ग्रामपंचायत रजिस्टर व नोंदवह्या Gram register and nondavahya

ग्रामपंचायत रजिस्टर व नोंदवह्या
Gram register and nondavahya
१) नमुना नंबर - १६ वेतन मानाचे नोंदणी रजिस्टर
२) ग्रा. पं. ने. कलम ६१ नुसार नेमलेल्या सेवकाचे वेतन, भत्ते बाबतच्या नोंदी या रजिस्टरमध्ये करण्यात येतात रजिस्टरमधील कर्मचाऱ्यांचे वेतनाचा मेळ न. नं २४ रजिस्टरला घेण्यात यावा.

* ग्रामपंचायतीने खालील रजिस्टरे व नोंद पुस्तके ठेवण्याची असतात.
१) कोंडवाडा रजिस्टर नमुना नं १
२) कोंडवाडा नमुना अ, ब, क, ड, ई, क, फ, ग
३) आवक बारनिधी
४) करवसुलीची पोटकीर्द
५) जावक बारनिशी
६) मासिक सभा नोंदवही / ग्रामसभा नोंदवही
७) लेखा परीक्षण नोंदवही
८) मिळकतीचे फेरफार नोंदवही रजिस्टर कर बांधणी परवाना रजिस्टर
९) जन्म, मृत्यू, उपजत मृत्यू व विवाह नोंदणी रजिस्टर
१०) व्हिझिट बुक / शेरे बुक
११) ग्रामसेवक दैनंदिनी
१२) ग्रामपंचायत व विकास कामकाज विषयक फाईल्स
वरील प्रमाणे विहित नमुन्यात ग्रामपंचायतीचे ग्राम निधीचे हिशोब सचिवाने अद्यावत ठेवण्याचे आहेत.

* ग्रामपंचायतीकडील मालमत्तेच्या नोंदवह्या :
१) ग्रा. पं. स्तरावर तीन प्रकारच्या स्थावर मालमत्तेच्या नोंदवह्या ठेवल्या जातात.
२) स्थावर मालमत्ता नोंदवही (नमुना नं. २५) : सदर नोंदवहीत ग्रा. पं मालकीच्या शासनाने विहित केलेल्या मालमत्ता (उदा. इमारती, झाडे, विहिरी, गटारे, बांध, स्मशानभुमी इ. ) यांची पूर्ण तपशिलासह ग्रा. पं. ने ठेवणे व त्यामध्ये होणारे बदल, झालेला खर्च इ. तपशील वेळोवेळी नोंद करणे आवश्यक आहे.
३) ग्रा. पं. हद्दीतील रस्ते ( नमुना नं २६ ) ग्रा. पं. हद्दीतील ग्रा. पं. मालकीचे शासनाने विहित केलेल्या रस्त्याची नोंद ग्रा. पं. ने ठेवणे व त्यामध्ये होणारे बदल, झालेला खर्च इ. तपशील वेळोवेळी नोंद करणे आवश्यक आहे.
४) ग्रा. पं. हद्दीतील रस्ते (नमुना नं २७ ) ग्रा. पं. मालकीचे शासनाने विहित केलेल्या, तसेच जि. प. ने हस्तांतर केलेल्या जमिनीच्या नोंदी ग्रा. पं ने ठेवणे व त्यामध्ये होणारे बदल, वेळोवेळी नोंद करणे आवश्यक आहे.
५) वरील सर्व मालमत्ता सुरक्षित ठेवणे, त्यांचेवर अतिक्रमण होणार नाही याची ग्रा. पं. ने दक्षता घेणे आवश्यक आहे.

* इमारत व मोकळी जागा यांची मिळकत रजिस्टरला नोंद :
१) संबंधित व्यक्तीने मिळकत नोंदी करणेसाठी पंचायतीकडे रितसर अर्ज करावा लागतो.
२) सदर अर्जासोबत नोंदणीकृत खरेदीपत्र / अनुसुची क्र. २ सिटी सर्व्हे झाला असल्यास प्रॉपर्टी उतारा, जागेबाबत न्यायालयात विवाद उत्पन्न झाल्यास न्यायालयीन निकालाची प्रत इत्यादी कागदपत्र अर्जासोबत असणे अत्यंत महत्वाचे आहे.
३) वरील बाबीची पूर्तता झालेनंतर पंचायतीस रीतसर ठराव करून ती नोंद मिळकत रजिस्टरला घेता येईल.

