*ग्रामपंचायतची माहिती*⭕⭕
*भाग क्रमांक-३*
*ग्रामपंचायत कार्यालयीन सेवा*
१. सेवा नाव : जन्म नोंद दाखला ।। मुदत - ५ दिवस ।। फी २० रु.
२. सेवा नाव : मृत्यू नोंद दाखला ।। मुदत - ५ दिवस ।। फी २० रु.
३. सेवा नाव : विवाह नोंद दाखला ।। मुदत - ५ दिवस ।। फी २० रु.
४. सेवा नाव : रहिवाशी दाखला ।। मुदत - ५ दिवस ।। फी २० रु.
५. सेवा नाव : दारिद्रय रेषेखाली असलेच दाखला ।। मुदत - ५ दिवस ।। निशुल्क
६.सेवा नाव : ह्यातीचा दाखला ।। मुदत - ५ दिवस ।। निशुल्क
७. सेवा नाव : ग्रामपंचायत येणे बाकी दाखला ।। मुदत - ५ दिवस ।। फी २० रु.
८. सेवा नाव : शौचालय दाखला ।। मुदत - ५ दिवस ।। फी २० रु.
९. सेवा नाव : नमुना ८ चा दाखला ।। मुदत - ५ दिवस ।। फी २० रु.
१०. सेवा नाव : निराधार असलेला दाखला ।। मुदत - २० दिवस ।। निशुल्क
११. सेवा नाव : विधवा असलेला दाखला ।। मुदत - २० दिवस ।। फी २० रु.
१२. सेवा नाव : परित्यक्ता अ
सल्याचा दाखला ।। मुदत - २० दिवस ।। फी २० रु.
१३ सेवा नाव : विभक्त कुटूंबाचा दाखला ।। मुदत - २० दिवस ।। फी २० रु.
ग्रामपंचायतीचे उत्पन्न
१. कोणत्याही ग्रामपंचायतीचा कारभार करावयाचा म्हटले की खर्च आला. ज्यात कर्मचाऱ्याचे पगार, विविध प्रकारची खरेदी, विकास कामे इ. परंतू असा खर्च भागविणे प्रत्येक ग्रामपंचायतीला शक्य होत नाही.
२. ज्या ग्रामपंचायतीत मोठी प्रकल्प, औद्योगिक प्रयोजन, लघुउद्योग इ. आहेत तेथे उत्पन्नाचा मोठा स्रोत उपलब्ध होतो. परंतू सर्वच ग्रामपंचायती अशा असत नाहीत. म्हणून ग्रामपंचायतीने आपले उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी विविध प्रकारे उपाययोजना करणे आवश्यक आहे.
३. आजही अनेक ग्रामपंचायती दुर्गम भागात आहेत परंतू तेथील तरुणांनी बचत गटाच्या व इतर माध्यमातून लघुउद्योगातून प्रगती केली आहे.
४. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचे प्रमुख मार्ग हे कर, पट्टी, भाडे, दंड आदींच्या स्वरूपात आहेत. कर व भाडेतत्वाने दिलेल्या जागा या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी उभा राहून ग्रामपंचायतीला त्या रकमेतून आपला खर्च भागवावा लागतो.
५. यात्रा, उत्सव, बाजार, सर्कस, तमाशा आदींच्या माध्यमातूनही चांगल्या प्रकारे कर, भाडे जमा होते या प्रकरणात सर्वच बाबींचा विचार केला आहे.
ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक
ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करताना घ्यावयाची दक्षता :
१. ग्रामपंचायतीच्या निधीमध्ये घरपट्टीच्या वाढीव दरामुळे बऱ्यापैकी वाढ झाली आहे. पंचायतीच्या उत्पन्नच्या बाबी पासून किती उत्पन्न मिळणार आहे व ते कोणत्याही बाबीवर खर्च करावयाचे आहे याचा विचार केला तरच आर्थिक शिस्त पाळली जाते.
२. राज्य शासनाचे पंचायतीच्या अंदाजपत्रकाप्रमाणे काही नियम केलेले आहेत त्याचा गोषवारा खालीलप्रमाणे आहे.
३. ग्रामपंचायतीने दरवर्षी ३१ डिसेंबर रोजी किंवा त्यापूर्वी नमुना नं. १ मध्ये अंदाजपत्रक तयार करून ते पंचायत समितीला सादर करावयाचे असते.
४. जर ग्रामपंचायत अंदाजपत्रक तयार करून सादर करू शकत नसेल तर पंचायतीच्या चिटणिसाने तयार करून वरील प्रमाणे सादर करावे.
५. पंचायतीला नमुना नं १ मध्ये नमूद केलेल्या बाबी पासून मिळणारे उत्पन्न व खर्चाची अंदाजे व्याप्ती याचे विवरण देणेचे आहे.
६. अंदाजपत्रकामधे पंचायतीच्या आस्थापनेवरील खर्च, ग्रामनिधीत द्यावयाचे अंशदाम, ग्राम निधीतून कर्ज घेतले असल्यास त्याची परतफेड, मागासवर्गीयांवर करावा लागणार १० टक्के खर्च पिण्याच्या पाण्याची नळ योजना, विदयुत पंप, हातपंप दुरुस्त करणेसाठी जिल्हा परिषदेच्या देखभाल दुरुस्ती शीर्षकामधे जमा करणेची रक्कम T.C.L खरेदीसाठी लागणारी रक्कम याचा काळजीपूर्वक अंदाजपत्रक समितीला सादर करायचे असते.
७. पंचायत समितींने असे प्राप्त झालेले ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक त्यात फेरबदल करून मान्य केले पाहिजे
८. ग्रामपंचायतीला पुर्नविनियोजना अंदाजपत्रक तयार करता येते. मात्र त्याला वरील प्रमाणेच पंचायत समितीची मान्यता द्यावी लागेल.
९. अशा रीतीने पंचायत समितीने मान्य केलेल्या अंदाजपत्रकातील बाबीवर पंचायतीला खर्च करता येईल.
१०. राज्य शासनाने ग्रामसभेला महत्त्वाचे अधिकार दिलेले आहेत त्याप्रमाणे असे तयार केलेले अंदाजपत्रक ग्रामसभेपुढे माहितीसाठी ठेवायचे आहे.
* ग्रामपंचायत अर्थसंकल्प व लेखे - कायदा ६२, ६२ - अ व अंदाजपत्रक हिशोब नियम १९५९
- ग्रामपंचायतीचे निधीचे हिशेब विहित नमुन्यात ठेवण्याचे काम सचिवाने आहे.
१. ग्रामपंचायतीच्या हिशोबाचे वर्ष १ एप्रिल पासून सुरु होते व ३१ मार्चला संपते.
२. सचिवाने पंचायतीचे वार्षिक हिशेब प्रतिवर्षी १ जुन रोजी किंवा तत्पूर्वी विहित नमुन्यात (न. नं. ३ व ४ मध्ये) पंचायत समिती व जिल्हा परिषदेस सादर करण्याचे असतात
३. ग्रामपंचायत निधीतून ५०० रुपयांपेक्षा अधिक असलेले प्रदान (खर्च) धनादेशाद्वारे (चेकने) करण्यात येईल.
४. प्रत्येक ग्रामपंचायतीने ग्रामनिधीचे हिशेब कलम ६२ नुसार खालील नमुना नं १ ते २७ मध्ये ठेवले पाहिजेत.
->"ग्रामपंचायतची माहिती भाग क्रमांक-३"