च्‌कीच्या नोंदी व त्यांची दुरुस्ती

शेती विषयक माहिती » च्‌कीच्या नोंदी व त्यांची दुरुस्ती.

तलाठयाचीकर्तव्ये दक्षता
(1) 1 ऑगस्ट रोजी नवीन महसूली वर्ष सुरु होते. वर्षाच्या प्रारंभी तलाठयाने ठेवावयाच्या सर्व नोंदवहया तहसिलदार यांचेकडून पृष्ठांकित व सांक्षांकित करुन घेतल्या पाहिजेत. त्यामुळे 30 जुलै, पूर्वी प्रत्येक वर्षाचा जमीन महसूल पूर्णपणे वसूल करुन त्याचा वार्षिक हिशोब (जमाबंदी) केला पाहिजे.
(1) याचा अर्थ शेतकर्‍यांनी त्यांच्या जमीनीचा महसूल तसेच जि.प. व ग्रा.पं. सेस वेळेवर भरला पाहिजे. विशेषत: खरीप गावांच्याबाबत पीके निघाल्यानंतर परंतू सर्वसाधारण डिसेंबरच्या आंत व रब्बी गावाच्या बाबत मार्च, एप्रिल महिन्यापर्यंत जमीन महसूल भरण्याची व त्याची पावती प्राप्त करुन घेऊन स्वत:च्या फाईलला लावण्याची दक्षता घेतली पाहिजे.

(2) खरीप पीक पाहणी 15 ऑक्टोबर पर्यंत तर रब्बीची पीक पाहणी 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण करणे.
(2) ज्या जमीन मालकांना आपल्या चालू वर्षाच्या पीक पाहणीच्या नोंदीसंबंधी काही शंका असेल तर अशा शेतकर्‍यांनी, ऑक्टोबर/डिसेंबर महिन्यात दक्षता बाळगून 7/12 उतारे प्राप्त करुन घेतले पाहिजेत. तसेच जो शेतकरी कायदेशिररित्या दुसर्‍याची जमीन कसतो, अशा व्यक्तींना वहिवाटदार सदरी आपले नांव लावण्यासाठी या पीक पाहणीच्या कालावधीतच अर्ज करणे आवश्यक आहे. या कालावधीत एकदा पीक पाहणी झाल्यानंतर 2-3 महिन्यानंतर एखाद्या व्यक्तीने जमीन खरेदी केली तर खरेदीखताप्रमाणे कब्जेदार सदरी नोंद होऊ शकेल. परंतू वहिवाटदार सदरी मात्र पुढील वर्षी त्याची नोंद होईल ही बाब विचारात घेतली पाहिजे.

(3) आवश्यक ते पीक कापणी प्रयोग करणे व पैसेवारीसाठी मंडळ अधिकारी यांना मदत करणे.
(3) पैसेवारीबाबत, गाव पातळीवर मंडळ अधिकारी, तलाठी, सरपंच ग्रामसेवक यांची एक समिती असते. दुष्काळी परिस्थितीत आपल्या गावची पैसेवारी किती आहे हे या स्थानिक समितीद्बारे ठरविले जाते. त्यामुळे त्याची महिती गावीच शेतकर्‍याला मिळू शकेल.

(4) दरवर्षी डिसेंबर अखेरीस गाव नमुना 8- म्हणजेच प्रत्येक खातेदाराच्या खात्यावर कोणत्या गटातील, किती जमीन आहे हे दर्शविणारी नोंदवही अद्यावत करणे, त्यावरुन 8-ब म्हणजेच जमीन महसूलाच्या मागणीचे रजिष्टर अद्यावत करणे.
(4) गावात नव्याने निर्माण झालेल्या खातेदाराच्या बाबतीत, 8-अ चा खाते उतारा वेळेवर प्राप्त करुन घेतला पाहिजे. नव्याने जमीन खरेदी केली असल्यास मूळ 8-अ मध्ये योग्य तो बदल झाल्याची शेतकर्‍याने खात्री करावी.

(5) सर्व जमीन महसूल 31 जुलै पूर्वी वसूल करणे.
(5) वर नमूद केल्याप्रमाणे जमीन महसूल वेळेत भरण्याची दक्षता घेता येईल.

(6) जमीन महसूलाच्या रकमेच्या विहित पावत्या देणे, कॅशबुक अद्यावत ठेवणे, ही रक्कम वेळेत कोषागारात जमा करणे.
(6) जमीन महसूल व इतर अनुषंगिक महसूलाबाबत तलाठयाने पावत्या देणे बंधनकारक आहे व प्रत्येक शेतकर्‍यांनी पावती मागितली पाहिजे. वर्षनिहाय जमीन महसूलाच्या पावत्या एका फाईलला लावल्या पाहिजेत.

(7) गावातील सीमा चिन्हे, किंवा भूमापन चिन्हे, म्हणजेच मोजणीचे दगड व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करणे.
(7) शेजारच्या शेतकर्‍याने मोजणीचा दगड हलविला किंवा काढून टाकला तर मंडळ अधिकारी किंवा तलाठी यांना ताबडतोब लेखी अर्ज देता येईल.

