*खबरदार..जर यापुढे शाळांमध्ये धार्मिक कार्यक्रम घ्याल तर..!*
- जिंतुर गटविकास अधिकार्यांचा ऐतिहासिक निर्णय, ३४७ शाळांना दिले लेखी आदेश.
-धार्मिक कृत्यातून ज्ञान मंदिर झाले मुक्त, आता यापुढे ज्ञान मंदिरात देव बाप्पांना.. *नो एंट्री*
- जिंतुर गटशिक्षणाधिकारी सापडले निलंबनाच्या जाळ्यात.. प्रकरण सीईओंकडे वर्ग.
-बी एस फोर संघटनेच्या अविरत संघर्षाला मिळाले ऐतिहासिक यश.
*जिंतुर(परभणी)*
दि-१८/०९/१७
शिक्षण संस्थेत धार्मिक सण-उत्सव देवी-देवतांचे पूजन करण्यावर पूर्णतः बंदी असतांना देखील जिंतुर तालुक्यातील काही शाळांमध्ये गणेशोत्सव, गोपालकाला, दहीहंडी, नवरात्र यासारखे धार्मिक उत्सव प्रथा आणि परंपरेच्या नावाखाली गेल्या कित्येक वर्षांपासुन शाळांमध्ये राबविन्यात येत होते. याबाबत जिंतूर तालुक्यातील बी एस फोर या पुरोगामी संघटनेने गेल्या दोन वर्षांपासुन प्रकरणाचा लोकशाही मार्गाने पाठपुरावा करुन अखेर स्थानीक शिक्षण विभागाला जागे केले आहे.
सतत दोनवर्ष निवेदन अर्ज देऊन सुद्धा गटशिक्षणाधिकारी दखल घेत नसल्याने १६/०९ पासून बी एस फोर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिंतुर गटविकास अधिकारी यांच्या दालना समोर ठान मांडून लोकशाही मार्गाने सतत तीन दिवस अन्नत्याग करुन आपला रोष व्यक्त केला. यावर जिंतुर गटविकास अधिकारी यांनी भारतीय संविधान आणि शासन आदेशाधीन गैरकृत्याला पावबंद म्हणून जिंतुर तालुक्यातील खाजगी अनुदानीत आणि शासनाच्या सर्व शाळांमध्ये धार्मिक पद्धतीच्या सर्व सण-उत्सव-पूजन यांवर पूर्णतः बंदी असल्याचे सांगून असे कृत्य यापुढे करणारांवर कडक कार्यवाही करण्याचे आदेश जिंतुर तालुका गटसाधन केंद्र अंतर्गत कार्यरत असणाऱ्या एकूण 17 केंद्रप्रमुखांना आदेशीत केले आहेत.शिवाय तालुक्यातील 17 केंद्रातिल एकूण 347 शाळांपैकी ज्या शाळांनी मागील काळात धार्मिक सण उत्सव साजरे केले आहेत,अशा शाळांची माहीती घेऊन आदेश मिळाल्या पासून तीन आठवड्याच्या आत सिद्ध दोषी शाळेचा अहवाल मागवून त्यांचेवर कडक कार्यवाही करण्याचे सुनावले आहे.
बी एस फोर संघटनेने केलेल्या जिंतुर गटशिक्षणाधिकारी यांच्या निलंबनाच्या मागणी अनुषंगाने गटशिक्षणाधिकारी यांनी अद्याप पर्यंत आलेल्या अर्ज निवेदनावर कुठलीही ठोस भूमिका घेतली नसल्यामुळे गटशिक्षणाधिकारी यांनी आपल्या दिरंगाईचा खुलासा करुन, गटविकास अधिकारी पंस जिंतुर कार्यालयात तात्काळ अहवाल सादर करावा असे सुचित केले आहे. त्यानंतर परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अभिप्रायानुसार पुढिल कार्यवाही करण्याचे सांगितले आहे.
->"खबरदार जर यापुढे शाळांमध्ये धार्मिक कार्यक्रम घ्याल तर"