अ.क्र.
|
गाव नमुना व
त्याचे नांव.
|
तपशील.
|
शेतकर्याच्या
ञ्ृष्टीने महत्व.
|
1
|
गाव नमुना
नंबर-1 जमीन आणि नियम कृषि
महसूल नोंदवही.
|
गावातील
सर्व जमीनींपासून मिळणारा महसूल हिशोब गा.न.नं.1 मध्ये देण्यांत येतो. गावातील सर्व
क्षेत्राची जमाबंदी करुन व जमीनीस आकार ठरवून तसेच सर्व्हे नंबर व गट
नंबरमध्ये जमीनीचे तुकडे दर्शवून गावचा आकारबंद भूमी अभिलेख खात्याकडून तयार
केलेला असतो. या आकारबंदात गावच्या सर्व क्षेत्राचा मेळ लिहिलेला असतो.
आकारबंद हा जमीनीच्या बाबतीत सर्वांत प्राथमिक व अत्यंत महत्वाची नोंदवही आहे.
या आकारबंदावरुन गाव नमुना 1-अ म्हणजेच शेतवार पत्रक
तयार केले जाते. दरवर्षी वेगवेगळया धारणा प्रकाराच्या खातेदारांकडून किती जमीन
महसूल देय आहे. तसेच लागवडी योग्य क्षेत्र किती याचा तपशील या गाव नमुन्यामध्ये
असतो.
|
शेतकर्यांच्या
ञ्ृष्टीने एकूण लागवडी लायक क्षेत्र, बिन आकारणी क्षेत्र त्यावरुन केलेल्या कृषिक आकारणी या
बाबी महत्वाच्या आहेत.
|
2
|
गावनमुना
एकचा गोषवारा.
|
या नमुन्यात
गाव नमुना एकची तेरीज असेही म्हटले जाते. हा गाव नमुना नंबर 1 चा गोषवारा आहे. यामध्ये गावातील
भोगवटादार वर्ग-1 चे क्षेत्र, वर्ग-2
चे क्षेत्र, गावातील नदी, नाले, रस्ता, गायरान व
स्मशानभूमी यावरील क्षेत्र ठळकपणे नमूद केले जाते.
|
शेतकर्याच्या
ञ्ृष्टीने सार्वजनिक हक्क ज्याच्यावर आहेत, ते या गाव नमुन्यावरुन समजू शकते. उदा. गावातून रेल्वे
गेली असेल तर एकूण रेल्वेखालील क्षेत्र समजू शकते. किंवा स्मशानभूमी, गायरान, रस्ते, नद्या,
नाले याखालील क्षेत्र एकत्रितरित्या मिळू शकते.
|
3
|
गावनमुना
नंबर 1-अ वन जमीनीची
नोंदवही.
|
गावातील वन
म्हणून अधिसूचित करण्यांत आलेले सर्व क्षेत्र या नमुन्यात लिहिले जाते.
फॉरेस्टच्या मालकीचे, गावातील कोणकोणते गट आहेत व त्याचे एकूण क्षेत्र किती? याबाबतची माहिती असते.
|
श
ेतकर्यांना फॉरेस्टचे एकूण क्षेत्र किती आहे ते गटनिहाय कळू शकते. एखाद्या
शेतकर्याच्या शेताचा गट नंबर
फॉरेस्टचा असेल व अशावेळी बांध निश्चित करण्याचा प्रश्न उद्भवला
किंवा अतिक्रमणाचा प्रश्न निर्माण झाला तर वन
विभागाच्या मालकीच्या त्या गटाचे क्षेत्र विचारात घेता येईल.
|
4
|
गाव नमुना
नंबर 1-ब बिनभोगवटयाच्या
(सरकारी) जमीनीची नोंदवही.
|
गावातील
एकूण सरकारी जमीनीची माहिती व त्यावरील सार्वजनिक अधिकार एकत्रितरित्या या
नोंदवहीमध्ये लिहिले जातात.
|
विल्हेवाटीसाठी
उपलब्ध असलेल्या जमीनीची माहिती या नोंदवहीत शेतकर्यांना मिळू शकते.