(8) गावातील अन्य खातेदाराने नव्याने हक्क संपादन केल्यास, त्याबाबतचा अर्ज स्वीकारणे, फेरफार नोंदवहीमध्ये नोंद करणे.
(8) कोणत्याही खातेदाराने, वारसाने, विभागणीने, खरेदीने, गहाण, पट्टयाने, कूळ म्हणून किंवा अन्य कोणत्याही रितीने एखाद्या जमीनीमध्ये हक्क संपादन केला तर असा हक्क संपादन केल्याच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आंत तलाठयास कळविले पाहिजे व अर्ज दिला पाहिजे. त्यामुळे संबंधितांच्या हक्काची नोंद होऊन हक्क संरक्षण होऊ शकेल.

(9) वरिष्ठ अधिकार्‍यांनी वेळोवेळी दिलेले आदेश, हुकूमाप्रमाणे रेकॉर्डमध्ये दुरुस्ती करण्यासाठी नोंद करणे. 
(9) जर वरिष्ठांनी अपीलामध्ये किंवा अन्य प्रकरणी एखाद्या खातेदारासारखा निकाल दिला तर त्याची अंमलबजावणी विहित वेळेत करण्याचे बंधन तलाठयावर आहे. अशी कार्यवाही न झाल्यास पुन्हा संबंधीत अधिकार्‍यांकडे दाद मागता येईल.

(10) अशा नोंदीवर कोणी आक्षेप घेतल्यास किंवा त्याबाबत तक्रार केल्यास तक्रार नोंदवहीत नोंद घेऊन मंडळ अधिकारी यांचेकडे कागदपत्रे सूपुर्त करणे.
(10) एखाद्या हितसंबंधीत व्यक्तीने किंवा संबंधित नसलेल्या व्यक्तीने सुध्दा तुमच्या नोंदीस हरकत घेतली तर त्याची कागदपत्रे मंडळ अधिकारी यांचेकडे पाठविली जातात. मंडळ अधिकारी हे संबंधीतांना नोटीस देऊन व हरकतीचे स्वरुप विचारात घेऊन, कायदेशीर तरतूदी तपासून आदेश करतात. अशावेळी तक्रार नोंद असतांना तक्रारीकडे दुर्लक्ष करुन परस्पर नोंद प्रमाणित करण्याचा आग्रह तलाठयाकडे धरण्यामध्ये काहीही अर्थ नाही.

(11) गावातील सर्व अतिक्रमणाची नोंद विहित नोंदवहीत करणे.
(11) सार्वजनिक मिळकतीवर कोणी अतिक्रमण केल्यास त्याची नोंद घेण्यास आपण तलाठयाला भाग पाडू शकाल.

(12) जमीन मालक सोडून दुसरी व्यक्ती जमीनीची वहिवाट करीत असल्यास, दावा करीत असेल तर नमुना नं. 14 मध्ये माहिती भरुन पीक पाहणीच्या कालावधीनंतर लगेचच तहसिलदार यांना एकत्रितरित्या सर्व प्रकरणे सादर करणे.
(12) पीक पाहणीच्या काळात, जमीन मालक सोडून, दुसर्‍या कोणाचेही नांव वहिवाटदार सदरी थेट दाखल करण्याचे अधिकार तलाठयांना नाहीत. त्यामुळे जमीन मालक सोडून अन्य व्यक्ती वहिवाटीचा दावा करीत असेल तर फक्त अहवाल पाठविण्याची जबाबदारी गाव कामगार तलाठयाची आहे. त्यानंतर रितसर चौकशी करुन वहिवाटदार सदरी कोणाचे नांव लावावे याचा आदेश तहसलिदार यांच्याकडूनच दिला जाते.

(13) पीक पहाणीच्या काळात, शेतातील पीके व त्यांचे क्षेत्र तसेच झाडे यांची नोंद 7/12 वर करणे.
(13) आपल्या शेतात किती क्षेत्रावर आपण कोणते पीक घेतले आहे व त्याची अचूकपणे 7/12 वर नोंद झाली आहे काय? याची खात्री प्रत्येक शेतकर्‍याने केली पाहजे. तसेच फळझाडांच्या नोंदीदेखील 7/12 वर करुन घेतल्या पाहिजेत.

(14) वेळोवेळी वरिष्ठांकडून प्रसिध्दीसाठी येणार्‍या नोटीसा, आदेश व सूचना यांना प्रसिध्दी देणे.
(14) एखाद्या महत्वाच्या विषयासंबंधीची चर्चा गावामध्ये असेल त्यावेळी शेतकर्‍यांनी त्या विषयासंबंधीची माहिती, गावी करण्यांत आलेले प्रसिध्दीकरण वाचून घेतली पाहिजे. उदा. मतदार यादीवर जर हरकती मागविल्या असतील तर आपल्या घरातील सर्वांची नांवे नोदवली आहेत काय? हे बघणे शेतकर्‍यांच्या हिताचे आहे.

