ऑनलाईन लाॅन्ड्री व्यवसाय ही कल्पना योग्य आहे का ? GARMENT WASHING SERVICE

 GARMENT WASHING SERVICE

ऑनलाईन लाॅन्ड्री व्यवसाय ही कल्पना योग्य आहे का ?


लाॅन्ड्री व्यवसायाची अंदाजे बाजारपेठ २, २०, ००० कोटी रुपये इतकी आहे, ते ही असंघटीत घटक धरून (धोबी, कामवाल्याआणि काही छोटी दुकानं) ५००० कोटी रुपये इतकी त्याची किंमत आहे. हे क्षेत्र ७,६७,००० अशा आस्थापनांमध्ये विखुरलं गेलं आहे. यापैकी ९८ टक्के व्यावसायिकांचा व्यवसाय हा अगदी लहान स्वरूपाचा आहे, म्हणजे त्याठिकाणी १० पेक्षा कमी कामगार काम करतात, असं युरोमाॅनिटर या अांतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालात म्हटलं आहे.
जबॉन्गचे संस्थापक प्रवीण सिन्हा यांनी ऑनलाईन लाॅन्ड्री व्यवसायात गुंतवणूक केली. या क्षेत्रापैकी २ ते ३ टक्के व्यवसाय संघटीत आहे. या संघटीत व्यवसायापैंकी २५ टक्के व्यवसाय ऑनलाईन आहे. यामध्ये व्यवसाय वृद्धीला वाव आहे.
भारतात ऑनलाईन धोबी व्यवसाय वाढीला उपयुक्त घटक आहेत.
ग्राहक केंद्रित सेवा देऊन स्मार्ट फोन आणि इंटरनेटच्या माध्यमातून या व्यवसायात प्रवेश केला तर भारतात मोठ्या प्रमाणावर वाव आहे.
मागणी तसा पुरवठा मग त्या किराणामाल, खाद्य पदार्थ किंवा इतर गोष्टी.
उत्पन्नात वाढ होत आहे आणि स्थानिक पुरवठादारांवर अविश्वास.
घरकामाला मोलकरीण मिळणं कठीण झालं आहे आणि स्थानिक लाॅन्ड्री व्यावसायिकांकडे महागातील कपडे धुवून देण्याची सोय नाही.
एकाच ठिकाणी कपड्यांच्या संबंधित कामं करून दिली जात नाहीत.
वासप: सध्या रोज ७०० ऑर्डर्स येतात, ६ शहरांमध्ये त्यांची सेवा असून मुंबईतील लाॅन्ड्री सेवा देणाऱ्या चमक या आस्थापनाला अधिग्रहण केलं आहे.
आपका धोबी : यांच्याकडे १५०० ग्राहक असून रोज ४० ते ४५ व्यवहार होतात.
पिक माय लाॅन्ड्री: रोज २५०० कपड्यांची कामं केली जातात, तसंच यामध्ये दर महिन्याला ३० टक्के वाढ होत असून ७० टक्के ग्राहक टिकून आहेत.
अर्बन धोबी: २००० ग्राहकांना आकर्षित केलं असून, ७०० नियमित ग्राहक आहेत. तर प्रत्येक कामाचे ३०० रुपये आकारले जातात.
डिर्क दा धोबी: रोज ५०० कडपे धुवून देण्याची क्षमता असून सहा महिन्यात २०० ग्राहक बनवले आहेत.

डोरमिंट : यांचे ५० कर्मचारी असून रोज २०० कामं करून देतात.
टूलर : आठवड्याभरात रोज ५० कामं करून देतात तर शनिवार रविवार याच्या दुप्पट काम असतं, एका तिकिटासाठी सरासरी ३०० रुपये आकारले जातात. ३ महिन्यात साडेतीन हजार ग्राहकांनी हे एप डाऊनलोड केलं आहे.
लाॅन्ड्री अण्णा : रोज २५ ते ३० कामं करून दिली जातात तर एका कामाचे साधारण ४०० रुपये आकारले जातात, आणि दर महिन्याला ग्राहकांमध्ये २५ टक्क्यांनी वाढ होत आहे.
संधी आणि आव्हानं
सध्या लाॅन्ड्री व्यवसायाच्या बाजारपेठेवर स्थानिक व्यावसायिकांचं वर्चस्व असून ते नफा कमवत आहेत. जो दर हे व्यावसायिक आकारतात तो मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करण्यास योग्य नाही. जे ऑनलाईन धोबी व्यवसाय करत आहेत ते किफायतशीर किंमत लावून दरामधील फरक कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसंच या छोट्या व्यावसायिकांच आव्हान स्वीकारून दीर्घ काळ या व्यवसायात टिकून राहता येईल याची सोय करत आहेत.

