उद्यानविद्या क्षेत्रात स्वंयरोजगाराच्या काही संधी –
शेती पारंपारिक पद्धतीने केली जाते. ती ब-याचदा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. परंतू उद्यान विद्या सारख्या क्षेत्रात आधुनिक पद्धतीचे तंत्रज्ञान वापरण्यात येत असल्याने त्यामध्ये व्यावासायासाठी अनेक संधी उपलब्ध होत आहेत. स्वयंपाक घरात लागणा-या वस्तू पासून फळे, भाजीपाला, फुले त्याच बरोबर कॉर्पोरेट क्षेत्रात इमारतीच्या आवारात शुशोभीकरणा ची ही गरज दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्रात स्वयंरोजगाराच्या अनेकानेक संधी उपलब्ध होत असतात. त्याचा शोध घेणे गरजेचे आहे.
• विविध फळे, भाजीपाला, फुले, मसाला पिके, औषधी वनस्पतींची व्यापारी तत्त्वावर लागवड.
• विविध पिकांच्या व्यावसायिक तत्त्वावर रोपवाटिका उभारणी.
• फुले व भाजीपाला बियाणे उत्पादन.
• सेंद्रिय फळे व भाजीपाला उत्पादन.
• विविध पिकांची हरितगृहात लागवड.
• उद्यानविद्या मार्गदर्शक (Horticulture Consultant)
• फुलापासून हार विक्री व सजावटीचे काम (Flower Decorator)
• लॉन उत्पादन व विक्री.
• शीतगृहाची उभारणी.
• फळे, भाजीपाला व लागवडीची पिके (रबर, नारळ, काजू, कोको) इत्यादी. वर आधारित प्रक्रिया उद्योग.
• कृषी / उद्यान पर्यटन (Agri Tourism)
• विविध पिकांच्या निर्यातीद्वारे.
->"Horticulture: Self-employment Opportunities उद्यानविद्या: स्वयंरोजगाराच्या संधी"