महाराष्ट्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना नवीन जी.आर. लागू

*महाराष्ट्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना नवीन जी.आर. लागू करण्यात येणार आहे. त्याबद्दल माहिती खालील प्रमाणे.*
१. ऊस गळीत २०१६-२०१७ साठी एफ.आर.पी. नुसार एक टन ऊसाचा भाव रुपये २५००/- होता.
२. चालू वर्षी म्हणजेच ऊस गळीत हंगाम २०१७-२०१८ साठी एफ.आर.पी. नुसार एक टन ऊसाचा भाव रुपये २७५०/- असणार आहे.
३. त्याचबरोबर जे ऊस उत्पादक ऊसाचे क्षेत्रात  ठिबक सिंचन करून उत्पन्न घेणार आहेत त्यांना एफ.आर.पी. नुसार एक टन ऊसाचा भाव रुपये ३०००/- मिळणार आहे.
*सादर निर्णयात शेतकरी बांधवांचा फायदा कसा होईल?*
१. साधारणपणे मोकळ्या पाण्यावर उसाचे एकरी उत्पन्न ५०टन मिळते.
तर एकूण मिळणारे पैसे--
२७५०/- प्रति टन भाव, २७५० × ५० = १३७५००/-.
खर्च---
समजा २गुंठे बेणे लागले एक एकर साठी
तर बेण्याचा खर्च १००००/-.
एकरी लागणारे खत, औषधे, फवारे= २००००/-
मजुरी, मशागत= २०००० /-
एकूण खर्च= ५००००/-
३.आता एकूण राहिलेला नफा = एकूण आवक - खर्च                   =१३७५००-५००००
=८७५००/-

(कर्ज वगळता)
*आता ठिबक अंतर्गत उत्पन्न घेतले तर होणारे फायदे*
१. ठिबक अंतर्गत उत्पन्न घेतल्यास उत्पन्नात ३०% वाढ होते.
२. ठिबक अंतर्गत पाण्याची, वेळेची व तसेच आपण उसासाठी जे जैविक रासायनिक खते वापरतो त्यांचीही बचत. ६०%मजुरीही वाचते.
३. विजेचा पाण्याचा वापर योग्य प्रमाणातच होतो.
४. जमिनीची सुपीकता वाढते. औषध कमी प्रमाणात लागते.
*ठिबक सिंचन करिता एकरी खर्च साधारणपणे ५००००/- येतो.*
*शासकीय सबसिडी ५५% व तीही ३महिन्यात खात्यात जमा होते (निधी खूप प्रमाणात शिल्लक आहे त्यामुळे)*
*म्हणजे एकूण मिळणारे पैसे साधारणपणे २७५००  म्हणजे पदरचे होणार खर्च= २२५००/-*

*ठिबक केले तर उत्पन्नात कसा परिणाम होतो*
१. एकरी ३०% उत्पन्न वाढते म्हणजेच ५०टन मिळणारे उत्पन्न होणार ६५ टन.
२. पाणी बचत होते त्यामुळे पाणी व्यवस्थापन इतर पिकांना उपयोगी पडेल.
३. मजुरी कमी लागते. कारण एकावेळेस पाणी भरण्यासाठी एकरी एक माणूस लागतोच व एक एकर व्यवस्थित भरण्यासाठी २ ते २.५ दिवस लागतात. मजुरी ३००/- रोजाने ७५०/- महिन्यातून २ पाणी. १२ महिन्याचे २४ते २५ पाणी. म्हणजेच मजुरी= २५×७५० = १८७५०/-
हाच खर्च होणारच नाही. म्हणजे १८७५०/- ची बचत. म्हणजे वरील एकूण नफ्यात हे वाढणार.
त्यामुळे नफा होणारे= ८७५०० + १८७५०
= १०६२५०/-
४. लागणारी खते फवारे उदा. १०:२६:२६,१२:३२:१६, यूरिया, तणनाशक यांचे प्रमाण निम्मे होणार म्हणजे २००००/- होणारा खर्च १००००/- एवढाच होणार म्हणजे १००००/- ची बचत. म्हणजे होणार नफा= १०६२५० + १०००० = ११६२५०/-.
वरील हिशेब झाला २७५०/- प्रति टन दराने.
परंतु ठिबक असल्यास ३०००/- प्रति टन दर भेटणार.
तेव्हा एकरी ६५ टन चे होणार ६५×३०००= १९५०००/-
यात खर्च केवळ.
एकरी बेण्याचे १००००/- व लागणारी खते फवारे यांचा १००००/- म्हणजे २००००/-
तेव्हा एकूण नफा राहतो १९५००० - २००००= १७५०००/-
म्हणजे मोकळ्या पाण्यावर मिळणारा नफा ८७५०० च्या दुप्पट. म्हणजे ठिबक ला येणार खर्च ३२५००/- जाऊन तुम्हाला मिळतात ८७५००-३२५००= ५५०००/- वाढीव.

तर विचार करा आणि आधुनिक तंत्राचा शेतीसाठी उपयोग करा.

SHARE THIS

->"महाराष्ट्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना नवीन जी.आर. लागू "

Search engine name