The deal of black and white. ब्लॅक आणि व्हाईटचा व्यवहार

तुम्ही समजा घर घेण्याचं ठरविलं व बिल्डरकडे गेलात तर पुण्यातील काही नामी बिल्डर्स सोडले तर बाकी सगळे सर्रासपणे फ्लॅटच्या मुळ किमतीतुन काही रक्कम ब्लॅकमधे मागतात. अशा वेळी ग्राहकाची धांदल उडते. आपण ब्लॅक मधे दिलेल्या पैशाची पावती मिळत नसल्यामूळे दिलेला पैसा पाण्यात जाईल की काय अशी भितीही असतेच. खरंतर आपण ब्लॅकचा पैसा देऊच नये पण पर्यायच नसल्यास आपला नाईलाज होतो.नाईलाजाने आपण अशा व्यवहारासाठी तयार होतो. हा काळा व्यवहार का बरं करावा लागतो? तर चला ब्लॅकचा व्यवहार समजुन घेऊ या.

समजा तुम्ही ६०० चौ. फुटाचं घर घेताय व रेट आहे ३००० प्रती चौ. फुट. या किमती प्रमाणे घराची किंमत होईल १८,००,०००/- रुपये व ईतर सगळे खर्च धरुन १९,५०,०००/- पर्यंत एकुन किंमत होते असे गृहीत धरु या. आता तुम्ही हि सगळी रक्कम म्हणजेच १९.५० लाख बिल्डरला दिलात तर त्याला या रकमेवर ३०% आयकर बसतो (खर्च व स्लॅबची अट अर्थातच लागु होईल) या १९.५० लाखात बिल्डरचा निव्वड नफा ३०% आहे असे गृहित धरल्यास ती रक्कम होते ५,८५,०००/-. या निव्वड नफ्यावर ३०% कर म्हणजेच रु. १,७५,०००/- सरकारला भरणा करावा लागतो.

हा कर वाचविण्यासाठि बिल्डर नामी यूक्ती लढवितात. तुमच्या घराची किंमत ठरली आहे १९.५० लाख त्यातील १२,००,०००/- रुपयाचा व्यवहार व्हाईटमधे करायचा.  म्हणजे खरेदी खतामधे घराची किंमत दाखविली जात १२ लाख. वरचे ७,५०,०००/- च्या व्यवहार ब्लॅकमधे (रोख) होतो. घराची नोंदणी १२ लाखात झाल्यामुळे त्याच्या ३०% नफा म्हणजे ३,६०,०००/-. या नफ्यावर ३०% कर म्हणजे रु. १,०८,०००/- भरला जातो.

अशा प्रकारे एक फ्लॅटच्या मागे बिल्डर रु. ६७,५००/- निव्वड कराचे वाचवितो. समजा ३० फ्लॅटचा (मुद्दाम लहान प्रोजेक्ट धरतोय) प्रोजेक्ट आहे. एक फ्लॅटच्या मागे ६५,७०० x ३० = २०,२५,०००/- रुपये करचोरी केली जाते. ब्लॅकमधे दिलेल्या रकमेचा हिशेब कागदोपत्री ठेवला जात नाही. तुम्हाला त्याची पावती मिळत नाही. मग अशावेळी तुम्ही तुमची स्वत:ची एक डायरी ठेवा. त्यावर दिलेल्या काळ्यापैशाची रकम लिहुन बिल्डरची सही घ्या. तुम्ही काळापैसा एक रकमी चुकता केला असला तरी आपल्या डायरीत नोंद करुन सही घ्यावी. म्हणजे पुढे वादावादीची वेळ येणार नाही.

खरेदी खतात दाखविलेल्या कमी किमतीमुळे घर विकताना अडचण येते का?
नाही... मुळीच नाही.

काही ग्राहकाना असा प्रश्न पडतो की मी आज जो फ्लॅट विकत घेत आहे त्याचा बाजारभाव १९.५० लाख होता, पण खरेदी खतात तर १२ लाखच दाखविला आहे. मग उदया मला हा फ्लॅट विकायचा झाल्यास लोकं १२ लाख बघुन फार फार तर १५ लाखात मागतील अशी भिती असते. पण ते तसं नसतं, तुमची खरेदी किंमत काहिही असु दया. जेंव्हा केंव्हा तुम्ही हा फ्लॅट विकायला काढणार तेंव्हा त्या भागात जो काही बाजारभाव असेल तोच भाव तुमच्या घराला मिळेल. तुमच्या खरेदी खतात असलेली किंमत मुळीच ग्राह्य धरल्या जात नाही. विकते वेळी बाजारभावानीच विकल्या जाईल.

->"The deal of black and white. ब्लॅक आणि व्हाईटचा व्यवहार "

Post a Comment