|
5
|
गाव नमुना
नंबर 1-क भोगवटादार वर्ग
दोन म्हणून मंजूर केलेल्या जमीनी आणि ग्रामपंचायतीकडे विहित केलेल्या जमीनी,
यांची नोंदवही.
|
अनेक शेतकर्यांना
वेगवेगळया कायद्याखाली भोगवटादार वर्ग दोन म्हणजे नवीन शतीने जमीनी मिळतात, अशा सर्व जमीनी व ग्रामपंचायतीला
दिलेल्या जमीनी यांची या नमुन्यामध्ये माहिती लिहिली जाते.
|
सिलिंग
कायदा, पुनर्वसन कायदा,
कूळ कायदा याखाली देण्यांत आलेल्या जमीनींची माहिती या नमुन्यात
लिहिली जाते. एखाद्या खातेदाराच्या 7/12 वर फक्त नवीन
शर्त असा उल्लेख असेल तर ही जमीन नक्कीच पुनर्वसन कायद्याखाली मिळाली आहे कां?
सिलिंग कायद्याखाली मिळाली आहें? वतनाची
जमीन आहे हे या गाव नमुन्यातील रकाना-6 वरुन स्पष्ट
होते. वरीलबाबत मूळ फेरफार नोंदीचे उतारे काढून देखील समजू शकते.
|
6
|
गाव नमुना
नंबर 1-ड
कुळ वहिवाट कायदा आणि महाराष्ट्र शेतजमीन (जमीन अधियिम,
1961 यांच्या उपबंधानुसर अतिरिक्त म्हणून घोषित केलेल्या जमीनी
दर्शविणारी नोंदवही.
|
या
नोंदवहीमध्ये कूळ कायदा व सिलिंग कायद्याखाली अतिरिक्त ठरलेल्या शासनाच्या
मालकीच्या झालेल्या जमीनीची माहिती लिहिलेली असते.
|
कूळ कायदा व
सिलिंग कायद्यामध्ये अतिरिक्त ठरलेल्या अशा कोणत्या गावात किती क्षेत्र व
कोणकोणत्या गटात असे क्षेत्र आहे हे या नमुन्यामध्ये समजू शकते. या गाव
नमुन्यातील रकाना-7 मध्ये कोणाच्या आदेशाने जमीन अतिरिक्त ठरली हे लिहिलेले असते.
|
7
|
गांव नमुना
नंबर 1-इ अतिक्रमण नोंदवही.
|
सरकारी
जमीनीवरील सर्व अतिक्रमणांची नोंद या नोंदवहीत केली जाते.
|
सरकारी
जमीनीवर कोणी किती तारखेस किती क्षेत्रावर अतिक्रमण केले व त्याबाबत किती दंड
करण्यांत आला व अन्य काय कार्यवाही केली हे या नमुन्यावरुन समजू शकते.
|
8
|
गाव नमुना
नंबर-2 अकृषित महसूलाची
नोंदवही.
|
गावातील
सर्व बिगरशेती जमीन महसूलाचा हिशोब या नोंदवहीमध्ये लिहिला जातो.
|
ज्याप्रमाणे
गाव नमुना नंबर-1 मध्ये गावातील सर्व शेतीच्या जमीनीचा हिशोब ठेवला जातो. त्याचप्रमाणे गांव
नमुना नंबर-2 मध्ये गावातील सर्व बिगर शेती जमीनी व
महसूलाचा हिशोब ठेवला जातो. गावातील कोणाचे क्षेत्र व किती क्षेत्रासाठी व
प्रयोजनासाठी बिगर शेती करण्यांत आले आहे हे या नोंदवहीवरुन समजू शकते.
|
9
|
गाव नमुना
नंबर-3 दुमाला जमीनींची
नोंदवही.
|
या गाव
नमुन्यामध्ये इनामी जमीनींची माहिती लिहिली जाते.
|
इतर सर्व
इनामे नष्ट केल्यामुळे सर्वसाधारणपणे देवस्थान इनामाच्या नोंदी या
नोंदवहीमध्ये लिहिल्या जातात.
