आले (आद्रक) लागवड, उत्पादन, बेणे साठवण व प्रक्रिया
भारत हा देश फार पूर्वीपासून मसाल्याच्या पिकांचा देश म्हणून ओळखला जातो. मसाल्यांच्या पिकांमध्ये मिरी, दालचिनी, वेलची, लवंग, आले, हळद इ. पिकांना मानाचे स्थान आहे. आले हे देखील एक महत्त्वाचे पीक आहे. भारतामध्ये आल्याचा वापर कमी -जास्त प्रमाणात सर्वत्र केला जातो. त्यामुळे आल्याची लागवड ही जम्मू - काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत केली जाते. आल्याची व्यापारी दृष्टीकोनातून लागवड मुख्यत: केरळ, ओरिसा, मेघालय, पश्चिम बंगाल, अरुणाचाल प्रदेश इ. राज्यामध्ये केली जाते. भारताच्या एकूण उत्पादनाच्या ४०% उत्पादन केरळ व मेघालयात घेतले जाते.
महाराष्ट्रातही आले एका पैसे मिळवून देणारे पीक म्हणून शेतकरी त्याकडे आकर्षित होऊ लागले आहेत. महाराष्ट्रा प्रामुख्याने सातारा, सांगली, रायगड, ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यामध्ये आल्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. आल्यापासून मिळणाऱ्या आर्थिक मोबदल्याचा विचार करता खानदेश व विदर्भातही या पिकाखालील क्षेत्रात वाढ होताना दिसून येत आहे.
आयुर्वेदिक गुणधर्म : आल्याचे आयुर्वेदातील स्थान महत्त्वाचे आहे. आल्याचा वापर मुख्यत: सर्दी, खोकल्यावरील औषधे तसेच पेय बनविण्यासाठी, जैविक किटकनाशकांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे आल्याचे महत्त्व दिवसेंदिवास वाढतच आहे.
आल्याचा वास व तिखटपणा आल्हाददायक असतो. आले पाचक असल्याने अनेक पदार्थात आल्याचा उपयोग करतात. आल्याचा किंवा सुंठीचा काढा पाच मिनिटे पाण्यात उकळून करतात. या उष्ण पेयामुळे रक्ताभिसरणात सुधारण होते. सर्दी, पडसे नाहीसे होते. डोकेदुखी थांबते. आल्यात जंतुनाशक व उत्तेजक गुणधर्म आहेत. आल्याच्या तेलाचा उपयोग सुगंधी द्रव्यात व कन्फेक्शनरीमध्ये होतो. अतिसारावर आल्याच्या रसाचा बेंबीवर लेप करावा. आल्याचा रस व मध सम प्रमाणात बाटलीमध्ये साठवून २ -२ चमचे २ वेळा घेतल्यास सर्दी, खोकला पडसे व स्वरभंग बरे होतात. अजीर्ण झाल्यास आल्याचे रसात लिंबाचा रस व मीठ घालून पाणी प्यावे. आले तोंडात ठेवताच लाळग्रंथी सक्रिय होतात. लाळ पाझरू लागते. आल्याचे सेवनाने पोटात गॅस तयार होत नाही. पोटदुखी व मळमळ ह्या विकासात उपयोगी आहे. आल्यामुळे चहा सुगंधी व स्वादिष्ट बनतो. त्यातील निकोटीनचे प्रमाण कमी होते.
हवामान : आल्यास उष्ण व दमट हवामान मानवते, पण जेथे ओलीताची सोय आहे अशा उष्ण आणि कोरड्या हवामानातही आल्याची लागवड यशस्वी करता येते. समुद्रसपाटीपासून ते १५०० मीटर उंचीपर्यनच्या प्रदेशात आले चांगले येऊ शकते.
तापमानाचा विचार करता आले लागवडीच्या कालावधीतील एप्रिल - मे ३० डी. ते ३५ डी. से. तापमान फुटवे फुटून उगवण चांगली होण्यासाठी उत्तम असते. आल्याच्या वाढीसाठी सरासरी २० डी. ते ३० डी. से. तापमानाची आवश्यकाटा असते. थंडीच्या दिवसातील कोरडे व थंड हवामान जमिनीतील कंद उत्तम प्रकारे पोसण्यासाठी अनुकूल असते. या पिकास लागवडीपासून काढणीपर्यंत सरासरी १५० ते ३८० सें. मी. पाऊस पुरेसा ठरतो. जास्त पावसाच्या प्रदेशात विशेषत: कोकणात हे पीक पावसाच्या पाण्यावरही घेतले जाते. परंतु जमिनीमध्ये पाणी साठून राहिल्यास याचे कंद कुजण्यास सुरुवात होते, म्हणून जास्त पावसाच्या प्रदेशात पाण्याचा उत्तम निचरा होणे आवश्यक आहे. साधारणत: २५% सावलीच्या ठिकाणी आल्याचे पीक उत्तम येते. परंतु आल्याच्या पिकास दिवसाचा सुर्यप्रकाश जास्त मिळाल्यास आल्याचा सुवास कमी होतो, असे प्रयोगांती आढळून आले आहे.
जमीन : आल्यास चांगली निचरा होणारी मध्यम प्रतीची भुसभुशीत, कसदार जमीन मानवते. नदीकाठची गाळाची जमीनदेखील कंद वाढण्याच्या दृष्टीने योग्य आहे. हलक्या जमिनीत भरपूर शेणखत व कंपोस्ट खत घातल्यास तसेच हिरवळीच्या खताचे पीक घेतल्यास हे पीक चांगले येते. आले लागवडीसाठी जमिनीची खोली कमीत - कमी ३० सें.मी. असावी. या पिकाच्या लागवडीसाठी आम्लधर्मी, खारवट, चोपण जमिनी शक्यतो टाळाव्यात. कोकणातील जांभ्या खडकापासून तयार झालेल्या जमिनीत तसेच तांबड्या पोयाट्याच्या जमिनीत या पिकाचे चांगले उत्पादन मिळते. या पिकासाठी किंचीत आम्लयुक्त सामू असलेली जमिन (सामू ६.५ ते ७) मानवते. कंदवर्गीय पीक असल्यामुळे कंदाची चांगली वाढ होण्यासाठी जमिनीत हवा खेळती राहणे गरजेचे असते. चुनखडक असलेला जमिनीत पीक चांगले येते, परंतु त्यावर पिवळसर छटा कायम दिसते. जमीन निवडताना त्यामध्ये लव्हाळा, हराळी, कुंदा इत्यादींसारखा बहुवार्षिक तणांचा प्रादुर्भाव नसावा.
आल्यामध्ये
प्रचलित अशा प्रमुख जाती
आल्याच्या
सुधारीत जाती :
->"आले (आद्रक) लागवड"
Post a Comment