नवीन गाडीमार्गाची मागणी

नवीन गाडीमार्गाची मागणी

शेतजमीनीमध्ये जाण्यासाठी पूर्वापार वहिवाटीचे रस्ते आज अस्तित्वात आहेत. कुठल्याही शेतकर्याने नवीन जमीन खरेदी घेतली की पूर्वीचे शेतकरी जी वाट किंवा रस्ता वापरत होते तिच वाट किंवा रस्ता नवीन खरेदीदार सध्या वापरतो. परंतू वारसाने आणि वाटपाने जमीनीचे लहानलहान तुकडे पडल्याने अनेक ठिकाणी आता जमीनीमध्ये जाण्यास पूर्ण रुंदीचा रस्ता उपलब्ध होत नाही. जेव्हा जमाबंदी करण्यांत आली किंवा रस्त्यासाठी जमीनीचे संपादन करण्यांत आले त्यावेळच्या रस्त्याची मोजमापे नमूद करुन गाव नकाशे तयार करण्यांत आले व या गाव नकाशामध्ये आजही काही गावामध्ये पूर्वापार वहिवाटीचे रस्ते आहेत.

या सर्व बाबी पुढीलप्रमाणे आहेत. :-

१. अर्जदाराने केलेली मागणी हि खरंच त्याच्या वहिवाटीच्या हक्काला धरून आहे का? कि, अर्जदाराने केलेली मागणी हि खोडसरपणे केलेली नाही ना ? याची तपासणी करण्यात इयते.

२. जर नवीन वहिवाटीची मागणी हि सदर शेत जमिनीचे मालक बदल झाले आहेत म्हणून झालेली असेल तर, पूर्वीचे शेतजमिनीचे मालक कोणत्या रस्त्याने / वाहवाटीचा वापर करत होते. हे पहिले जाते.

३. मागणी केलेल्या व्यक्तीला मुख्य / मोठ्या रस्त्याकडे जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग कशा पद्धतीने तयार होईल आणि अशी वाट तयार करताना इतर खातेदारांची कमीत कमी नुकसान होईल याची दक्षता घेतली जाते. त्याच प्रमाणे मागणी करणाऱ्या व्यक्तीला त्याचे जमिनीत जाण्यासाठी इतर पर्यायी रस्ता देणे शक्य आहे का? याची पडताळणी करण्यात येते.

४. अर्जासोबत ज्या ज्या शेतातून मागणी रस्ता जाणार आहे. त्या मालकांचे नाव व पत्ते अर्जासोबत जोडावे. जर ,मागणी रस्त्याबाबत त्यांचे काही म्हणणे असेल तर त्यांचा विरोध असेल, त्यांच्या काही हरकती असतील तर त्या त्यांच्याकडून लेखी मिळाल्यास त्या अर्जासोबत जोडाव्यात.

५. मागणी रस्त्याची आवश्यकता आपणास किती आहे? व कशी आहे ? आपण करत असलेल्या मागणीमुळे काय होणार आहे ? या बाबींचा उल्लेख अर्जात करावा.

->"नवीन गाडीमार्गाची मागणी"

Post a Comment