गावातील देवांच्या जमीनी, त्यांची आकारणी,
त्यामधून शासनाला दिली जाणारी महसूल आकारणी यांचा उल्लेख
यामध्ये केला जातो.
|
10
|
गाव नमुना
नंबर-4 संकीर्ण जमीन महसूल
आणि त्यावरील स्थानिक उपकर नोंदवही.
|
शासनास मिळणारा महसूल जो बदलतो, तो या नोंदवहीत नोंदला जातो. अनेक
कारणांमुळे एखाद्या वर्षापुरता किंवा अनिश्चित स्वरुपाचा जमीन महसूल या
नोंदवहीत लिहिला जातो. या नोंदवहीत विलंब शुल्क, वसूली,
गुरे चारण्याची फी, किंवा सरकारी
जमीनीवरील काटेरी झुडपे तोडण्याची फी, अशा बाबी लिहिल्या
जातात.
|
रकाना-3 मध्ये नमूद केलेल्या कारणांसाठी जर
महसूल घेतला असेल तर त्याची नोंद या रकान्यांत केली जाते.
|
11
|
गांव नमुना
नंबर-5 क्षेत्र आणि महसूल
यांचा सर्वसाधारण गोषवारा (ठरावबंद)
हा नमुना म्हणजे गावाचे एकूण क्षेत्र व महसूल (ठरावबंद)
|
यांचा
सर्वसाधारण गोषवारा आहे. गावचे क्षेत्र, जमीन महसूल, त्यातील वाढ व घट,
जिल्हापरिषद व ग्रामपंचायत उपकर इ. नोंदी या नोंदवहीत लिहिल्या
जातात.
|
गावचा सगळा
महसूल योग्यरित्या वसूल झाला आहे काय? हे एकत्रितरित्या समजण्यासाठी व जमाबंदीसाठी शासनाला या
नमुन्याचा उपयोग आहे.
|
12
|
गाव नमुना
नंबर-6 फेरफार नोंदवही.
|
ही नोंदवही
म्हणजे फेरफारांची नोंदवही होय. ही शेतकर्यांच्या ञ्ृष्टीने सर्वात महत्वाची
नोंदवही आहे. अनेक ठिकाणी हा नमुना "ड" म्हणून तर काही ठिकाणी
नोंदीचा उतारा म्हणून प्रसिध्द आहे. जमीनीच्याबाबत अधिकारामध्ये जसजसे बदल
होतात, त्याप्रमाणे
अनुक्रमाने या नमुन्यामध्ये नोंदी केल्या जातात.
|
कोणत्याही
जमीनीच्या बाबतीत, मालकीहक्कांत होणारे फेरबदल, व्यवहाराचे स्वरुप,
खातेदारांचे नांव, व्यवहाराचा दिनांक,
मोबदला रक्कम, हस्तांतराचे क्षेत्र या
सर्वांची माहिती यामध्ये लिहिली जाते.
|
13
|
गाव नमुना
नंबर- 6-अ विवादग्रस्त
प्रकरणांची नोंदवही.
|
एखाद्या
नोंदीवर कोण आक्षेप घेतला तर तक्रार नोंद चालविली जाते. अशाप्रकारची नोंद या
नोंदवहीत घेतली जाते. चौकशी अधिकारी सर्व हितसंबंधीत पक्षकारांना नोटीस देऊन व
हरकतीचे स्वरुप विचारात घेऊन निर्णय देतात व तो या नोंदवहीत नोंदविला जातो.
|
फेरफार
नोंदीला हितसंबंधीत व्यक्तीने हरकत घेतल्यानंतर चौकशी अधिकार्यापुढे योग्य तो
पुरावा सादर करणे व विहित मुदतीत प्रकरण चालवून त्याचा निर्णय करुन घेणे
अपेक्षित आहे.
|
14
|
गाव नमुना
नंबर 6-ब विलंब शुल्क
प्रकरणांची नोंदवही.
|
मिळालेल्या
हक्काबाबत विहित मुदतीत माहिती दिली गेली नाहीतर जमीन महसूल कायदा कलम-152 खाली काही विलंब शुल्क (दंड) वसूल
केला जातो, तो या नोंदवहीत लिहिला जातो.
|
हक्क
समजणेबाबत झालेला उशीर, माहिती दिल्याचा दिनांक व करण्यांत आलेला दंड या नोंदवहीत लिहिला
जातो.
|
15
|
गाव नमुना
नंबर 6-क वारसा प्रकरणांची
नोंदवही.
