लागवडीचा हंगाम आणि लागवडीची वेळ : ठिकठिकाणच्या स्थानिक प्राप्त परिस्थितीनुसार आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार आल्याची लागवड १४ एप्रिलपासून ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केली जाते. त्यानंतर मात्र आल्याची लागवड केल्यास कंदमाशी व कंदकूज यांचा पादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झालेला आढळून येतो.
सातारा जिल्ह्यात शेतकरी आल्याची लागवड साधारणपणे एप्रिलच्या पहिल्या पंधरवाड्यात करतात. अहमदनगर जिल्ह्यात मे चा दुसरा आठवडा लागवडीसाठी योग्य असल्याचे प्रयोगाअंती दिसून आले आहे. आले उगवणीसाठी उष्ण हवा, वाढीसाठी उष्ण व दमत हवा लागत असल्याने पावसानंतर कीड जास्त पडत असल्याने आल्याचे पीक पावसाअगोदर उगवून स्थिर होईल अशा दृष्टीने लागण केली जाते.
लागवडीसाठी निरोगी बियाण्याची निवड करावी. कुजलेले, अर्धवट सडलेले बियाणे लागवडीसाठी वापरू नये. मातृकंदापासून बियाण्याचे तुकडे वेगळे करावेत. बियाणे निवडतान कंदाचे वजन २५ ते ५५ ग्रॅमच्या दरम्यान असावे. तसेच लांबी २.५ ते ५ सें.मी. असावी. बियाणे सुप्तावस्थ संपलेले २ ते ३ डोळे फुगलेले निवडावे. लागवडीसाठी २५ क्विंटल / हेक्टरी आले बियाणे लागते. लागवडीच्या वेळेपर्यंत या बियाण्याच्या वजनात घट होवून साठवणुकीच्या पध्दतीनुसार त्याचे वजन १५ ते १८ क्विंटल भरते. आल्याची लागवड करताना कंदावरील डोळा वरती आणि बाहेरच्या बाजुला असल्यास त्या डोळ्यापासून निपजणारा कोंब मजबूत असतो आणि त्याची वाढही चांगली होते. याउलट जर डोळा खाली आणि आतल्या बाजुला राहिल्यास डोळा लहान आणि कमकुवत राहतो. कंद ४ ते ५ सें.मी. खोल लावावे. लागवडीच्यावेळी कंद पूर्ण झाकले जातील याची दक्षता घ्यावी.
बीजप्रक्रिया : जमिनीत लावलेले बेणे सोडू नये, म्हणून बीजप्रक्रिया करावी लागते. मऊसड (सॉफ्ट रॉट). यामुळे बेणे सडण्याचा संभव असतो. त्यासाठी १०० लि. पाण्यामध्ये १ लि. जर्मिनेटर आणि ५०० ग्रॅम प्रोटेक्टंट घेऊन त्या द्रावणात १० ते १५ मिनिटे बेणे बुडवून ठेवावे. नंतर पाणी निथळून ते बेणे लावणीसाठी वापरावे. साधारणपणे बेणे ३० ते ३५ दिवसात उगवते, पण जर्मिनेटरची बीजप्रक्रिया केल्यामुळे १८ -१९ दिवसात उगवते.
सेंद्रिय खते : मध्यम ते हलक्या जमिनीत शेणखत किंवा कंपोस्ट खत वरीलप्रमाणे टाकून कल्पतरू सेंद्रिय खत लागणीपुर्वी एकरी ५० किलोच्या २ ते ३ बॅगा आणी लागणीनंतर २ ते २।। महिन्याने उटाळणीच्यावेळी एकरी ५० किलो आणि त्यानंतर २।। ते ३ महिन्यांनी पुन्हा ५० किलो कल्पतरू खत द्यावे. जमीन भारी असेल तर लागणीपुर्वी २ बॅगा आणि २।। ते ३ महिन्यांनी १ ते २ बॅगा द्याव्यात. त्यानंतर २ ते २।। महिन्याने १ म्हणजे आल्याची वाढ, फणीचे पोषण चांगल्या प्रकारे होऊन आले लागण्याचा प्रादुर्भाव कमी होतो.
