Medicinal Plants - Arjun, Bell, Adulasa औषधी वनस्पती – अर्जुन, बेल, अडुळसा



अर्जुन, बेल, अडुळसा या औषधी वनस्पती आपल्यासाठी खुपच महत्वाच्या आहेत. आयुर्वेदात या वनस्पतींना मानाचे स्थान दिले गेले आहे. भारतात या वनस्पती सर्वात अधिक प्रमाणात आढळतात. विविध मानवी कारांवर गुणकारी असणाऱ्या या वनस्पती ग्रामीण भागात घराजवळ लावण्याची प्रथा आहे.

अर्जुन
अर्जुन ही सदाहरित वनस्पती भारतामध्ये सर्वत्र आढळते. प्रामुख्याने हा वृक्ष बिहार, हिमालय, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात आढळतो.
उपयोग:
o सालीचे चूर्ण व दुध यांचा काढा हा पोटाला मुकामार बसला तर उपयोगी आहे.
o सालीचा काढा दुधातून हृदयरोगावर अत्यंत उपयोगी असून त्याला हृदय टॉनिक म्हटले तरी वावगे होणार नाही. 
o हाड मोडले तर जोड सांधण्यासाठीही याचा उपयोग होतो.
o यांच्या पानांचा ताजा रस कान दुखत असेल तर उपयोगी पडतो.
o रक्तस्त्राव बंद होण्यासाठी अर्जुन सादडा पोटात देतात. याने रक्त शुद्धी चांगली होते.
o मार, ठेच, वृणशोध, हात-पाय मोडणे, या गोष्टी बऱ्या करण्यासाठी अर्जुनासारखे मौल्यवान दुसरे औषध नाही.

बेल
बेल हा वृक्ष हिमालय, सह्याद्री, सातपुडा पर्वतांच्या दरम्यान सर्व ठिकाणी आढळतो.
उपयोग:
o बेलाची मुळे, त्रिदोषामध्ये होणाऱ्या तापावर गुणकारी असून मुत्राविकार, पाठीच्या कण्यातील वेदना, दयाची धडपड इत्यादींवर गुणकारी आहे.
o बेलाचे मूळ पाणी पाचक असून वात आणि कफ यांचा नाश करते तसेच नेत्र विकार, बधिरता आणि त्वचेला येणारी सूज यासाठी गुणकारी आहे.
o बेलाची फुले तृष्णा, वामन आणि अतिसार इ. आजारात वापरतात.
o मेंदू आणि हृदयाच्या स्वास्थासाठी फळातील गर अतिशय लाभदायी आहे.

अडुळसा
याची फुले पांढरी असतात व फुलांना देठ नसतो. फळे टोकाला लागतात. 
o सर्व प्रकारचा खोकला, घशाचे आजार, कफाचा विकार, दम या रोगांवर अडुळसा हे रामबाण औषध आहे.
o अडुळसा हे संधिवात, गुडघेदुखी आदी दुखण्यांवरही उपायकारक आहे.
o सध्याच्या प्रदूषणाच्या काळात घशाचे विकार खूप प्रमाणात होत आहेत. अशा वेळेस आपणांस आपले परसबागेत, गच्चीवर, कुंडीत, अडुळशाची रोपे लावणे नितांत गरजेचे आहे.




SHARE THIS

->"Medicinal Plants - Arjun, Bell, Adulasa औषधी वनस्पती – अर्जुन, बेल, अडुळसा"

Search engine name