शेती विषयक माहिती » बांधाचे वाद. |
शेतकर्यांच्या
दृष्टीने मंडळ अधिकारी उर्फ सर्कल भाऊसाहेब हा देखील नेहमी संपर्कात येणारा
महसूल अधिकारी आहे. तलाठयाचाᅠ निकटचा वरिष्ठ अधिकारी म्हणून
तलाठयाला कराव्या लागणार्या कामावर सर्वसाधारणपणे देखरेख ठेवणे व वरिष्ठांच्या
हुकूमांची अंमलबजावणी करणे हे मंडळ अधिकार्याचे मुख्य कर्तव्य आहे. मंडळ
अधिकार्याच्या ज्या महत्वाच्या कर्तव्यांशी शेतकर्याचा थेट संबंध येतो ती
कर्तव्ये पुढे दिली आहेत. त्याचबरोबर त्या त्या कर्तव्यांच संदर्भात, प्रत्येक खातेदारांनी वेळीच कोणती दक्षता घेतली पाहिजे हे देखील रकाना
नंबर-2 मध्ये सूचित केले आहे.
मंडळ
अधिकार्यांची कर्तव्ये.
शेतकर्यांनी घ्यावयाची दक्षता.
(1) आपल्या सजामधील प्रत्येक गावामध्ये ठरलेल्या दिवशी तलाठी उपस्थित राहतो किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी मंडळ अधिकार्याची आहे. (1) तलाठी भेटत नसल्यास मंडळअधिकारी यांचेकडे शतकर्यास दाद मागता येईल. (2) वरिष्ठांकडून येणारी जमीन मागणीची, बिगर शेतीची किंवा अन्य इतर महसूली प्रकरणे तपासणीसाठी आल्यास प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करुन व पंचनामा करुन वरिष्ठांना अहवाल पाठविणे. (2) अनेकवेळा अशी प्रकरणे मंडळ अधिकारी यांचेकडेच असतात. परंतू खातेदार मात्र संबंधीत तलाठयाकडे सतत प्रकरण वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यास आग्रह धरतांना आपण पाहतो. वारंवार त्यांनी चूकीच्या व्यक्तीकडे पाठपुरावा केल्यामुळे संबंधीत शेतकर्याला मानसिक त्रास सहन करावा लागतो व प्रकरण वर पाठविले जाईल अशा प्रकारचे पोकळ आश्र्वासन दिले जाईल. शिवाय प्रत्यक्ष जमीनीवरील वस्तुस्थिती काय आहे हे वरीष्ठांना समजावे म्हणून पाहणी केली जात असल्यामुळे संबंधित शेतकर्यांनी आवर्जुन पाहणीच्या वेळी उपस्थित राहीले पाहिजे. (3) सर्व फेरफार नोंदी प्रमाणित करणे व त्याचबरोबर हितसंबंधीत पक्षकारांना नोटीस बजावली आहे काय? (3) फेरफार नोंदी या मंडळ अधिकारी हेच प्रमाणित करतात. नोंदी धरण्याचे अधिकार फक्त तलाठयांना आहेत. तसेच तक्रार नोंदीची देखील चौकशी मंडळ अधिकारी यांचेकडून चालते. तक्रार नोंदीच्या बाबतीत मंडळ अधिकारी यांचेकडून रितसर निकालपत्र दिले जाते व निकालाची समजसुध्दा पक्षकाकरांना दिली जाते. अशावेळी शेकर्यांनी निकाल मान्य नसला तर ताबडतोब प्रांत अधिकारी यांचेकडे 60 दिवसांच्या आंत रितसर अपील दाखल केले पाहिजे. सुनावणीच्या वेळी स्वत: हजर राहून आपले म्हणणे मांडण्याची दक्षता घेतली पाहिजे. बर्याच वेळा तोंडी सांगितलेले म्हणणे व त्यातील मुद्दे विचारात न घेता निकाल दिला जातो. त्यामुळे तोंडी म्हणण्याबरोबरच शेतकर्यांनी आपले लेखी म्हणणेसुध्दा दाखल केले पाहिजे. त्याचा उपयोग त्यांना अपिलामध्ये होऊ शकतो. (4) वारस नोंदी प्रमाणित करणे. (4) संबंधीत खातेदाराने घरातील मयत खातेदाराच्या मृत्यूनंतर 3 महिन्याच्या आंत सर्व वारसांची नांवे नमूद करुन, वर्दी अर्ज दिला पाहिजे. शक्यतो अर्जाबरोबर वारसांची नांवे दाखवणारी वंशवेल, नातेसंबंध व सर्व वारसांची नांवे व पत्ते आणि एवढेच वारस आहे असे सांगणारे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे. (5) गावातील पैसेवारी निश्चित करणे. (5) दुष्काळी परिस्थितीत गावाची किती पैसेवारी आहे याची माहिती शेतकर्यांना घेता येईल. जमीन महसूलाची वसूली ही पैसेवारीशी संबंधीत असल्यामुळे आणि शेतकर्यांना शासनाकडून देण्यांत येणारी विविध सवलतींचा शेतकर्यांशी संबंध असल्यामुळे याबाबत शेतकर्यांनी जागरुक राहून आपल्या हक्कांचे संरक्षण केले पाहिजे. (6) टंचाई काळात टँकरने व्यवस्थित पाणी पुरवठा होत असल्याबाबत खात्री करणे. (6) एखाद्या वाडी, वस्तीला टँकर वेळेत आला नाही किंवा नव्याने टँकरची मागणी असेल तर शेतकरी, गाव कामगार तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांचेकडे विचारणा करु शकतात. (7) नैसर्गिक