लॉकडाऊनमुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये अडकलेल्या नागरिक, विदयार्थी, पर्यटक आणि मजूर यांना आपआपल्या गावी जाण्यासाठी तसेच सोलापूर जिल्हयात येण्यासाठी राज्य शासनाने कार्यप्रणाली जाहीर केली आहे. यासाठी प्रवास पास मिळणेसाठी वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्यासाठीचा अर्ज https://covid19.mhpolice.in या वेबसाईटवर करावा.
सोलापूर जिल्हयातून इतरत्र जाणेसाठी
1.सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या हददीतील नागरिकांना पोलीस आयुक्तालयाकडून प्रवासासाठीची परवानगी देण्यात येईल. त्यासाठी संबंधितांनी वरील वेबसाईटवर निवासाचे ठिकाण सोलापूर शहर (Solapur City) असे निवडावे. त्यानुसार परिपूर्ण अर्ज भरावा. तसेच सोलापूर जिल्हयातील ग्रामीण भागात रहिवास असणा-या व्यक्तींनी वरील वेबसाईटवर निवासाचे ठिकाण सोलापूर ग्रामीण (Solapur Rural) असे निवडावे, त्यानुसार परिपूर्ण अर्ज भरावा. 2.सदर ऑनलाईन अर्ज भरत असताना आपला फोटो, आधारकार्ड अगर तत्सम फोटो ओळखपत्र, नोंदणीकृत वैदयकीय व्यावसायीक यांचेकडून कोविड-१९ ची लक्षणे व बाधा नसल्याबाबतचे प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. अनुषंगिक सर्व माहिती तपशीलासह भरणे आवश्यक आहे. 3. वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर सोलापूर पोलीस आयुक्त आणि सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रवासासाठी परवानगीबाबतचा प्रस्ताव ज्या जिल्हयात जायचे आहे, त्या पोलीस आयुक्त / जिल्हाधिकारी यांना पाठविणेत येईल. 4.संबंधित पोलीस आयुक्त/ जिल्हाधिकारी यांचेकडून प्रवासासाठी मान्यता प्राप्त झाल्यानंतरच पोलीस आयुक्त/ जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अर्जदारास ऑनलाईन पध्दतीनेच प्रवासासाठीची अंतिम परवानगी देणेत येईल. सदर पास डाऊनलोड करुन जतन करावा 5.पोलीस आयुक्त/ जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अंतिम परवानगी दिलेनंतरच अर्जदारानी प्रत्यक्ष प्रवासास सुरुवात करावी. 6.परवानगी मिळालेली व्यक्ती ज्या वाहनाने प्रवास करणार आहेत, अशा वाहनांना प्रवासाचा निश्चित मार्ग व कालावधी नमूद करुन देणेत आलेला पास, सर्व प्रवाशांचे ओळखपत्र, सर्व प्रवाशांचे वैदयकीय प्रमाणपत्र सोबत असणे बंधनकारक असणार आहे. 7.वरीलप्रमाणे देण्यात येणारी परवानगी घोषित करण्यात आलेल्या आणि यापुढे वेळोवेळी घोषित करण्यात येणा-या containment Zone मधील व्यक्तींना दिली जाणार नाही. * सोलापूर जिल्यातील ग्रामीण भागातील ज्या नागरिकांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्यामध्ये अडचणी आल्यास त्यांनी संबंधित ग्रामपंचायत/ग्रामस्तरीय समिती/तहसिल कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा. सोलापूर जिल्हयात येणेसाठी 1.सोलापूर जिल्हयातील इतर राज्यात अगर इतर जिल्हयात अडकलेल्या मजूर, यात्रेकरु , विदयार्थी, पर्यटक, व्यक्ती यांनी त्यांच्या स्वगृही येणेसाठी ते ज्या ठिकाणी अडकलेले आहेत, त्याठिकाणच्या पोलीस आयुक्त/ जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडे प्रवासाच्या परवानगीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. 2.सदर प्रवासासाठी सध्याचे रहिवास असलेल्या ठिकाणचे संबंधित पोलीस आयुक्त/ जिल्हाधिकारी यांचेकडून प्रवासाबाबत प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर सोलापूर पोलीस आयुक्त/जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्याबाबत ना-हरकत/अनुमती प्रमाणपत्र देण्यात येईल. त्यानंतर ज्या ठिकाणी अर्ज सादर केलेला आहे, त्या पोलीस आयुक्त/ जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडून प्रवासाचा पास प्राप्त करुन घेणे आवश्यक राहील. 3.सोलापूर जिल्हयामध्ये प्रवेश करु इच्छिणा-या व्यक्तींनी मिळालेला परवानगी पास, सर्व प्रवाशांचे ओळखपत्र, सर्व प्रवाशांचे वैदयकीय प्रमाणपत्र सोबत ठेवणे बंधनकारक असणार आहे. 4.सदर सर्व कागदपत्रांची शहानिशा करुन सोलापूर जिल्हयाचे हददीत प्रवेश देणेत येईल. 5.सोलापूर जिल्हयात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी करणेत येईल, सदर तपासणी करणेसाठी जिल्हास्थल सिमा हद्दीवरील चेकपोस्टवर आरोग्य पथके नेमणेत आलेली आहेत. सोलापूर जिल्हयात प्रवेश केलेल्या प्रत्येक प्रवाशांनी स्थानिक प्रशासनास (तहसिलदार, पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी, वॉर्ड ऑफिसर, ग्रामसेवक, तलाठी ) यांना बाहेरुन जिल्हयात आल्याबाबतची माहिती देणे बंधनकारक आहे. 6.अशा प्रवाशांना सक्तीने 14 दिवस होम क्वारंटाईन (Home Quarantine) किंवा इन्स्टिटयुशनल क्वारंटाईन (Institutional Quarantine) करणेत येईल.
या संदर्भात काही शंका असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्हाधिकारी कार्यालय टोल फ्री क्र. 1077 जिल्हा पुनर्वसन कार्यालय, सोलापूर 0217-2731007 पोलीस आयुक्त कार्यालय (सायबर सेल), सोलापूर 0217-2744616

->"लॉकडाऊन ऑनलाईन अर्ज "
Post a Comment