फार्म हाऊससाठी शेत जमीन Farm House for farm land

 Farm House for farm land फार्म हाऊससाठी शेत जमीन खरेदी :-

मोठ्या शहरात मोकळी जमीन क्वचितच आढळते. पण शहराची हद्द वाढली, नवी गावे समाविष्ट झाली की मोकळी जमीन उपलब्ध होते. काही नगरांमध्ये नगरपालिका, नगरपरिषदांच्या हद्दीत मोकळी जमीन असू शकते.

शहर - नगरांच्या हद्दीत जी जमीन गावठाण म्हणून जिल्हाधिकारी यांच्या हुकुमाने घोषित केलेली असते, अशा जमिनीवर इमारत बांधण्यासाठी जिल्हाधिकारी/महानगरपालिका/नगरपालिका/नगरपरिषद/प्राधिकरण यांच्या हुकुमाने बिनशेती एन.ए. करण्याची आवश्यकता नसते.

पण गावठाण म्हणून जी जमीन जिल्हाधिकारी यांच्या हुकुमाने घोषित झालेली नसते अशा जमिनीवर इमारत बांधण्याआधी जिल्हाधिकारी/महानगरपालिका/नगरपालिका/नगरपरिषद/प्राधिकरण यांच्या हुकुमाने बिनशेती एन.ए. करण्यासाठी पूर्व परवानगी घ्यावी लागते.

फार्म हाऊससाठी शेत जमीन खरेदी :-

ज्या गावातील जमींन खारेदी करावयाची असेल तेथिल गावच्या तलाठ्या कडून जमिनीचा नवीन सातबारा काढून घ्यावा. त्यावर असलेले फेरफार व आठ अ तपासून पाहावा.

सातबारा पहाताना वर्ग १ नोंद असली तर ती जमीन विक्री करणा-याची स्वतःच्या मालकी वहिवाटीची असून सदर जमीन खरेदी करण्यास विशेष अडचण येत नाही.

*** फार्म हाऊस - शेतजमिनीवरील घर :-

१) आज शेतकरी असलेली व्यक्तीच शेतघरासाठी शेतजमीन विकत घेऊ शकते. पण ग्रामीण भागात गावठाणात सामविष्ट केलेली जमीन शेतकरी नसलेल्या व्यक्तीस विकत घेता येईल, त्याआधी ग्रामपंचायतीकडून संबंधित भूखंडाबाबतचाआठ - अ चा उतारा मिळवा. त्या उताऱ्यामधील सर्व नोंदींचा मागील किमान पंचवीस वर्षाचा शोध अहवाल मिळवा. भूखंडाचा हद्दी दाखवणारा नकाशाही मिळवा.

२) शेतजमीन विकत घेण्यासाठी जी कागदपत्रे तपासायची आहेत तीच कागदपत्रे शेतघरासाठी जमीन विकत घेण्याआधी तपासायची आहेत.

३) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४१ या विषयी मार्गदर्शक आहे ते वाचा. ज्या शेतजमिनीवर फार्म हाऊस - शेतातील घर बांधायचे आहे त्या जमिनीवर एक किंवा अनेक इमारती बांधता येतील. पण अशा शेतजमिनीचे क्षेत्रफळ ०.४ हेक्टर - ४० आर इतके किंवा त्यापेक्षा जास्त असावे. पण ०.६ हेक्टर ६० आरपेक्षा कमी असेल, त्यावेळी अशा जमिनीवर बांधलेल्या एका किंवा अनेक इमारतींच्या जोत्याचे एकूण क्षेत्रफळ १५० चौरस मीटर पेक्षा जास्त असणार नाही. इमारतींची उंची ५ मीटरपेक्षा जास्त असणार नाही.

४) जेव्हा शेतजमिनीचे क्षेत्रफळ ०.६ हेक्टर ६० आर पेक्षा जास्त असेल तेव्हा त्या जमिनीवर एका किंवा अनेक इमारतींच्या जोत्याचे एकूण क्षेत्रफळ ४०० चौरसमीटरपेक्षा जास्त असणार नाही.

५) शेतघर बांधण्यासाठी संपूर्ण जमिनाला एन.ए. बिनशेती परवानगी जिल्हाधिकारी यांचेकडून घेण्याची आवश्यकता नाही.

