शेत जमीनीची मोजणी

शेती विषयक माहिती » शेत जमीनीची मोजणी

शेत जमीनीची मोजणी व त्या आधारे येणारी जमीनीची निश्चित मोजमापे ही शेतकर्‍यांच्या ञ्ृष्टीने अतिशय महत्वाची आहेत. स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटीश सरकारने संपूर्ण भारताचा टोपोग्राफीकल सर्व्हे केला. त्यामुळे देशातील पर्वत, नदया, नाले, दर्‍या यांची समुद्रसपाटीपासून किती उंची आहे हे नकाशाद्बारे समजू शकले. त्यानंतर प्रत्येक गावाच्या जमीनी मोजून त्या जमीनीचे क्षेत्र एकत्र गावाच्या क्षेत्राशी मेळ घालून व बरोबर असल्याची खात्री करुन घेण्यांत आली. उदा. एका गावाचे क्षेत्र जर 745.02 हेक्टर एवढे येत असेल तर अशा क्षेत्राची फोड गावठाण, गायरान, नदया, नाले, रस्ते व शेतजमीनी अशा पध्दतीने करुन ते सर्व क्षेत्र पुन्हा 745.02 हेक्टर एवढे आहे किंवा नाही याची खात्री करण्यांत आली. एवढेच नाही तर अशा पध्दतीने ज्या शेतजमीनी मोजण्यांत आल्या, त्या प्रत्येक शेतजमीनीला एक क्रमांक देण्यांत आला. हा पहिल्यांदा देण्यांत आलेला क्रमांक म्हणजेच सर्व्हे नंबर होय. शिवाय शेतजमीनीची हलकी, भारी, ही प्रतवारी लक्षात घेऊन जमीनीवर आकारसुध्दा बसविण्यांत आला. वरील पध्दतीने एकदा संपूर्ण गावाची मोजणी झाली व त्याचे क्षेत्र जुळल्यानंतर गावचा नकाशा तयार करण्यांत आला. गावाच्या नकाशामधे सर्व्हे नंबर, रस्ते, गावाची शीव, नदया,नाले इत्यादी दाखविण्यांत आले. प्रत्येक जमीनीची शंखू साखळीच्या आधारे जी मोजमापे घेतली आहेत त्या मोजमापाच्या आधारे मूळ रेकॉर्ड जिल्हयाच्या कचेरीत कायम स्वरुपी जतन करण्यांत आले. आजही जमीनीची मोजणी करतांना या मूळ रेकॉर्डमधील नकाशा व मोजमापे यांचा विचार करुन व त्याच्याशी तुलना करुनच जमीन मोजली जाते. ज्या गावामध्ये एकत्रीकरण योजना अंमलात आली अशा गावामध्ये सर्व्हे नंबर ऐवजी एकत्रीकरणानंतर त्यास गट नंबर असे संबोधले गेले. त्याुळेच 7/12 वर भूमापन क्रमांक या सदराखाली जो क्रमांक लिहीला असतो तो एकतर सर्व्हे नंबर किंवा गट क्रमांक असतो.

जमीनीच्या मोजणीची आवश्यकता :
शेतकर्‍याच्या ञ्ृष्टीने शेत जमीनीच्या मोजणीची गरज, खालील वेगवेगळया कारणामुळे आवश्यक असते.
1. जेवढी जमीन आपल्या मालकीची आहे तेवढी सर्व जमीन आपल्या ताब्यात आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी.
2. वडीलोपार्जित जमीनीमध्ये वारसाने किंवा वाटपाने किंवा विक्रीमुळे हिस्से पडले असतील तर आपल्या वाटयाला आलेली जमीन ही रेकॉर्डप्रमाणे प्रत्यक्षात ताब्यात आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी.
3. वाटण्या झाल्या नसल्या तरी प्रत्यक्षात वहिवाटीप्रमाणे जे हिस्से असतात ते योग्य प्रमाणात आहेत किंवा नाहीत हे पाहण्यासाठी.
4. एखादी जमीन नवीन खरेदी केल्यास किंवा विक्री केल्यास खरेदी खताप्रमाणे निश्चित क्षेत्र काढण्यासाठी.
5. खातेफोड करुन जमीनीचे वाटप करीत असतांना सर्व हिस्सेदारांना समान प्रमाणात जमीन येण्यासाठी.
6. बांधावरील झाडे, विहीरी घरे ही नेमकी कोणत्या हद्दीत आहेत हे समजण्यासाठी.
7. काही जमीनी बिगर शेती करुन घेण्यासाठी किंवा बिगर शेती होणारी जमीन व शेतीची जमीन यांची स्वतंत्रपणे बांध निश्चित होण्यासाठी.
8. वहिवाटीमध्ये बदल झाला असेल किंवा बांध सरकले असतील तर निश्चित क्षेत्र निदर्शनास येण्यासाठी.
9. अतिक्रमण केले असल्यास किती क्षेत्रावर अतिक्रमण आहे हे निश्चित करण्यासाठी.
10. गावाची शीव, गायरान, पाणंद, रस्ते, स्मशानभूमी इत्यादी सार्वजनिक ठिकाणावर अतिक्रमण झाले असल्यास.
  • जमीन मोजणीचा अर्ज :

  • शेतजमीनीची मोजणी - मोजणी कशी करतात ?
  •  मोजणीनंतरची कार्यवाही : 

  • निमताना मोजणी अर्ज :
  •  
  • मोजणीनंतरचे प्रश्न : 

  • पोट हिश्श्यांची मोजणी :  

  • जमीनीची मोजणी :

  • नव्या उप विभागाचे क्रमांक :

  • कमाल जमीन मर्यादा : 

  • पुढील कार्यवाही :

निमताना मोजणी अर्ज :

->"शेत जमीनीची मोजणी"

Post a Comment