Forest Castor वनएरंड


वनएरंड बियांमध्ये  सर्वाधिक ३५% ते ४०% अखाद्य तेलाचे प्रमाण असते.या वनस्पतीपासून बायोडिझेल या महत्वाच्या इंधनाची निर्मिती करता येणे शक्य असल्याने वनएरंडाची लागवड करणे काळाची गरज बनली आहे. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी सर्वप्रथम या झाडाची लागवड राष्ट्रपती भवनात केली होती. शेतकऱ्यांत या वनस्पती बाबतची जागृती घडवून त्यांना वनएरंड लागवडीसाठी प्रोत्साहीत करायला हवे. 
वनएरंडाची स्थानिक नावे पुढीलप्रमाणे – 
30. रतनज्योत.
31. पारशी एरंड.
32. मोगली एरंड.
33. चंद्रज्योत.
34. जमल गोटा इंग्रजीत याला जट्रोफा म्हणतात.

हवामान – अवर्षणग्रस्त व बेताचा पाऊस पडणाऱ्या प्रदेशात वनएरंड चांगला येतो.
जमीन – लागवड हलक्या ते भारी जमिनीत करता येते. मध्यम जमीन अनुकूल असते.
लागवड – जुने ते जुलै महिन्यात करावी. लागवड बियांपासून करावी.
अंतर – बागायतात २ मी. × २ मी. अंतरावर करावी. जिरायातात १.७५ मी. × १.७५ मी. ओळीत अंतरावर करावी.
पाणीपुरवठा – नियमित व पुरेसा पाणीपुरवठा असल्यास उत्पादन चांगले मिळते.
उत्पादन – प्रत्येक फळात ३ ते ४ बिया असतात. १० वर्षानंतर प्रत्येक झाडास हेक्टरी १२०० ते १३०० किलो बिया निघतात.






SHARE THIS

->"Forest Castor वनएरंड"

Search engine name