६) मात्र इमारत बांधण्यासाठी नगररचना - नगरविकास विभागाकडून इमारतीचा आराखडा PLAN मंजूर करून घेऊन त्यानंतर मा. जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल.

७) शेतघरासाठी पिण्याचे पाणी व अधिकृत रस्ता या सुविधा असाव्यात.

८) शेतघराच्या बांधकामाला अन्य कायदे व नियम यांचे बंधन येणार नसेल तर नगररचना - नगरविकास आराखडा मंजूर करतील आणि मा. जिल्हाधिकारी परवानगी देतील.

९) संबंधित जमिनीचा झोन दाखला व झोन नकाशा मिळवा.

१०) मा. जिल्हाधिकारी कार्यालयात शेतघर बांधणीसंबंधीचा अर्जाचा नमुना मिळू शकेल.

*** ग्रामपंचायत बांधकामासंबधी अधिकार नगररचना विभागाकडे :-

ज्या ग्रामपंचायतीचा विकास आराखडा नाही, अशा ग्रामपंचायतीमधील बांधकामाना परवानगी देण्याचे अधिकार ग्रामपंचायतीकडून नगररचना विभागाकडे वर्ग करण्यात आले आहेत.

या संबधीचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने १५ मे २०१५ रोजी घेतला. राज्याच्या ग्रामीण भागात होत असलेल्या अनाधिकृत बांधकामाना आळा घालण्यासाठी सरकारने हा उपाय केला आहे. सध्या राज्यात सुमारे १० हजार गावांना विकास आराखडा नाही. १४ जिल्ह्यात अशा प्रकारचे आराखडे नाहीत. अशा ग्रामपंचायतीत बांधकाम करण्यासाठीची परवानगी देण्यासाठी पंचायत समितीमध्ये नगररचना अधिकारी नियुक्त करण्यात येईल.त्यांची नियुक्ती होईपर्यंत जिल्हा नगररचना अधिकारी परवानगी देतील. यासाठी नागरीकाना ग्रामपंचायतीमार्फत प्रस्ताव पाठवावा लागेल.

*** घरासाठी भूखंड - ग्रामीण भागात :-

शहरातले प्रदूषण, गर्दी यापासून दूर शांत वातावरणात खेड्यात घरबांधणीचे अनेकांचे स्वप्न आहे. या स्वप्नपूर्तीसाठी कायद्यातील तरतुदींची माहिती घेणे आवश्यक आहे.

१) शेतजमीन विकत घेण्यासाठी विकत घेणारी व्यक्ती आज शेतकरी असणे आवश्यक असते. पण ग्रामीण भागात गावठाणात सामविष्ट केलेली जमीन शेतकरी नसलेल्या व्यक्तीस विकत घेता येईल, त्याआधी ग्रामपंचायतीकडून संबंधित भूखंडाबाबतचा आठ - अ चा उतारा मिळवा. त्या उताऱ्यामधील सर्व नोंदींचा मागील किमान पंचवीस वर्षाचा शोध अहवाल मिळवा. भूखंडाचा हद्दी दाखवणारा नकाशाही मिळवा.

२) शासनाने निश्चित केलेल्या ‘प्रमाणित क्षेत्रापेक्षा’ कमी क्षेत्राची शेतजमिन खरेदी करणे, वाटप, विभाजित करणे बेकायदेशीर आहे. प्रमाणित क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या शेतजमिनीचा खरेदीदस्त दुय्यम निबंधक कचेरीत नोंदवला जाईल, पण तुकडेबंदी तुकडेजोड कायद्याचा भंग झाल्याने आपल्या मालकी हक्काची नोंद ७/१२ उताऱ्यावर मालक सदरी दाखल होणार नाही. या कायद्याप्रमाणे आपली खरेदी बेकायदेशीर असल्याचा शेरा सातबारा उताऱ्यावर दाखल होईल.

३) शेतकरी नसलेल्या व्यक्तीने ग्रामीण भागात जिल्हाधिकारी यांच्या हुकुमाने बिनशेती N.A. झालेली जमीन - भूखंड घरासाठी खरेदी करावा.

->"फार्म हाऊससाठी शेत जमीन Farm House for farm land"

Post a Comment