* मयत व्यक्तीबाबत कर आकारणी रजिस्टर नोंदी :-
१. घरमालक मृत्यू पावला असेल तर संबंधित वारासदाराने सदरची बाब पंचायतीच्या निदर्शनास आणुन नोंदी बदलाबाबत दाखल करणेचा अर्ज पंचायतीकडे करावा. सोबत वारसहक्कासंबंधीची कागदपत्रे जोडावीत.
२. ग्रामपंचायतने कोर्टाकडील वारसनोंदी बदलाच्या कागदपत्रावरूनच वारस ठरवावेत.
३. अर्ज प्राप्त झालेनंतर पंचायतीने सर्व संबंधित वारसदार यांना लेखी काळवुन त्यांच्या ना हरकती प्राप्त करवुन घ्याव्यात.
४. ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत बैठकीचे वेळी सर्व संबंधित वारसदार यांना आमंत्रित करावे व त्यांचे लेखी निवेदन घेऊन तशी नोंद इतिवृत्तात करावी.
५. वारसनोंदी करतांना महिलांचे मालकी हक्क डावलेले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. (उदा. मयत व्यक्तीची पत्नी, मुली, विधवा सून)

* गावाची एकापेक्षा अधिक गावात विभागणी झाल्यास :
मुळ गावाच्या मालमत्तेचे वाटप जेव्हा एक गावातून दुसरे स्वतंत्र गाव निर्माण करण्याचा निर्णय घेतला जातो, तेव्हा त्या गावची पंचायत बरखास्त होते. व राज्यशासन निदेश देईल त्याप्रमाणे नवीन गावामध्ये मालमत्तेची विभागणी केली जाते. (कलाम १६०)

* एकापेक्षा अधिक गावे एकत्र येऊन त्याचे एकत्रीकृत गाव तयार होते त्याचे परिणाम :
काही परिस्थितीमध्ये अनेक गावाचे मिळुन एक गाव तयार होते त्यावेळी त्या गावासाठी असणाऱ्या पंचायतीचे अस्तित्व संपुष्ट होईल व सर्व सदस्य आपली पदे सोडतील.

१. जुन्या गावांच्या मालकीच्या सर्व स्थावर, जंगम मालमत्ता नवीन गावामध्ये वर्ग होतील. ( Assets & Liability सह )
२. जुन्या पंचायतींनी केलेली नेमणूक, काढलेले आदेश, नोटीस, अधिसुचना देण्यात आलेली परवानगी, अस्तित्वात असलेले नियम, उपविधी त्यात फेलबदल किंवा ते रद्द करेपर्यंत अस्तित्वात आहेत असे समजणेत येईल.
३. पंचायतीने सर्व कर्मचारी आहे त्या सेवाशतीप्रमाणे नवीन गावात वर्ग होतील.
४. एकत्रिकृत गावासाठी नवीन पंचायत अस्तित्वात येईपर्यंत राज्य शासन नेमून देईल अशा प्रशासकांमार्फत एकत्रिकृत गावाचा कारभार सुरु राहील.

* ग्रामपंचायतीच्या स्व मालकीच्या मालमत्ता हस्तांतरणाबाबत :
१. पंचायतीमध्ये विहित असलेली किंवा तिने संपादित केलेली मालमत्ता भाडेपट्याने देणे, विकणे तसेच जिल्हा परिषदेने किंवा पं. स. ने. ग्रा. पं. मध्ये विहित केलेली स्थावर मिळकत तसेच ग्रामपंचायतने ग्रामनिधी खर्चून अथवा शासनाकडील अनुदानातून किंवा लोकांच्या मदतीने केलेले बांधकाम इ. मालमत्तेचे हस्तांतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे लेखी संमतीशिवाय हस्तांतर करता येत नाही
२. ११ महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी एखादी मालमत्ता भाडेपट्याने देण्याची असल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे परवानगीची आवश्यकता आहे.
३. जिल्हाधिकारी यांचे अधिकार कक्षेत असलेली गायराने ग्रामपंचायतीकडे वर्ग करणेत येतात. सदरची गायराने काही विशिष्ठ अटी घालून दिलेली असतात. त्या अटींप्रमाणेच त्या गायरानाचा वापर करणे पंचायतिवर बंधन असते. गायरानांचे हस्तांतरण जिल्हाधिकारी यांचे मान्यतेशिवाय करणे नियमबाह्य ठरते.

✍✍✍✍✍
संजय स्वा.किणीकर,स्वामी
Rti सोलापूर जिल्हा प्रमुख,
FB माहिती अधिकार सोलापूर जिल्हा

->"ग्रामपंचायत रजिस्टर व नोंदवह्या Gram register and nondavahya"

Post a Comment