(15) नवीन शर्तीच्या जमीनीचे हस्तांतरण झालेले आढळल्यास त्याचा अहवाल तहसिलदार यांचेकडे पाठविणे.
(15) संबंधीत शेतकर्‍यांनी याबाबत कायदेशीर सल्ला घेऊन, संबंधीत वरिष्ठ अधिकार्‍यांकडे कामकाज चालविले पाहिजे. नवी शर्तीच्या जमीनीचे बेकायदेशीर हस्तांतर होणार नाही, हे बघण्याची जबाबदारी तलाठयांवर आहे. असे हस्तांतर कायदेशीर करण्याचे अधिकार तलाठयाचे नाहीत. त्यामुळे त्याबाबत तलाठयांकडे आग्रह धरु नये.

(16) जिल्हाधिकारी आदेश देतील तेव्हा गावकर्‍यांना शिधापत्रिका देणे व शिधापत्रिकांची सूची अद्यावत ठेवणे.
(16) जेव्हा गावात नवीन शिधापत्रिका दिल्या जातात तेव्हा घरातील सर्व व्यक्तींची नोंद आवश्यकपणे त्यावर केली पाहिजे.

(17) सार्वत्रिक निवडणूक, जिल्हापरिषद व ग्रामपंचायत निवडणूक यांच्या मतदार याद्या तयार करणे.
(17) मतदार यादीमध्ये नांव असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.

(18) सार्वजनिक प्रयोजनासाठी जमीन संपादन करीत असतांना, मोजणीसाठी उपस्थित राहून वरिष्ठांना सहकार्य करणे.
(18) कॅनॉल, पाझर तलाव, स्मशानभूमी, गावठाण वाढ, रस्ता अशा सार्वजनिक कामास जमीन संपादन केली जाते. त्यावेळी शेतकर्‍याने जागेवर उपस्थित राहणे, नक्की कोणत्या बाजूची जमीन संपादनास विचारात घेतली आहे. हे जाणून घेतले पाहिजे. आपण गैरहजर राहिलो तर सरकारला जमीन घेता येणार नाही, असा एक मोठा गैरसमज शेतकर्‍यांमध्ये आढळून येतो. वास्तविक समक्ष उपस्थित राहून किती जमीन व कोणत्या बाजूची घेतली जाते हे कळू शकते. शिवाय भूसंपादनाची अंतिम अधिसूचना प्रसिध्द होण्यापूर्वी योग्य ती हरकत शेतकरी मांडू शकतो. समक्ष उपस्थित राहिल्यास अनेकवेळा जमीनीची प्रत व भूसंपादनाचे क्षेत्र याबाबत तडजोडीतून काही मार्ग निघू शकेल. उदा. जर रस्त्यासाठी काळया जमीनीतून, विहिरी जवळून, घराशेजारुन किंवा जमीनीचे तुकडे करुन क्षेत्र घेतले जात असेल तर त्याऐवजी शेजारच्या मुरमाड जमीनीतून, विहिरी पासून अंतरावर, घरापासून लांब किंवा बांधावरुन किंवा तुकडे होणार नाही अशारितीने रस्ता सूचविता येईल व आपल्या हक्काचे संरक्षण करता येईल.

(19) गाव पातळीवर ठेवल्या जाणार्‍या अभिलेखाच्या प्रती व उतारे देणे तसेच विविध प्रकारचे दाखले देणे (उदा. शेतकरी असल्याचा दाखला अगर उत्पन्नाचा दाखला इ.)
(19) शाळेतील मुलांच्या बाबतीत किंवा अन्य प्रकरणी देखील ऐनवेळी धावपळ करुन तलाठी असेल तेथे जाऊन दाखला मागण्यापेक्षा संबंधीत तलाठयांकडून 1 किंवा 2 महिने अगोदरच दाखले घेऊन ठेवता येऊ शकतात. उदा. विद्यार्थ्याला 10 वी परीक्षा पास झाल्यानंतर अकरावीत जातांना वडीलांच्या उत्पन्नाच्या दाखल्याची गरज असते. त्यामुळे आर्थिक वर्ष संपले की, म्हणजेच एप्रिल, मे महिन्यामध्येच असे दाखले पालकांनी काढून ठेवले पाहिजेत.

(20) गावामध्ये घडणार्‍या पूर, आग, धुके, साथीचे रोग, पीके बुडणे इ. आपत्तीमध्ये ताबडतोब तहसिलदार यांना अहवाल पाठविणे व नुकसानीचा पंचनामा करणे.
(20) नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यास नुकसानीची माहिती तलाठयास दिली पाहिजे व इतर खातेदारांच्या बरोबर आपल्या देखील नुकसानीबाबत पंचनामा केला जाईल याची दक्षता शेतकर्‍यांनी घेतली पाहिजे, जेणेकरुन शासनाकडून दिल्या जाणार्‍या मदतीमधून ते वगळले जाणार नाहीत.



SHARE THIS

->"च्‌कीच्या नोंदी व त्यांची दुरुस्ती"

Search engine name