विद्युत सुरक्षा - आपली सुरक्षा

वीज ही आपली नित्याची गरज असून तिचा वापर हा अविभाज्य घटक झालेला आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांइतकेच वीजेला महत्त्व आहे. वीज सुरक्षा हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागामार्फत दि.11 ते 17 जानेवारी 2018 या कालावधीत राज्यभर विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने जनजागृती होऊन वीजेच्या सुरक्षेबाबत लोकांना माहिती व्हावी यासाठीचा हा लेख…

सर्वसामान्यपणे आपल्याला वीजेचे उपकरण हाताळण्याची खूप सवय असते. मात्र त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपण कधी विचार करीत नाही. यासाठी विद्युत सुरक्षा संदेश म्हणून काही गोष्टी सहजतेने लक्षात ठेवल्या तर त्याचा फायदाच होऊ शकतो. पाहूयात सहज सोप्या पण महत्त्वाच्या गोष्टी....

साधारणतः एक फेज २३० व्होल्टस व ३ फेज ४१५ व्होल्टस दाबाच्या वीजेच्या धक्क्यामुळे मनुष्य, प्राणिमात्राचे मृत्यू होण्याचे प्रमाण खूप अधिक आहे. यात २३० व्होल्ट्स दाबाच्या वीजेचे बसणारे धक्के प्राणघातक ठरू शकतात. विद्युतभारी उपकरणापासून अथवा वाहकापासून प्रतिक्षिप्त क्रियेमुळे अपघातग्रस्त दूर फेकला गेला, तरच बचावतो. तसेच आपणास हे माहित असेल की १५ ते २० मिली ॲम्पिअरपेक्षा जास्त विद्युत प्रवाह माणसाच्या शरीरातून प्रवाहित झाला तर संबधित व्यक्तीचे स्नायू नैसर्गिकरित्या होणाऱ्या आकुंचनापेक्षा अधिक आकुंचित होतात परिणामी स्नायूंचे चलनवलन थांबते आणि संबंधित व्यक्ती तेथेच चिकटून बसली आहे असे पाहणाऱ्यास वाटते. महत्त्वाचे म्हणजे व्यक्तीच्या शरीरातून वाहणाऱ्या विद्युतप्रवाहाची तीव्रता 50 मिली ॲम्पिअरपेक्षा जास्त असेल तर त्या प्रवाहाने माणसाला मृत्यू येऊ शकतो. अगदी काही प्रमाणात असेही म्हणता येईल की, मुलांकरिता 24 होल्ट्स विद्युतदाब तर प्रौढ व्यक्तींसाठी 60 होल्ट्स विद्युत दाब धोकादायक ठरु शकतो. सुरक्षिततेच्या दृष्टीने मनुष्याचे शरीर तसेच अपघाताची जागा पूर्णपणे कोरडी असल्यास मानवी शरीराचा विद्युत रोध 250 होल्ट्स 50 हर्टझला 1000 ओहम इतका गृहित धरला जातो. ही झाली काही तांत्रिक माहिती.

अपुरे ज्ञान असलेल्या व चुकीच्या पद्धतीने सचेत (live) विद्युत संच मांडणीवर काम अजिबात करु नये. याचे परिणाम भयावह होऊ शकतात. अशा अपघाताचा विचार केला असता असे लक्षात येते की, संबंधित ठिकाणी काम करणाऱ्या लोकांमध्ये भाजून जखमी होण्याचे प्रमाण खूपच अधिक आहे. आपल्या घराजवळील विद्युत खांबावरील पथदर्शक दिवे खराब झाल्यास अथवा घरातील वीज गेल्यास कोणत्याही परिस्थितीत स्वत: ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करु नये. याबाबत महत्त्वाचे म्हणजे वीजपुरवठा कंपनीच्या कर्मचाऱ्यांशिवाय इतरांनी वीजेच्या खांबावर चढून दुरुस्तीचे काम करणे धोकादायक आहे. जर काही दुर्घटना झाली तर तात्काळ माहिती विद्युत निरीक्षक कार्यालयास द्यावी. ही आपली जबाबदारी आहे. विद्युत विभागाच्या संबधित कर्मचाऱ्यांनी देखील निरीक्षणादरम्यान आढळून आलेल्या दोषांचे वेळीच निराकरण करुन अपघात टाळण्याची दक्षता घ्यावी.

