भारतात ८० ते ८५ टक्के उत्पन्न हे शेती आणि शेतीविषयक उद्योगातून येते. शेतीला पूरक असे अन्न प्रक्रिया, कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय असे अनेक प्रकारचे उद्योग चालू असतात. उसाची शेती आणि त्याच्या उद्योगाविषयक उदाहरण : उसाची शेती ही साखर उद्योगाला पूरक आहे, उसाचा रस हा आरोग्यासाठी गुणवर्धन ठरतो. उसाच्या चिपाडापासून कागद निर्मिती होते. साखर हा दैनंदिन गरजेचा पदार्थ आहे. म्हणून आर्थिकदृष्ट्या साखर उद्योग हा नफा देणारा ठरतो. असाच दृष्टीकोन सर्व शेती पूरक उद्योगासाठी ठेवला पाहिजे. नारळ, आंबा, तांदूळ, गहू, स्ट्रोबेरी, मसाले असे अनेक पदार्थ आहेत. आयात-निर्यातीच्या कृषि उद्योगातून परदेशी चलन उपलब्ध होऊन परकीय गंगाजळीत वाढ होते.
शेळी ही गरीबाची गाय मानली जाते. कारण तिला राहण्यासाठी कमी जागा लागते, तिचा खुराक कमी असतो. शेळीचे दुध आरोग्यदृष्ट्या लाभदायक ठरते. मत्स्य शेतीचा कृषि उद्योगांमध्ये महत्त्व फार असते. ओली मासळी आणि सुकी मासळी असे दोन प्रकार असतात. त्याचा हॉटेल उद्योगासाठी मोठी मागणी आहे. माशांचे अनेक प्रकार असून मत्स्यशेती ही कृत्रिमरित्यासुद्धा केली जाते. अशा प्रकारे शेती हा कृषि विषयक उद्योगांचा पाया आहे.भारतीय औद्योगिक विकासाला हातभार कृषि विषयक उद्योगातून मिळतो.

->"Agriculture Industry कृषि विषयक उद्योग"
Post a Comment