तणनाशकाचा वापर : आले पिकामध्ये शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागतो. शेणखतात तणांचे बी असल्यामुळे आले लागवडीनंतर दुसर्याि ते तिसर्याप दिवशी जमीन ओलसर असताना अेट्राझीन हे तणनाशक एक लिटर पाण्यामध्ये ४ ते ५ ग्रॅम घेवून फवारणी करावी. त्याचाप्रमाणे लागवडीनंतर १२ ते १५ दिवसांनी ग्लायफोसेट १ लिटर पाण्यामध्ये ४ ते ५ मिली घेवून फवारणी केल्यास पहिली फवारणी करूनसुध्दा त्यातून उगवलेल्या तणांचा नायनाट होतो.एकदा आले उगवण्यास सुरुवात झाली की, कोणत्याही प्रकारच्या तणनाशकाचा वापर शक्यतो टाळावा.
पाणी व्यवस्थापन : आले पिकाची लागवड जास्त पावसाच्या प्रदेशात जिरायती केली जाते, तर कमी पावसाच्या प्रदेशाच्या मात्र पाणी देण्याशिवाय पर्याय राहत नाही. आल्याची लागवड एप्रिल -मे महिन्यात करत असल्यामुळे पावसाची सुरवात होईपर्यंत सुरूवातीच्या काळात या पिकास पाणी देणे गरजेचे असते. कारण मुळांना स्थिरता प्राप्त होण्यासाठी आणि चांगला तग धरून राहण्यासाठी हा कालावधी महत्त्वाचा असतो, म्हणून लागवडीनंतर आंबवणीचे पाणी जमिनीच्या मगदुरानुसार तिसर्याय - चौथ्या दिवशी लगेच द्यावे. पावसाळ सुरू झाल्यानंतर पावसाचे पाणी जमिनीमध्ये साठून राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. पावसामध्ये १०ते १२ दिवस खंड पडल्यास या पिकास पाणी द्यावे. हिवाळ्यात १२ ते १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
आधुनिक सिंचन पद्धतीने पाणी द्यावयाचे झाल्यास तुषार सिंचन, ठिबक सिंचन यासारख्या पद्धतींचा अवलंब करावा. गादीवाफा पद्धतीने या पिकाची लागवड करावी, एका गादीवाफ्यावर दोन ठिबक सिंचनाच्या नळ्या टाकाव्यात आणि २ लि. / तास एवढेच पाणी देणार्याष तोट्या बसवाव्यात. जमिनीच्या मगदुरानुसार हा संच सुरुवातीस अर्धा ते पाऊण तास सकाळ - संध्याकाळ आणि त्यानंतर एक ते दीड तास चालवावा.
आंतरमशागत : तणनाशकांचा वापर केला नसल्यास वेळच्या वेळी चेणारी तणे खुरपणी करून काढून टाकावीत. आले पिकत उटाळणी करणे ही गरजेचे असते. त्यामध्ये लांब दांड्याच्या खुरप्याने माती हलवली जाते. त्यामुळे मुळ्या तुटून त्याठिकाणी नवीन तंतुमयमुळे फुटतात. आले पिकांमध्ये उटाळणी पीक २.५ ते ३ महिन्याचे असताना करावे. या पिकास ६ व्या ते ७ व्या महिन्यात फुले येतात त्यास 'हुरडे बांड' असे म्हणतात. उशीरात उशीरा उटाळणी हुरडे बांड येण्यापूर्वी करावी. हुरडे बांड फुटल्यानंतर या पिकाच्या पानांची वाढ थांबून फण्यांची वाढ होण्यात सुरुवात होते. उटाळणी केली नाही तर उत्पादनामध्ये १० ते १५ टक्के घट येते. उटाळणीनंतर पाण्याचा हलका ताण द्यावा, म्हणजे फुटवे चांगले फुटतात.
आंतरपिके : आल्याचे पीक २५ % सावलीच्या भागामध्ये चांगल्या प्रमाणात वाढते. त्यामुळे हे पीक नारळ, सुपारी, कॉफी इत्यादीच्या बागेमध्ये घेतल्यास उत्पादनात वाढ होते.आल्यामध्ये आंतरपीक म्हणून कोथिंबीर, झेंडू मिरची,,तूर गवार यासारखी पिके घेतात. आंतरपिकाची मुख्य पिकाशी स्पर्धा होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
संजीवकांचा वापर : आल्याच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी तसेच आल्यामधील तंतुचे प्रमाण कमी करण्यासाठी २% युरिया आणि ४०० पी. पी. एम. प्लॅनोफिक्सचे मिश्रण लागवडीनंतर ६० आणि ७५ व्या दिवशी फवारावे. तसेच फुटव्यांची संख्य वाढण्यासाठी २०० पी. पी. एम. इथ्रेलची ७५ व्या दिवसापासून १५ दिवसांच्या अंतराने ३ फवारण्या कराव्यात.
->"आले लागवडीचा हंगाम आणि लागवडीची वेळ"