डिर्क दा धोबी चा संस्थापक रोमिल भाकुनी सांगतो, "गेल्या काही वर्षात अनेक लाॅन्ड्री व्यावसायिक नव्याने आले आहेत, आणि आम्ही या अवाढव्य बाजारपेठेतील किमान ग्राहक खेचले आहेत. हा व्यवसाय फक्त ग्राहकांकडून कपडे घेणं आणि त्यांचा दारात पुन्हा पोहोचवणं इतकाच मर्यादित नाही. ग्राहकाचा तुमच्यावर पूर्ण विश्वास हवा आणि दोघांमध्येही योग्य ताळमेळ असणं गरजेचं आहे तसंच तुम्ही ग्राहकाला दिलेला शब्द तुम्हाला पाळता आला पाहिजे.

डिर्क दा धोबी डॉट कॉम हे बेंगळूरू मधील ऑनलाईन धोबी सुविधा देणारी संस्था आहे. २०१५ मध्ये डिर्क लेविस आणि रोमिल भाकुनी यांनी हे डिर्क दा धोबी सुरु केलं. बेंगळूरू च्या बिदादी भागात ६० हजार चौरस इतकी जागा त्यांची आहे. त्या ठिकाणी ते व्यावसायिक पद्धतीने धोबी व्यवसाय करतात. तसंच ४८ तासात किफायतशीर किमतीत ते कपडे धुवून देतात.

डिर्क दा धोबी ची रोज ५००० कपडे धुवून देण्याची क्षमता आहे. पण वाढती मागणी लक्षात घेऊन या वर्षाच्या अखेरी पर्यंत ही क्षमता रोज १० हजार कपड्यापर्यंत वाढवायची आहे. सहा महिन्यात त्यांना २००० ग्राहक मिळाले असून २५ हजार कपडे धुवून देण्याची क्षमता आहे. यामध्ये पडदे, कार्पेट, सोफा कव्हर याचाही समावेश आहे आणि ८० टक्के कपडे ड्राय क्लीन करून द्यावे लागतात.
नासकॉम वर भारतातील नोंदणी झालेल्या १० हजार कंपन्यांमध्ये आता डिर्क दा धोबी चा ही समावेश आहे. सध्या पूर्वा फौंटन स्क़ेअर, रहेजा पेबल बे, गोदरेज वूड्मन इस्टेट डी एस आर वूद्विन्ड्स इस्टेट, आणि मंत्री परादाइज या ठिकाणी ते सध्या औपचारिक रित्या लाॅन्ड्री सेवा देत आहेत.
" सध्या सगळ्यात जास्त नफा आम्हाला सोसायट्यांमधून मिळत आहे, तर २० टक्के उत्पन्न हे संकेतस्थळावरून मिळतं. डिसेंबर पर्यंत आम्हाला एप सुरु करायचे आहे, आणि अधिक सोसायट्याशी संपर्क करण्याचा आमचा विचार आहे. ज्यामुळे येत्या दोन तीन महिन्यात आमच्या कामातील बरेच अडथळे दूर होतील." असं डिर्क सांगतो.
लाॅन्ड्री अण्णा चा संस्थापक प्रतिक अण्णा सांगतो, "स्थावर मालमत्तांचे वाढते भाव आणि ऑनलाईन व्यवसाय करण्यासाठी कमी होत असलेला खर्च यामुळे कमीत कमी साधन संपत्ती मध्ये व्यवसाय करणं शक्य झालं आहे. तुमच्या कामाचा दर्जा राखणं आणि दिलेल्या वेळेत काम पूर्ण करणं हे सगळ्यात महत्वाचं झालं आहे."