ही नोंदवही स्वयंस्पष्ट आहे.
|
वारस नोंदी
प्रथम या रजिष्टरमध्ये नोंदवून वारसाची चौकशी केली जाते व नंतरच कोणाचे नांव
वारस म्हणून जमीनीस लावावे, याबाबत वारस ठराव मंजूर केला जातो.
प्रथम वारसाची चौकशी या नोंदवही-मध्ये नोंद घेऊन केली जाते व
वारस ठराव मंजूर केला जातो,
|
त्यानंतर
पुन्हा फेरफार नोंदवहीत नोंद केली जाते. वारसाबाबत जर तक्रार असेल तर शेतकर्यांना
आपले म्हणणे मांडण्याची आवश्यक ती संधी मिळू शकते.
|
16
|
गाव नमुना
नंबर 6-ड नवीन उप विभाग
(पोट हिस्से) नोंदवही.
|
जमीनीचे पोट
हिस्से पाडतांना या नोंदवहीत नोंद केली जाते. वाटप झाल्यामुळे, संपादना- मुळे, मळईच्या
जमीनीमुळे, पाण्याने वाहून गेल्यामुळे, जमीनीच्या बांधामध्ये झालेला बदल या नोंदवहीत लिहिला जातो.
|
रकाना-3 मधील झालेल्या, निर्णया-मुळे
झालेल्या हिश्श्याची मोजणी, मोजणी खात्याकडून
प्रत्यक्षपणे केली जाते व मोजणी फी वसूल करुन नंतरच सक्षम अधिकार्याच्या
आदेशाने जमीनीचे स्वतंत्र हिस्से पाडता येतात.
|
17
|
गाव नमुना
नंबर 7/12 अधिकार अभिलेख
पत्र
|
7/12 नावाने ओळखला जाणारा हा सर्वात महत्वाचा गाव नमुना आहे. याचे मुख्यत:
दोन भाग आहेत. वरचा भाग हा हक्क नोंदीबाबत म्हणजे फेर फाराची सूची आहे. तर
खालचा भाग हा पीक व पडीक जमीन याबाबतची माहिती देतो.
|
दरवर्षी
प्रत्येक शेतकर्याने या नमुन्याची प्रत घेऊन स्वत:च्या फाईलला लावली पाहिजे.
जमीनीचे मालकी क्षेत्र व त्यावरील इतर अधिकार, जमीन मालकाचे नांव, पिकाखालील क्षेत्र,सिंचनाचे साधन,इ. महत्वाचा तपशील यामध्ये लिहिला जातो.
|
18
|
गाव नमुना
नंबर 7-अ कूळवहिवाट
नोंदवही.
|
प्रत्येक
कृषी वर्षासाठी असणार्या कुळाच्या नोंदी या नमुन्यात केल्या जातात. या
नोंदवहीत कूळाचे व जमीन मालकाचे नांव, आकारणी व खंड याचा उल्लेख असतो.
|
या
नोंदीमध्ये बदल करण्यापूर्वी नोटीस देऊन व बाजू मांडण्याची संधी देऊन बदल करणे
अपेक्षित आहे.
|
19
|
गाव नमुना
नंबर 7-ब अधिकार
अभिलेखानुसार जमीन कब्जात असल्याचे मानण्यांत येणार्या व्यक्ती व्यतिरिक्त
जमीन कब्जात असलेल्या इतर व्यक्तींची नोंदवही.
|
पीक
पहाणीच्या काळात जमीन मालक सोडून अन्य व्यक्तींच्या कब्जात जर जमीन असेल तर या
नोंदवहीत नोंद केली जाते व फॉर्म 14 भरुन त्यावर रितसर चौकशी करुन तहसिलदार यांचेकडून निर्णय
दिला जातो.
|
हा अत्यंत
महत्वाचा नमुना आहे. प्रत्येक शेतकर्याने आपल्या हक्काबाबत दक्ष राहतांना 7-ब मधील नोंदीबाबत जर योग्य तो पुरावा
वेळीच दिला तर त्याचा हक्काचे संरक्षण होते.
