागामार्फत राबविण्यात येतात. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे. ठिकाण, प्रशिक्षण शुल्क प्रशिक्षण कालावधी या बाबतची माहिती खालील प्रमाणे आहे.


प्रशिक्षण
कालावधी दिवस
शुल्क रू.
प्रशिक्षार्थी क्षमता
सत्रे
ठिकाण
मरिन डिझेल इंजिन व त्याची देखभाल
३०
७५०/-
२५
सागरी प्रशिक्षण केंन्द्र
नौकानयन शास्त
३०
,०००/-
२५
सागरी प्रशिक्षण केंन्द्र
सार्वजनिक मत्स्यालय व्यवस्थापन
१५
,०००/-
२०
तारापोरवाला मत्स्यालय,मुंबई
मासेमारी नौकांवर संदेशवहन मत्स्यशोधन उपकरणांचा उपयोग
५००/-
२५
मच्छिमार सहसंस्था
गोडया पाण्यातील मिश्र मत्स्यशेती
१०
,०००/-
२०
शासकीय म.बी.केंन्द्र
गोडया पाण्यातील कोळंबी संवर्धन
१०
,०००/-
२०
शासकीय म.बी.केंन्द्र
प्रमुख कार्प मत्स्यबीज उत्पादन
१५
,०००/-
२०
शासकीय म.बी.केंन्द्र
जिताडा व तिलापिया
१०
,०००/-
२०
शासकीय म.बी.केंन्द्र
शोभिवंत मत्स्यालयाचे व्यवस्थापन
२५०/-
१५
तारापोरवाला मत्स्यालय,मुंबई

SHARE THIS

->"सागरी मत्स्यव्यवसाय मच्छिमार युवकांना प्रशिक्षण ६ महिन्याचा Marine Fisheries 6 months training for young fishermen"

Search engine name