यंत्र सामग्री, घरपोच सेवा आणि तंत्रज्ञान यांच्या सहायाने २ तासात कपडे गोल करणं आणि २४ तासात ते पुन्हा पोहोचवले जातात असा दावा अण्णा करत आहे.
बेंगळूरू स्थित या कंपनीचे ग्राहक दर महिन्याला २५ टक्क्यांनी वाढत आहेत आणि रोज त्यांना २५ ते ३० कामं मिळतात आणि एका कामाचे ते साधारण ४०० रुपये आकारतात.
पिक माय लाॅन्ड्री चा संस्थापक गौरव अग्रवाल सांगतो की, " सध्या बाजारात व्यवसाय वाढीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत आणि मोठ्या प्रमाणावर लाॅन्ड्री सेवा द्यायला सध्या कोणी उपलब्ध नाही. जो कोणीही तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्राहक केंद्रित सेवा देऊ शकेल तो या क्षेत्रात अग्रणी असेल."
आय आय टी मधून पदवीधर झालेल्या तीन विद्यार्थांनी मे २०१५ मध्ये पिक माय लाॅन्ड्री ही ऑनलाईन लाॅन्ड्री सेवा सुरु केली. याठिकाणी किफायतशीर दारात कपडे धुणे, ड्राय क्लीन आणि कपड्यांशी संबंधित इतर सेवा दिल्या जातात. त्यांच्याकडे मागणी नुसार कपडे धुवून घड्या घालून देणे. कपडे धुवून इस्त्री करून देणे, ड्राय क्लीन, स्टीम प्रेस, बूट स्वछ करून देणे, कार्पेट धुवून देणे इत्यादी सेवा उपलब्ध आहेत.
सध्या त्याचं काम दिल्ली आणि गुडगाव भागात सुरु आहे. सध्या त्यांचे २५०० इतके ग्राहक असून १००० वस्त्रागारांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. भविष्यात द्रुतगती किंवा एक्स्प्रेस लाॅन्ड्री सेवा सुरु करण्याचा त्यांचा मानस आहे, ज्याच्या माध्यमातून एका दिवसात किंवा एका रात्रीत काम पूर्ण करून देता येईल.

पिक माय लाॅन्ड्री चे दर किलो प्रमाणे आकारले जातात. कपडे धुवून आणि घडी घालून देण्याचे ५० रुपये तर कपडे धुवून आणि इस्त्री करून देण्याचे ७५ रुपये घेतले जातात. ते दर महिन्याला २५०० कपडे धुवून देतात तर त्यामध्ये दर महिन्यात ३० टक्के वाढ होत आहे.

सहाय्यक यंत्रणा
ऑनलाईन लाॅन्ड्री सेवा ही कल्पना भारतात नवीन आहे. व्यवसाय म्हणून ही कल्पना भारतात अजून रुजली नाही. हा व्यवसाय भारतात प्राथमिक अवस्थेत आहे. गुंतवणूकदार आणि उपलब्ध साधन सामुग्री यावर लक्ष केंद्रित केल्यास या व्यवसायाची भरभराट व्हायला वेळ लागणार नाही.

