बिनशेती मोजणी



Non-agricultural counting
बिनशेती मोजणी

एखादया जमिन धारकास त्याच्या जमिनीची अकृषिक प्रयोजनासाठी वापर करणेचा असलेस महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ कलम ४४ अन्वये महसूल विभागीची परवानगी घेऊन वापर सुरु करण्याची प्रयोजन असून त्यामध्ये संबंधित धारकांने मोजणी करुन घेणेची शर्त नमुद केलेली असते.


बिनशेती / एन.ए. / अकृषीकसाठी मोजणी :-

त्यानुसार एक महिन्याचे आत मोजणी करुन घेण्याचे बंधन संबंधित धारकांस घालण्यात आलेले आहे.अशा धारकांने या खात्याकडे बिनशेती आदेशासह मोजणी अर्ज करणे आवश्यक आहे.संबंधित धारकाने मा.जमाबंदी आयुक्त,पुणे यांचेकडुन परिपत्रक क्रमांक भूमापन ३/ मोजणी फी /प्र.क्र २५५/२०१० दिनांक ०६/०२/२०१० अन्वये प्रचलित केलेल्या मोजणी फी दराने नियमित/तातडी/अतितातडी दराने मोजणी फी आकारणी करुन भरणा करुन घेणेत येतो. तद् नंतर मोजणी प्रकरण प्राप्त झालेनंतर संबंधित नोंदवहित नोंदी घेऊन प्रकरण मोजणीसाठी भूकरमापक यांचेकडे देण्यात येते.भूकरमापक यांनी मोजणी कामाची प्रचलित कार्यपध्दती नुसार पूर्तता करुन सर्व प्रकरण कार्यालयात जमा करतात.सदरचे प्रकरणाची छाननी करुन प्रकरण दुरुस्ती कडे वर्ग करुन त्यामध्ये कमी-जास्त पत्रक तयार करुन ते गाव वहिवाटीस रवाना केले जाते.

एन.ए अकृषीकसाठी मोजणी

अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांचा तपशील:-

अ) मोजणीसाठी लागणारे ७/१२ चा उतारा

ब) मोजणी करावयाच्या जमिनीच्या गटबुक नकाशाची झेरॉक्स प्रत.

क) लगतच्या कब्जेदारांची नांवे व पत्ते

ड) मोजणी फी भरलेले चलन.

इ) अर्जदाराच्या नांवे कब्जेदारांनी दिलेले सम्मती पत्र

वरील कागदपत्रांची पूर्तता होऊन प्रकरण तालुका निरीक्षक भूमी अभिलेख करायच्यात प्राप्त झालेनंतर नियमित हद्द कायम मोजणी प्रकरणाबाबत करावयाच्या कार्यपद्धतीनुसार मोजणी करावयाचे आहे. मात्र बिनशेती मोजणी प्रकरणामध्ये मोजणी काम १:५००० या परिमाणात आहे.

सदर छाननीमध्ये खालील बाबी तपासाव्यात :-

१. या बाबतीत निमितदारने सर्व्हे नंबर/गटनंबर /पोटहिस्सा मोजणी क्राऊन त्यावर टिपण /फाळणी कायम हद्दीचा आधार घेऊन वाहवाटीनुसार बसविलीया आहे काय?

२. सक्षम महसुली अधिकाऱ्याने जेवढ्या क्षेत्रास बिनशेती वापराची परवानगी दिली आहे त्यानुसार मोजणी केले आहे काय? जर मोजणी व बिनशेती जागेवरील सीमांकन यात क्षेत्राची तफावत आढळली तर त्यानुसार अकृषिक वापराखालील क्षेत्रानुसार बिनशेती आदेश दुरुस्तीसाठी प्रस्ताव महसूल अधिकारी यांचेकडे पाठवावे.

३. मोजणी नकाशा अकृषिक वापराखाली क्षेत्र रंगाच्या पेन्सिलने दाखवून त्याबाबतची टिप क्षेत्रासह खुलासा टीपीमध्ये नमूद केली आहे काय?
उर्वरित परिनिरिक्षणाचे काम हद्द कायम मोजणी प्रकरणाप्रमाणे करणेचे आहे.

