Irrigated Farming बागायती शेती


ज्या शेतीला बारमाही पाणी उपलब्ध असते. अशा शेतीला ‘बागायती शेती’ म्हणतात. बागायती शेतीत खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामात पिके घेतली जातात किंवा जेथे खरीप  आणि रब्बी या दोन्ही हंगामात हमखास पाणी पुरवठा करणे शक्य आहे तेथे दोन पिके घेतली जातात.

बागायतीचे दोन प्रकार
विहीर बागायत 
पाटाखाली क्षेत्र 
महाराष्ट्रात बागायती शेतीमध्ये ऊस, कापूस, गहू, हरभरा, भुईमूग, सुर्यफुल, सोयाबीन, भात, ज्वारी ही बागायती पिके घेतली जातात. महाराष्ट्रातील निम्म्याहून अधिक क्षेत्र हे विहिरीच्या पाण्याखाली भिजते, तर निम्म्याहून कमी क्षेत्र पाटाखाली भिजते. विहीर बागायतीत जेव्हा हवे तेव्हा पाणी उपलब्ध असते. तर पाटाखाली क्षेत्राला विशिष्ट कालमर्यादेने पाणी मिळते. बागायती शेतीमध्ये वर्षातून दोन, तीन किंवा चार पिके घेतली जातात. त्यामुळे बागायती शेतीत जमिनीचा वापर जास्त होतो.

बागायती शेतीची उद्दिष्टये
बागायती शेतीमध्ये पिकांना योग्य वेळी पाणीपुरवठा देता येत असल्यामुळे पिकांची वाढ चांगली होते. 
बागायती शेतीत पिक उत्पादनाची हमी असते. 
बागायती शेतीत वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतल्यामुळे जमिनीचा पोत टिकून राहण्यास मदत होते.
बागायती शेतीतून आर्थिक उत्पन्न मोठया प्रमाणावर मिळते. त्याचबरोबर शेतकऱ्याला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्याचे महत्वाचे काम बागायती शेतीमधून होताना दिसते.


SHARE THIS

->"Irrigated Farming बागायती शेती"

Search engine name