वासप चे संस्थापक आणि सीईओ भालचंद्र आर सांगतात, " आम्हाला अनेक मार्गदर्शक लाभले आहेत, जे या आधीच इतर उद्योगांच्या माध्यमातून सगळ्या अडचणींवर मात करत पुढे गेले आहेत. जेव्हा ऑनलाईन लाॅन्ड्री सेवा व्यवसाय अजून वाढेल तेव्हा आमच्या अनुभवातून आम्ही इतरांना सांगू की फसवणूक न होता हा व्यवसाय कसा करायचा."
चेन्नईतील वासप ऑनलाईन लाॅन्ड्री कपडे धुणे, ड्राय क्लीन बूट आणि पिशव्या स्वच्छ करून देणे या सेवा पुरवतात. वासप ची शहरात ३० ठिकाणं आहेत, ज्या ठिकाणी ग्राहक त्यांचे कपडे जमा करू शकतात. यासाठी जबॉन्गचे संस्थापक अरुण चंद्र मोहन आणि प्रवीण सिन्हा तसंच एंजल इन्व्हेस्टर्स चे मिकी वाट्वानी यांनी २ मिलिअन डॉलर इतकी गुंतवणूक केली तसंच सुरवातीला कॅनडा बँक मधून ४ कोटी रुपये इतकं प्राथमिक कर्ज घेतलं.
काही दिवसा आधीच त्यांनी मुंबईतील चमक हि सेवा अधिग्रहण केली. भारतातील लाॅन्ड्री सेवेतील हे पहिलेच अधिग्रहण असावे. वासप सध्या रोज ७०० कामं करून देतात, पुढील सहा महिन्यात हाच आकडा त्यांना ५००० वर न्यायचा आहे. भालचंद्र सांगतात देशभरातील ११ मिलिअन लाॅन्ड्री व्यावसायिक हे वासपच्या माध्यमातून एकत्र आणायचे आहेत. वासप लाॅन्ड्री व्यावसायिक कार्यक्रमा अंतर्गत सगळे धोबी जोडण्याचा त्यांचा विचार आहे. पण ही योजना प्राथमिक स्वरुपात आहे.
संस्था निधी गुंतवणूकदार
वासप :  अनुक्रमे २ मिलिअन अमेरिकी डॉलर
गुंतवणूकदार : जबॉन्गचे संस्थापक अरुण चंद्रमोहन आणि प्रवीण सिन्हा, एंजल इन्वेस्टर मिकी वाट्वानी
डोर्मिण्त : प्रत्येकी ३ मिलिअन अमेरिकी डॉलर  
गुंतवणूकदार : हेलीओन वेन्चर्स आणि कलरीकॅपिटल
पिक माय लाॅण्ड्री : १०००० डॉलर बीज भांडवल  
गुंतवणूकदार : जी एच व्ही अक्सेलेटोर्स
आपका धोबीचे संस्थापक निधीश पटनी सांगतो, " सध्या या व्यवसायात सुरु असलेली गुंतवणूक पाहता गुंतवणूकदारांना या व्यवसायातील नफ्याची जाणीव झाली आहे आणि बाजारातील गरजांमध्ये बदल होणं गरजेचं आहे असं त्यांना वाटतं. गुंतवणूकदार हा लाॅन्ड्री क्षेत्रातील सगळ्यात महत्वाचा घटक असून, त्यांच्यामुळे असंघटीत असलेलं हे क्षेत्र संघटीत व्हायला मदत होणार आहे."
आपका धोबी खात्रीशीरपणे ४८ तासात कपडे धुवून देतात. लाॅन्ड्रीचा सगळ्या सेवा ते देतात उदाहरणार्थ कपडे धुणे आणि घड्या घालून देणे, कपडे धुवून इस्त्री करून देणे, ड्राय क्लीन, स्टार्च, डाय अशा सगळ्या सेवा ते देतात.
इंदिरा नगर, कोरमंगल, व्हाईट फिल्ड, बी टी एम लेआउट या भागातील लाॅण्ड्री व्यावसायिक त्यांचे भागीदार आहेत. सध्या त्यांचे १५०० ग्राहक असून रोज ४० ते ४५ कामं ते रोज करून देतात. येत्या २ ते ३ वर्षात देशातील २० शहरांमध्ये ही सेवा सुरु करण्याचा त्यांचा मानस आहे.
भविष्यातील दृष्टीकोन
