KFC(केंटकीज फ्राईड
चिकन )
आलं ना तोंडात पाणी
आलं ना तोंडात पाणी
KFC च्या मालकाने वयाच्या 65 व्या वर्षी हा व्यवसाय सुरू केला ...आज जगभरात 80 पेक्षा जास्त देशात आणि 11000 पेक्षा जास्त रेस्टोरंट उभारून आपल्या गरीब परिस्थितीच रूपांतर प्रचंड मोठया श्रीमंतीत केलं आहे
आपल्या *यशाचं रहस्य* सांगताना कर्नल सँडर्स सांगतात
......"नकार आला म्हणून थांबू नका ! नापास झाला म्हणून रडू नका!वय झालं म्हणून हात- पाय गाळून बसू नका .यशासाठी पैसे लागत नाहीत .यशाच्या आड तुमच शिक्षण ,पदवी अथवा वय कधीच येत नाही .नशिबाने नाही तर कष्टाच्या -प्रयत्नाच्या बळावरच यश मिळत आणि नशीब उघडत .
कोणतेही काम कधीच छोट नसतं. छोटी कामचं मोठ कार्य सिद्धीस नेण्यास कारणीभूत असतात. पडेल ते काम करा .मिळेल ते घ्या ,मर्यादा आखू नका, नियमात आडकू नका.लक्षात असू द्या *यशाला नियम नसतात*.रुळलेल्या वाटेवरून यश गाठता येत हा भ्रम आहे .
इतर काय करतात हे पाहू नका तुम्ही काय करू शकता हे पहा ,कार्याची पणती सतत तेवत ठेवा *त्या प्रकाशात यश उजळत*
->"KFC(केंटकीज फ्राईड चिकन )"
Post a Comment