|
20
|
गाव नमुना
नंबर 8-अ धारण जमीनींची
नोंदवही.
|
या नमुन्यात
खातेदार यांनी अनेक धारण केलेल्या जमीनींची नोंद केली जाते. व्यक्तींच्या
नावावर वर्णानुक्रमे लिहून व खाते क्रमांक नमूद करुन व्यक्तीनिहाय अनेक गट व
त्याचे क्षेत्र व जमीन महसूल या नोंदवहीत लिहिला जातो.
|
खातेदाराच्या
नावावरील सर्व गट नंबर व त्याचे क्षेत्र हे या नोंदवहीत लिहिले जाते. अनेक
प्रकरणी शेतकर्यांना 8-अ चा उतारा आवश्यक आतो. आपल्या नावावरील सर्व गटाच्या नोंदी व क्षेत्र
बरोबर असल्याची खात्री प्रत्येक शेतकर्याने केली पाहिजे.
|
21
|
गाव नमुना
नंबर 8-ब येणे रकमा व वसूली
यांची वार्षिक खातेवही व सर्व ठरावबंद बाबींचे चाचणी ताळेबंद यांची नोंदवही.
|
प्रत्येक
व्यक्तीकडून जमीन महसूलाची किती रक्कम देय आहे व त्याची वसूली दर्शविणारी ही
नोंदवही आहे.
|
प्रत्येक
खातेदाराच्या नावापुढे जमीनी, कृशक, अकृषक, त्यावरील
शेतसारा, जिल्हापरिषद सेस, ग्रामपंचायत
सेस, जादा वसूली, यांचा उल्लेख या
नोंदवहीमध्ये असतो.
|
22
|
गाव नमुना
नंबर 8-क मागण्या व वसूली
यांची वार्षिक खातेवही.
|
जमीन महसूल
सोडून, इतर वसूलीच्या
बाबतचा ताळेबंद या वहीत लिहिला जाते.
|
जमीन महसूल
सोडून, इतर विभागांची परंतू
जमीन महसूलाची थकबाकी म्हणून वसूल करावयाची रक्कम या नोंदवहीमध्ये लिहिली
जाते. उदा. पाटबंधारे, विक्रीकर, आयकर
विभाग यांची वसूली.
|
23
|
गाव नमुना
नंबर 8-ड सरकारी येणे
रकमांची व इतर रकमांची रोख नोंदवही.
|
ही वसूल
केलेल्या सरकारी रकमांची रोख नोंदवही (कॅशबूक) आहे.
|
ही नोंदवही
शासकीय कामासाठी उपयोगाची आहे.
|
24
|
गाव नमुना
नंबर-9 दैनिक व जमापुस्तक.
तलाठयामार्फत जमीन महसूलाची जी पावती दिली जाते,
|
ती या
नमुन्यामध्ये असते. प्रत्येक पावतीवर तहसिलदाराचा शिक्का असला पाहिजे.
लिहिलेली रक्कम योग्य असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
|
पावती
मिळाल्याबाबत सही करुन शेतकर्यांनी ही पावती घेतली पाहिजे.
|
25
|
गाव नमुना
नंबर 9-अ शासनाला प्रदान
केलेल्या रकमांच्या पावत्या.
|
जमीन
महसूलाखेरीज इतर येणे रकमांच्या वसूलीसाठी या पावत्या दिल्या जातात.
|
ही नोंदवही
शासकीय कामासाठी उपयोगाची आहे. पावतीवर सही करुन शेतकर्यांनी ही पावती घेतली
पाहिजे.
|
26
|
गाव नमुना
नंबर 9-अ तलाठयाने
ठेवावयाची गाव नमुना 9 ची पावती पुस्तके व इतर पावती
पुस्तके यांच्या संग्रहाची नोंदवही
|
तलाठयाला
तहसिल कचेरीतून जी पावती पुस्तके दिली जातात,
|
त्याची नोंद
या वहीमध्ये केली जाते.