येत्या काळात लाॅन्ड्री व्यवसायात येणारे नवीन स्पर्धक आणि गुंतवणूकदार बघता या क्षेत्रात बऱ्याच घडामोडी घडणार आहेत. या क्षेत्रात नवीन स्पर्धक येत आहेत त्यामुळे या व्यवसायात निकोप स्पर्धा होईल यामुळे व्यवसाय वाढीला मदत होईल शिवाय हे क्षेत्र संघटीत होईल.
प्रवीणचं असं मत आहे की, गुंतवणूक करणारे या क्षेत्रातील व्यावसायिकांना नक्कीच मार्गदर्शन करतील आणि लाॅण्ड्री सारख्या विकसित होत असलेल्या आणि थोड्या गुंतागुंतीच्या क्षेत्रातही योग्य निर्णय घेतील.
" या क्षेत्रात २० लाॅन्ड्री सेवा देणाऱ्या कंपन्या उतरल्या आहेत. लाॅन्ड्री ही अत्यावश्यक सेवा आहे ज्याला कधीच तोटा होणार नाही. कारण मंदीच्या काळातही नागरिक आपले कपडे धुणं थांबवणार नाहीत." अर्बन धोबीचे संस्थापक सत्यम मिश्रा सांगतो.
अर्बन धोबी ही जयपूर स्थित लाॅन्ड्री सेवा देणारी कंपनी आहे, ते सध्या शहरातील ६ भागांमध्ये सेवा पुरवतात. फक्त ३ महिन्यात त्यांचे २०० ग्राहक झाले असून त्यापैकी ७०० नियमित ग्राहक झाले आहेत. ऑगस्ट २०१५ मध्ये जयपूरच्या ओअसिस च्या मदतीने.
रिको, राजस्थानच्या प्रिमिअर इंडस्ट्रीअल प्रमोशन ओर्गनाइजेशन, आणि आय आय एम अहमदाबादच्या सेंटर फोर इनोव्हेशन इन्कुबिशन अंड एंटरप्रिनिओरशिप यांनी एकत्र येउन हा व्यवसाय सुरु केला. ते तीन किलो कपड्यांना १५० रुपये तर ५ किलो कपड्यांना २०० रुपये आकारतात. आणि त्यापेक्षा अधिक प्रत्येकी एका किलो ला ३५ रुपये असा दर आहे. साधारण कामाचे ३०० रुपये घेतले जातात आणि त्यापैकी ६५ टक्के हे काम करून देणाऱ्या लाॅन्ड्री व्यावसायिकाला दिले जातात. सध्या त्यांचाकडे कपडे आणायला आणि पोचवायला ७ कर्मचारी आहेत.
तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया
भालचंद्र म्हणतो," इतर इ कॉमर्स व्यवसायाप्रमाणे लाॅण्ड्री व्यवसायानेही ग्राहक खेचले आहेत, आणि या व्यवसायात जे दीर्घकाळ आहेत त्यांना नक्कीच फायदा मिळेल आणि या व्यवसाय दीर्घकाळ टिकून राहील याची शाश्वती आहे."
" इ कॉमर्स मधील इतर व्यवसायांप्रमाणे लाॅण्ड्री क्षेत्रातही कंपन्यांचं विलिनीकरण आणि अधिग्रहण हे प्रकार होतील. हा व्यवसाय विकसित होत असून तो सगळ्या बाजूने विकसित होणं गरजेचं आहे. हा व्यवसाय विकसित व्हायला बरेच कष्ट घ्यावे लागणार आहेत." असं तो पुढे सांगतो.
जी एच व्ही अक्सेलेटर्स चा संस्थापक आणि पिक माय लाॅन्ड्री मध्ये गुंतवणूक करणारा विक्रम उपाध्याय सांगतो," जो तंदुरुस्त आहे तोच जगेल हा निसर्गाचा नियम या व्यवसायाला लागू होतो. ज्यांच्याकडे आधुनिक यंत्रणा आहे, तसंच ग्राहकांना घरपोच आणि समाधानकारक सेवा देणारा व्यावसायिक हा टिकून राहील. काही व्यावसायिकांना टिकून राहण्यासाठी भारतीय बाजारपेठ ही बरीच मोठी आहे," असं तो पुढे म्हणाला.
लेखिका : अपरजीता चौधरी
अनुवाद : श्रद्धा वार्डे

SHARE THIS

->"ऑनलाईन लाॅन्ड्री व्यवसाय ही कल्पना योग्य आहे का ? GARMENT WASHING SERVICE "

Search engine name