मोजणी प्रकरण वरील प्रमाणे पडताळणी अँटी तालुका निरीक्षक भूमी अभिलेख यांचे स्वाक्षरीने निकाली काढावे. तदनंतर सदरचे मोजणी प्रकरण कमी जास्त पात्रक तयार करणेसाठी दुरुस्ती रजिस्टारमध्ये नोंदवावे व त्यास दुरुस्ती रजिस्टर क्रमांक देण्यात यावा. त्यानंतर ते प्रकरण कमी जास्त पत्रक करणेसाठी भूकरमापक / संबंधित लिपिकाकडे सुपूर्त करावे. कमी जास्त पत्रक करताना अकार्बनडातील लागवडी लायक क्षेत्र कमी होईल व खराब्याखालील क्षेत्र वाढेल व साठ्यामधील ग्राम नकाशाच्या प्रतीत खालील क्षेत्रानुसार तांबड्या शाईने दुरुस्ती करावी. कमी जास्त पत्रक नकाशा ट्रेसिंग सह तहसीलदार यांचे मार्फत गाव वहिवाटीची तलाठ्याकडे पाठवावे. तलाठ्यांनी त्यांचेकडील ग्राम नकाशात ट्रेसिंग नकाशाप्रमाणे दुरुस्ती तांबड्या शाईने करावी व तसा शेरा ग्राम नकाशावर ठेवावा.

बिनशेती मोजणी प्रकरणात काही प्रश्न :-

१. बिनशेती मोजणी प्रकरणात कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते ?

-बिनशेती मोजणी प्रकरणात सक्षम प्राधिकाऱ्याचे बिनशेती आदेश, मंजुर अभिन्यासाची मूळ प्रत(लेआऊट), चालू तीन महातील 7/12, चतु:सीमेप्रमाणे सहकब्जेदार/ लगत कब्जेदार यांची नावे व पत्ते, मोजणी फी चे मूळ चलन इ. कागदपत्रांची आवश्यक्ता असते.

२. बिनशेती मोजणी कधी करता येते ?

- एखाद्या जमिनधारकास त्यांच्या जमिनीची अकृषीक प्रयोजनासाठी वापर करावयाचा असलेस महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 कलम 44 अन्वये महसुल विभागाची परवानगी घेऊन कोणत्या प्रयोजनासाठी जमिनीचा वापर करावयाचा आहे. त्यानुसार धारकास मोजणी करणे कामी शर्त घातली जाते व तसे आदेशात नमुद केले जाते.

३. बिनशेती परवानगी बाबत भूमि अभिलेख विभागाने कोणती कार्यवाही करावयाची असते ?

- संबंधित भूखंडाची बिनशेती परवानगी घेण्यापूर्वी व अभिन्यांस मंजुर झालेनंतर भूमि अभिलेख विभागाकडून मोजणी करुन घेणे आवश्यक असते.

४. बिनशेती मोजणी फी आकारणी कशी केली जाते ?

- बिनशेती मोजणी फी अतितातडी/ तातडी /साधी या प्रकारे आकरणी करुन चलनाने बँकेत (र.रु.3000/- च्या पुढे) अथवा कार्यालयात रोख पावतीने(र.रु.3000/- चे आत) फी असल्यास भरणा केली जाते.

५. अकृषिक दाखला (N.A.) परवानगी मिळणेसाठी कोणती पद्धती अवलंबविण्यात येते?

-अर्जदाराने अकृषिक परवानगी सेलमध्ये अर्ज केल्यावर सेल ती कागदपत्रे महसुल विभागाकडे पाठवुन त्यांच्याकडुन भोगवटा वर्ग -१ बाबत नाहरकत दाखला आणि भोगवटा वर्ग-२ बाबत विनिश्चिती प्राप्त करुन त्यानंतर सदरचा सेल अर्जदारास वरील दाखला व सेलचा अभिप्राय सुपुर्द करतो. त्यानंतर अर्जदार सदरील कागदपत्रे बांधकाम परवानगीचे वेळेस दाखल करत असतो. बांधकाम परवानगी दिली म्हणजे अकृषिक वापर चालु झाला असे समजण्यात येते.


SHARE THIS

->"बिनशेती मोजणी"

Search engine name