ही नोंदवही प्रशासकीय सोईसाठी ठेवली जाते.
|
27
|
गाव नमुना
नंबर-10
जमीन महसूलाचे चलन.
|
जमीन महसूल
एकत्रितरित्या कोषागारात जमा करण्यासाठी हा नमुना असतो.
|
प्रशासकीय
सोईसाठी हा नमुना ठेवला जातो.
|
28
|
गाव
नमुना
नंबर-11
पिकांची आकडेवारी.
|
प्रत्येक
गटवार पीके व झाडे यांची नोंद या नोंदवहीत केली जाते.
|
या
आकडेवारीचा प्रशासनासाठी उपयोग होतो.
|
29
|
गाव नमुना
नंबर-13
लोकसंख्या, गुरे व शेतकी अवजारे
दर्शविणारी नोंदवही.
|
गावातील
लोकसंख्या, गुरे व शेती अवजारांची माहिती या नोंदवहीत लिहिली जाते.
|
प्रशासकीय
उपयोगासाठी ही
माहिती लिहिली जाते.
|
30
|
गाव नमुना
नंबर-14
|
गावातील
सर्व पाणी पुरवठयाच्या साधनांची नोंद या नोंदवहीत केली जाते.
|
प्रशासनासाठी
या नोंदवहीचा उपयोग होतो.
|
31
|
गाव नमुना
नंबर-15
आवक-जावक नोंदवही
|
तलाठयाकडे
येणार्या व त्याने पाठविलेल्या प्रत्येक पत्रव्यवहाराची नोंद या नोंदवहीत
केली जाते.
|
प्रशासकीय
नियंत्रणासाठी व प्रकरण कोठे व
केव्हा पाठविले याची माहिती होतो. या नमुन्यास बारनिशी असेही
म्हणतात.
|
32
|
गाव नमुना
नंबर-16
पुस्तके, नियमपुस्तिका व स्थायी आदेश
इत्यादींची सूची.
|
यासाठी
विशिष्ठ नमुना नाही. मार्गदर्शनासाठी पुस्तके, नियम पुस्तके व स्थायी आदेश संचिका
ठेवली जाते
|
महत्वाची
परिपत्रके व स्थायी आदेश यांची माहिती मिळू शकते.
|
33
|
गाव नमुना
नंबर-17 संकीर्ण महसूल
बसविण्यासंबंधीचे प्रतिवृत्त.
|
संकीर्ण
जमीन महसूल बसविण्याचा अहवाल या नमुन्यात पाठविला जातो.
|
हा नमुना
प्रशासकीय सोईसाठी वापरला जातो.
|
34
|
गाव नमुना नंबर-18
मंडळ अधिकारी यासाठी आवक-जावक नोंदवही
|
मंडळ
अधिकारी यासाठी असणारी ही आवक- जावक पत्रव्यवहाराची नोंदवही आहे
|
मंडळ
अधिकारी (सर्कल ऑफीसर) मार्फत होणारा पत्रव्यवहार यामध्ये नोंदविला जातो.
|
35
|
गाव नमुना
नंबर-19
सरकारी मालमत्तेची नोंदवही
|
तलाठी व
मंडळ अधिकारी यांच्या ताब्यात असलेल्या सरकारी मालमत्तेची नोंद या वहीत केली
जाते.
|
ही नोंदवही
प्रशासकीय उपयोगासाठी ठेवली जाते.
|
36
|
गाव नमुना
नंबर-20
पोष्टाची सरकारी तिकीटांची नोंदवही.
|
हा
स्वयंस्पष्ट नमुना असून पत्रव्यवहारासाठी वापरलेल्या तिकीटांचा हिशोब यामध्ये
लिहिला जातो.
|
प्रशासकीय
उपयोगासाठी ही नोंदवही ठेवली जाते.
|
37
|
गाव नमुना
नंबर-21
मंडळ अधिकारी यांची मासिक दैनंदिनी
|
महिन्यातील
प्रत्येक दिनांकास मंडळ अधिकारी यांनी कोणती कामे केली,
|
याचा उल्लेख
या वहीत केला जातो.
प्रशासकीय उपयोगासाठी ही नोंदवही ठेवली जाते.
|
->"हिश्श्याचे क्षेत्र. महसुली नमुने"
Post a Comment