Sheli Palan शेळीपालन

भारतामध्ये विशेषतः ग्रामीण भागात अल्प भू – धारक, अत्यल्प भू – धारक, शेतमजूर व इतर गरीब कुटुंबे आपले आर्थिक जीवनमान सुधारण्यासाठी संकरित गायी पाळणे, कुक्कुटपालन यांसारखे जोड व्यवसाय करतात. शेळीपालन  हा त्यापैकी एक अत्यंत फायदेशीर पूरक व्यवसाय आहे. थोडया श्रमात जास्तीत जास्त आर्थिक लाभ मिळवून देणारा हा व्यवसाय आहे.

शेळीपालनाची वैशिष्टये 
शेळी कुठल्याही हवामानात जगू शकते. विशेषतः उष्ण व कोरडया हवामानात शेळीची वाढचांगली होते. 
शेळीच्या आहारात मुख्यत्वेकरून झाडांचा पाला असतो. त्यात बाभूळ, चिंच, पिंपळ, शेवरी, बोर, अंजन यांचा समावेश होतो.
शेळीसाठी जागा कमी लागते. भांडवल कमी लागते. 
शेळीचा गर्भकाळ इतर दुभत्या पाळीव जनावरांच्या गर्भकाळापेक्षा कमी म्हणजे १५० दिवस इतक्या कालावधीचा असतो व भाकडकाळ कमी असतो.
शेळीचे दुध पचनास हलके असते व लहान मुलांना देण्यासाठी अधिक उपयुक्त असते. 
शेळीच्या लेंडीखताला सेंद्रीय खत म्हणून फार किंमत आहे. टाक शेळी वर्षाला २०० किलो लेंडीखत देते. 

शेळ्यांचे व्यवस्थापन 
शेळ्यांना मोठया गोठयांची आवश्यकता नसते. उसाचे पाचट किंवा गवत वापरून तयार केलेले छप्पर, ऊन वाऱ्यापासून आडोसा होण्याइतपत चार फुट उंचीची भिंत व त्या ठिकाणी खाद्याची व्यवस्था इत्यादी सोयी असलेला गोठा शेळ्यांकरिता उत्तम आहे. 
बंदिस्त जागा प्रत्येकी १२ चौ. फुट व मोकळी जागा प्रत्येकी २५ चौ. फुट असावी. 
खाद्याचे  प्रमाण साधारणतः प्रतिदिनी हिरवा चारा तीन – चार किलो, वाळलेला चारा राक किलो. टाक लीटर पेक्षा जादा दुध देणाऱ्या शेळ्यांना १०० ते २०० ग्रामपर्यंत खुराक देणे आवश्यक आहे. 
शेवरी, अंजन, हदगा, बाभूळ, सुबाभूळ, बोर, वड व पिंपळ झाडांचा पाला व फळे शेतीला आवडतात. 
प्रत्येक शेळीस दर दिवशी तीन ते चार लीटर पाणी प्यावयास लागते. 

करडांची जोपासना 
करडू जन्माला आल्यानंतर नाळ कापणे, नख्या कोरणे व सहा तासांच्या आत पहिले दुध पाजणे महत्वाचे आहे. 
करडू जन्माला आल्यानंतर पहिल्या २४ तासांत पिईल तेवढा चिक त्यास पिऊ देणे आवश्यक असते.
करडयाच्या वजनाच्या राक अष्टमांश इतका चीक प्रत्येक दिवशी त्यास पाजणे गरजेचे आहे.
म्हणून शेळीपालन कमी जोखमीचा आणि उत्तम आर्थिक लाभ मिळवून व्यवसाय देणारा आहे. 

शेळ्यांच्या जाती
महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर मिळून  शेळ्यांच्या विविध जाती आढळतात. मांस व दूध देणाऱ्या जातींमध्ये महाराष्ट्रातील उस्मानाबादी, उत्तर-प्रदेशातील बारबेरी व जमनापारी, गुजरातमधील मलबारी, मेहसाना व झालावाडी, राजस्थानातील सिरोही, अजमेरी व कच्छी तर पंजाबातील बीटल सारख्या जातींचा समावेश होतो.
शेळी: जातीनिहाय वैशिष्ट्ये

महाराष्ट्रातील उस्मानाबादी शेळ्या त्यांच्या मांस व दुधासाठी सर्वदूर प्रसिद्ध आहेत. या शेळ्या भराभर वाढतात व वर्षभरातच ४०-५० किलो वजनाच्या होतात. या शेळ्यांमध्ये जुळे होण्याचे प्रमाण जास्त असल्याने त्या पाळण्यासाठी सर्व अंगाने परवडतात. जातिवंत उस्मानाबादी शेळ्या या रंगाने काळ्या असतात, तसेच त्यांची शिंगे मागच्या बाजूने वळलेली असतात. या शेळ्यांचे कान लांब असून त्यांवर ठिपके असतात.कोकणातील शेळ्यांमध्ये स्थानिक सुधारणा करून कोकण कन्याळ ही नवीन जात विकसित करण्यात आली आहे. या जातीचा पूर्ण वाढीचा बोकड ५२ तर शेळी ३२ किलो वजनाची भरते. कोकण कन्याळ शेळी १७ व्या महिन्यात पिलाला जन्म देते.या शिवाय मांस उत्पादनासाठी आसाम डोंगरी, काळी व तपकिरी बंगाली, मारवाडी, काश्मिरी, गंजभ या जाती चांगल्या आहेत

->"Sheli Palan शेळीपालन"

Post a Comment