घरगुती ग्राहकांसाठी सूचना
घरगुती वीज ग्राहकांनी आपल्या घरामध्ये वीजेसंदर्भात करावयाची सर्व कामे संबधित, अधिकृत व्यक्तींकडूनच करुन घ्यावी. अगदीच प्राथमिक बाबी जसे वीजेचे दिवे, ट्यूब, फ्यूज तार व इतर घरगुती उपकरणे स्वत: बदलण्यास हरकत नाही.
हॉटप्लेट, मिक्सर, टोस्टर, इलेक्ट्रीक केटल, वॉशिंग मशीन इत्यादींची गुणवत्ता तपासून त्यांना शासनामार्फत उत्पादकता प्रमाणपत्र क्रमांक देण्यात येतो. सुरक्षिततेच्या दृष्टीने तो क्रमांक पाहूनच उपकरणांची खरेदी करणे आवश्यक आहे.

तात्पुरते वायरींग करुन वीजेचे दिवे व उपकरणे वापरणे नेहमीच धोक्याचे असते. लोंबकळते व अयोग्य पद्धतीने जोड दिलेले वायरींग धोकादायक आहे.सर्व प्रकारच्या विद्युतसंच मांडणीकरिता गरजेरुप अर्थलिकेज सर्कीट ब्रेकर/ रेसिड्युअल करंट ब्रेकर (ELCB/RCCB) वापरणे आवश्यक असून त्यामुळे विद्युत क्षरणापासून होणारा धोका टळू शकतो.पोर्टेबल टेबज पंखे, तारा, पेडेस्टल पंखे, विद्युत इस्त्री, गीझर सारख्या विद्युत साधनांना तीन पीन प्लग सॉकेट टॉपद्वारेच वीजपुरवठा करणे जरुरीचे असते. तसेच प्लगमध्ये भूसंबंधन (अर्थिंग) व्यवस्थित असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.विद्युतप्लग, तारा व त्याला जोडलेली उपकरणे लहान मुलांच्या कक्षेबाहेरच राहतील याची काळजी घेणे जरुरी असते. पावसाळ्यात इमारतीचे छत व भिंती ओल्या असताना, भिंतीला अथवा घरातील एखाद्या विद्युत उपकरणाला, साधनाला वीजेच्या क्षरणाने गळतीने किंचितसा जरी धक्का जाणवला तरी त्वरित वीजपुरवठा ठेकेदाराकडून संपूर्ण संच मांडणीची तपासणी करुन आवश्यक ती दुरुस्ती करुन घेणे आवश्यक आहे.

या सर्व बाबी प्राथमिक वाटत असल्या तरी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या सूचना आहेत. या सूचनांचा उपयोग करुन आपण विद्युत अपघातापासून सुरक्षित राहू शकतो. महत्त्वाचे म्हणजे यामुळे जिवीतहानी टाळली जाऊ शकते.
संकलन :डॉ.राजू पाटोदकर,मुंबई.
माहिती स्रोत: महान्युज

https://ift.tt/eA8V8J from Social Welfare Feed https://ift.tt/2MCaOoB

1 comment:

  1. The big street and the bead plate are similar in nature in that they each instantly data the outcomes of the shoe thus far, in a easy manner. Big eye boy (called ‘Big Eye Road’ in figure 1), the small street and the cockroach street are thecasinosource.com much advanced than the big street and the bead plate. Collectively these three roads are called ‘derived roads’ (we’ll clarify that in more detail later). The derived roads are beneath the big street, at all times with big eye boy above the small street on the left, and the cockroach street on the best.

    ReplyDelete