*"खारेकुरण एक आगळेवेगळे आदर्श गाव .... *
*पालघर*
पासून फक्त ७ कि. मी. अंतरावर *खारेकुरण गाव* आहे. गावाची लोकसंख्या पुरुष १६५४ स्त्री १६९६ एकूण ३३५० आहे.
केंद्रशासना मार्फत ग्रामविकास अभ्यासाकरिता देशातील ११ गावांत खरेकुरण ग्रामपंचायतची निवड .
*गावाचे आगळेवेगळे उपक्रम*
*१)* गावात एकच पिठाची गिरणी आहे. जे ग्रामपंचायतचा कर १००% भरतात त्यांना वर्षभर दळण मोफत दळून मिळते.
*२)* गावात चार प्रकारचे पाणी उपलब्ध आहे.
*i)* पिण्याचे RO चे पाणी
*ii)* वापरायचे पाणी
*iii)* साधे पाणी
*iv)* गरम पाणी
पिण्याचे RO चे पाणी प्रत्येक दिवशी २० ली मोफत. ATM द्वारे चोवीस तास ८० रुपयांत १२००० ली पाणी मिळते.
वापरायचे व साधे पाणी २ वेगवेगळ्या नळाद्वारे २४ तास पाणी उपलब्ध.
गरम पाणी सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत मोफत उपलब्ध आहे. हे पाणी सौर उर्जेवर तापविले जाते.
*३)* ओला व सुका कचऱ्यासाठी दोन वेगवेगळ्या बकेटद्वारे कचरा ट्रक्टरच्या साहाय्याने गोळा केला जातो . त्या पासून कंपोस्ट खत तयार केले जाते.
*४)* गावातील अथवा बाहेरील नागरिक मंदिराला देणगी न देता ग्रा.पं. ला देणगी देतात. ग्रा पं मासिक जमा खर्च दरमहा नोटीस बोर्डवर प्रसिध्द करते.
*५)* गावात ४२ CCTV बसविण्यात आलेले आहेत.
*६)* गावात १२ ठिकाणी थंड पाण्याचे कुलर बसविण्यात आलेले आहेत.
*७)* नागरिकांना शुध्द पाणी पिण्यासाठी जल शुध्दीकरण प्रकल्प कार्यान्वित आहे.
*८)* सर्व शासकिय कर्मचाऱ्यांसाठी बायोमॅट्रीक हजेरी आहे.
*९)* संपर्कासाठी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यात मोबाईल ग्रुप कार्ड आहे.
*१०)* लोकसंखेच्या दुप्पट गावात फळझाडे आहेत.
*११)* एकही नागरिक मळ्यात अथवा वस्तीवर राहत नाही.
*१२)* हात धुण्यासाठी गावात ठिकठिकाणी वॉश बेसिन बसविलेले आहेत.
*१३)* ठिकठिकाणी वयोवृद्धांना बसण्यासाठी खुर्च्या व बाके आहेत.
*१४)* गावाचे एकाच ठिकाणी सर्व सांडपाणी जमा केलेले आहेत, ते पाणी शेतीला वापरतात.
*१५)* गावात १ली ते ८वी पर्यंत जि प ची शाळा असून शाळा डिजिटल व गुणवत्ता पूर्ण आहेत.
*१६)* गावात सात दिवसाचा सप्ताह होत नसून प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी किर्तन व सर्व देणगीदार गावकऱ्यांना मोफत जेवन देतो.
*१७)* गावात ग्रा. पं. द्वारे सामुदायिक विवाह पार पडतो.
*१८)* गावात प्रत्येक नागरिकाचा वाढदिवस साजरा केला जातो.
*१९)* सगळ्या संस्थांच्या खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूका पार पडतात पण गावात कोणताच राजकिबय पक्ष नाही.
*२०)* प्रशासकिय सेवेत काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानपत्र देऊन पुरस्कार दिला जातो.
*२१)* घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक खातेदारास पर्यावरण पिशवी दिली जाते.
*२२)* गावात सगळीकडे पेव्हर ब्लॉक बसविण्यात आलेले आहेत.
*२३)* गाव तंटामुक्त , निर्मलग्राम राष्ट्रपती पारितोषिक विजेते आहेत.
*२४)* धुणी धुण्यासाठी गावात सार्वजनिक धोबी घाट बांधलेले आहेत
*२५)* ग्रामपंचायतचे वार्षिक उत्पन्न २५ लाख रूपये आहेत .
*२६)* ग्रामपंचायत कार्यालयात व सभागृहात वातानूकुलित ( ए.सी.) यंत्रणा बसविण्यात आलेली आहेत.
* असे हे आगळेवेगळे आदर्श गाव .... *
आपल्या गावात आशी व्यवस्था व्हावी वाटेत आसेल तर गावातील सर्व नागरिकांना हा मेसेज पाठवा आणि प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने काम केले तर आपलेही गाव आदर्श गाव बनेल
*धन्यवाद .... *
(ही बातमी आपल्या *सरपंचा* पर्यंत जाऊ द्या ....)
->"खारेकुरण एक आगळेवेगळे आदर्श गाव "
Post a Comment