२ लाखांच्या गुंतवणुकीने टोमॅटो साॅसचे युनिट सुरु करा, जाणून घ्या कसे ते...
कृषिकिंग, नवी दिल्ली: पंतप्रधान यांनी देशात सेल्फ एम्प्लाॅयमेंटला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा स्कीमची सुरुवात केली होती. तुम्ही देखील या स्कीमचा लाभ घेऊन बिझनेस सुरु करु शकता. मुद्रा स्कीमच्या प्रोजेक्ट प्रोफाईल रिपोर्टनुसार जर तुमच्याकडे २ लाख रुपये असतील तर तुम्ही टोमॅटो साॅसचे युनिट सुरु करुन चांगली कमाई करु शकता.
मागील काही वर्षांपासून फास्ट फुडचा बिझनेस वेगाने वाढत आहे. या शिवाय टोमॅटो साॅसच्या पाऊच आणि बाटल्यांची डिमांड देखील वरचेवर वाढत आहे. सरकार तुमच्या या बिझनेसला मुद्रा प्रोजेक्ट अंतर्गत सपोर्ट करु शकते. हा बिझनेस तुम्ही कसा सुरु करु शकता, तुम्हाला किती पैसे खर्च करावे लागतील आणि तुमची कमाई किती होईल. याविषयी थोडक्यात जाणून घेऊया...
किती असेल प्रोजेक्ट काॅस्ट ?
प्रधानमंत्री मुद्रा स्कीम प्रोजेक्ट प्रोफाईल नुसार जर तुम्ही टोमॅटो मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरु करणार असाल तर तुमच्याकडे जवळजवळ १ लाख ९५ हजार रुपये असणे गरजेचे आहे. यावर तुम्ही १.५० लाख टर्न लोन आणि जवळ जवळ ४.३६ लाख वर्किंग कॅपिटल लोन घेऊ शकता. म्हणजेच प्रोजेक्टची काॅस्ट जवळजवळ ७.८२ लाख रुपये असेल.
कसा तयार होतो टोमॅटो साॅस
सगळ्यात आधी पिकलेले आणि वाॅश केलेले टोमॅटो स्कीम केटल मध्ये उकडतात. उकडलेले टोमॅटो शिजवले जातात आणि बिया फायबर आणि ठोस कच-या पासून रस वेगळा काढला जातो. यात अद्रक, लसुण, लवंग काळी मिरी, मीठ, साखर, सिरका इत्यादी मसाल्याचे पदार्थ मिसळले जातात. सांगितलेल्या मात्रेत प्रिझर्व पल्पमध्ये मिळसला जातो आणि नंतर साॅस थंड केला जातो यानंतर साॅस पाउच आणि बाॅटल्समध्ये पॅक केला जातो. सील केल्यानंतर हा माल विक्रीसाठी गोळा केला जातो.
मुद्रा प्रोजेक्ट रिपोर्टनुसार या प्रोजेक्टसाठी तुम्ही एक वर्षभर जवळ जवळ ३० हजार किलो टोमॅटो साॅस तयार करु शकता आणि याची वर्षाची प्राॅडक्शन काॅस्ट २४ लाख ३७ हजार रुपये येईल, जर तुम्ही ३० किलो साॅस ९५ रुपये प्रतिकिलोच्या रेटने मार्केटमध्ये सप्लाय केला तर तुमचा वार्षिक टर्नओव्हर २८ लाख ५० हजार रुपये असेल. म्हणजेच तुम्हाला ४ लाख १२ हजार रुपयांचा इनकम मिळेल. जो नंतर दरवर्षी वाढत जाईल.
banner
टॅग्स:::::::::::::::::::::
banner
banner
->"Start Tomato Sauce 2 लाखांच्या गुंतवणुकीने टोमॅटो साॅसचे युनिट सुरु करा, जाणून घ्या कसे ते..."
Post a Comment