आपत्तीबाबत वरिष्ठांना अहवाल पाठविणे. (7) नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या खातेदारांनी आपले अहवालात नांव आहे किंवा नाही याची विचारणा मंडळ अधिकारी यांचेकडे केली पाहिजे. नैसर्गिक आपत्तीमध्ये घराच्या, पिकांच्या, जनावरांच्या किंवा अन्यप्रकारे काही नुकसान झाल्यास नुकसानीबाबतचा सर्व तपशिल व त्याची पंचानुमते येणारी अंदाजे किंमत ही वाजवी आहे किंवा नाही याची खात्री शेतकर्यांना करता येईल. (8) न्यायालयात पुरवा देण्यासाठीचे, गुन्हयांचे स्थळ दर्शविणारा नकाशा तयार करणे. (8) हा न्यायालयीन कामकाजासंबंधी असतो. गुन्हा घडलेले ठिकाण हे योग्यरित्या दाखविले जात आहे काय, याबाबत खात्री त्या जमीनीचे मालक करु शकतील. (9) गावठाणवाढींची प्रकरणे तयार करणे व वरिष्ठांना पाठविणे. (9) गरजू खातेदारांना विहित मुदतीत गावठाण वाढीतून भुखंड मिळण्यासाठी अर्ज करता येईल. (10) अनेक शासकीय योजनांची अंमलबजावणी करणे, वरिष्ठांना मदत करणे, तसेच प्राथमित चौकशी अहवाल पाठविणे. (10) खातेदारांशी संबंधीत असणारी प्रकरणे, जर निर्णयासाठी वरिष्ठांकडे प्रलंबित असतील तर व वस्तुस्थितीची माहिती मंडळ अधिकारी यांचेकडून मागविली गेली असेल तर त्याबाबत मंडळ अधिकारी यांना विचारणा करुन पाठपुरावा करता येईल. (11) सरकारी महसूलाच्या वसूली विषयी चौकशी करणे व तलाठयाची कॅशबूक हिशोब तपासणी करणे. (11) मंडळ अधिकारी हा आपल्या मंडळातील सर्व गावांच्या महसुलाच्या वसुलीसाठी जबाबदार असतो. जमीन महसूलाची किंवा अन्य करांची थकबाकी कशामुळे राहिली आहे, तसेच वसूली करण्यांत आलेली रक्कम कोषागारात भरण्यांत आली आहे किंवा नाही याबाबतची खात्री करुन घेण्याचे काम मंडळ अधिकार्याचे आहे. महसूल भरुनसुध्दा अशी पावती दिली गेली नाही किंवा रकमांविषयी काही शंका असतील तर खातेदारांनी मंडळ अधिकारी यांचेकडे संबंधीत पावती घेऊन जाऊन खात्री केली पाहिजे. (12) सर्व इनाम जमीनी, बिगर शेत जमीनी, कुळाच्या जमीनी याची तपासणी करणे हे मंडळ अधिकार्याचे काम आहे. (12) या जमीनीचा संबंध असणार्या खातेदारांनी आपल्या हक्कांच्या संरक्षणासाठी मंडळ अधिकारी यांचेशी संपर्क साधला पाहिजे. तसेच हक्क योग्यरित्या नोंदवले गेले आहेत किंवा नाहीत याबाबत विचारणा करावी. (13) सरकारी जमीनीवरील अतिक्रमणे व अनधिकृत वापर याचा तपास लावण्याची जबाबदारी मंडळ अधिकारी यांची आहे. (13) गावातील कोणत्याही सरकारी मालमत्तेवर अतिक्रमण केल्यास अशा प्रकरणी मंडळ अधिकार्याच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे. (14) गावातील सर्व विहिरी, बंधारे व तलाव यांची नोंद कायम स्वरुपी रेकॉर्डमध्ये व्हावी म्हणून दरवर्षी नव्याने घेण्यांत आलेल्या विहिरी, बंधारे तलाव यांची माहिती ही गाव नकाशावर मंडळ अधिकारी यांचेकडून चिन्हे नमूद करुन तालुका निरिक्षण, भूमि अभिलेख यांना पाठविली जाते. (14) एखाद्या शेतकर्याची जमीन पाझर तलावामध्ये, बंधार्यामध्ये गेल्यास त्याप्रमाणे 7/12 वर योग्य तो बदल होण्यासाठी ही माहिती मंडळ अधिकारी यांनी तालुका निरिक्षक, भूमि अभिलेख यांचेकडे पाठविली किंवा नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. (15) शासनाने चौकशीसाठी पाठविलेल्या सर्व प्रकरणांची आवक-जावक नोंदवही मंडळ अधिकार्यास ठेवावी लागते. (15) राज्यभरातील शेतकरी आपापल्या प्रश्नाबद्दल शासनास तसेच मंत्रालयापासून सर्व पातळयांवर अर्ज करीत असतात. असे अर्ज स्थानिक चौकशीसाठी मंडळ अधिकार्यांकडे येतात. त्यामुळे आपले प्रकरण कोणत्या पातळीवर आहे व त्याच्यावरील अहवाल गेला किंवा नाही याची खात्री करण्यासाठी मंडळ अधिकार्यांची संपर्क साधला पाहिजे. (16) तलाठयांना असणार्या जवळजवळ प्रत्येक कामाच्या बाबत अंमलबजावणी करुन घेणे व पर्यवेक्षण ठेवणे. (16) तलाठयाकडे जर कोणत्याही प्रश्नाची दाद न मिळाल्यास, मंडळ अधिकारी यांचेकडे दाद मागणे. |
बांधाचे वाद

->"बांधाचे वाद "
Post a Comment