सौंदर्यप्रसाधन क्षेत्रातील ‘पॉवर’फुल उद्योजिका ‘Powerful Entrepreneur in the Cosmetics Sector’

 सौंदर्यप्रसाधन क्षेत्रातील ‘पॉवर’फुल उद्योजिका 

👉 प्रत्येक स्त्रीमध्ये एक अद्भुत शक्ती आहे. तिच्याशिवाय हे जग अपूर्ण आहे. ती आई, बहीण, पत्नी, मुलगी बनून नात्यांना परिपूर्ण बनवते. तिच्या त्यागाचे वर्णन करण्यासाठी शब्ददेखील अपुरे पडतील. अशा अनेक स्त्रिया आहेत, ज्यांनी आपल्या कुटुंबासाठी, आपल्या जवळच्या माणसांसाठी आपल्या आवडी-निवडीचा, इच्छा-आकांक्षाचा त्याग केला. त्यामुळेच ते कुटुंब, समाज प्रगती करू शकला. आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे. तिने स्वत:चं स्थान निर्माण केलेलं आहे. ‘ती’सुद्धा अशीच शून्यातून वर आलेली. आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिलेली. मात्र, अपयशावर मात करत ती पुढे जात राहिली आणि आज सौंदर्यक्षेत्रातील एक स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. ‘ती’ म्हणजे ‘फेम ब्युटी सलॉन स्पा अ‍ॅॅण्ड अकादमी’ची संचालिका शर्मिला पवार-प्रजापती.

👉शर्मिलाचा पिंड तसा सौंदर्यक्षेत्रात येण्याचा नव्हताच मुळी. वडील महादेव पवार हे पोस्टात होते, तर आई शोभा पवार एका छोट्या ‘गारमेंट कंपनी’त कामाला जायच्या. तीन मुली आणि एक मुलगा त्याचसोबत महादेव पवारांचे आई-बाबा असा आठजणांचा प्रपंच होता. सातार्‍यातील वेळे कामठी गावातील हे पवार कुटुंब वरळीच्या ‘बीडीडी’ चाळीत स्थिरावले. तेथील संस्कृतीत वाढले. शर्मिला भावंडांमध्ये सगळ्यात लहान. विशेषत: आजोबांची लाडकी. पहिली ते दहावीचे शिक्षण तिचे ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बृहन्मुंबई महानगरपालिका शाळे’त झाले. पुढे फोर्टमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच निर्माण केलेल्या ‘सिद्धार्थ महाविद्यालया’त शर्मिला शिकली. वाणिज्य शाखेच्या पदवीच्या शेवटच्या वर्षांत शिकत असतानाच शर्मिलाच्या बाबांचे, महादेव पवारांचे निधन झाले. शर्मिलाचे जणू काही आकाशच हरवून गेले. त्यावर्षी तिने अंतिम वर्षाची परीक्षा दिली नाही. 

👉शर्मिलाच्या बहिणीने शर्मिलाला त्या वर्षी एका संस्थेमध्ये सौंदर्यप्रसाधन अभ्यासक्रमाच्या पदविकेसाठी प्रवेश मिळवून दिला. संस्था नावाजलेली होती. शर्मिलाने मन लावून तो एका वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. हातात सौंदर्यप्रसाधन विषयाची पदविका आली. प्रात्यक्षिक अनुभव घेण्यासाठी तिने चेंबूरमधल्या ब्युटीपार्लरमध्ये तीन महिने काम केले. दरम्यान, शिकत असतानाच तिने बी.कॉमची परीक्षा दिली. २००० मध्ये शर्मिला बी.कॉम झाली. शर्मिलाचा मोठा भाऊ, नितीन याचा ‘लेबर सप्लाय’चा व्यवसाय होता. परळमध्ये त्याचे कार्यालय होते. या कार्यालयाच्या अर्ध्या भागात शर्मिलाने आपला सौंदर्यप्रसाधनाचा व्यवसाय सुरू केला. मात्र, भावाच्या कार्यालयात पुरुषांची सतत ये-जा असायची. त्यामुळे शर्मिलाच्या ब्युटीपार्लरमध्ये येण्यासाठी महिला टाळाटाळ करु लागल्या. परिणामी, एका वर्षात शर्मिलाला आपल्या व्यवसायाचा गाशा गुंडाळावा लागला.

👉शर्मिलाने मग दादाच्या कार्यालयात काम करण्यास सुरुवात केली. ‘अकाऊंट’ आणि ‘बॅक ऑफिस’ ती सांभाळू लागली. तीन वर्षे तिने तिथे काम केले. याच दरम्यान शर्मिलाचे कुटुंब कल्याणमध्ये स्थलांतरित झाले होते. कल्याणची सौंदर्यप्रसाधनांची बाजारपेठ तशी नवीनच होती. मुंबईच्या मानाने इथल्या जागांचे भावसुद्धा कमी होते. त्यामुळे शर्मिलाने कल्याणमध्ये ब्युटी पार्लर सुरू केले. प्रतिसाद चांगला होता. शर्मिलाला ज्ञानाच्या बाबतीत अद्ययावत राहणे आवडते. सौंदर्यप्रसाधन क्षेत्रात केसांसंबंधी एक आधुनिक कोर्स मुंबईच्या एका संस्थेत शिकवण्यात येतो, ज्याचे शिकवणी शुल्क २० हजार रुपये आहे. शर्मिलाला हे कळल्यावर हा कोर्स शिकण्याचे तिने मनाशी निश्चित केले. मात्र, २००४ च्या काळात २० हजार रुपये ही रक्कमसुद्धा मोठी होती. ही रक्कम जमा करण्यासाठी शर्मिला पुन्हा नोकरी करू लागली. एका कंपनीत तिने तीन वर्षे ‘अकाऊंटंट’चे काम करण्यास सुरुवात केली. पगार होता फक्त तीन हजार रुपये. कंपनीची जबाबदारी वाढत गेली. तीन वर्षे कशी निघून गेली कळलंच नाही. आपल्याला व्यवसाय करायचे आहे, याचे तिला भान होते. तिने नोकरीचा राजीनामा दिला. नोकरी सोडली तेव्हा तिला २४ हजार रुपये पगार होता.

👉एव्हाना त्या कोर्सची किंमत ५० हजार रुपये झाली होती. त्यामुळे तो कोर्स करायचे राहून गेले. यानंतर कल्याण येथील खासगी कंपनी दोन वर्षे तिने ‘अकाऊंटंट’ची नोकरी केली आणि आणखी दोन वर्षे सीप्झमधल्या एका हिरे कंपनीमध्ये नोकरी केली. २०१३ च्या फेब्रुवारी महिन्यात तिने ‘फेम ब्युटी सलॉन’ सुरु केले. मात्र, यावेळी तिने बाजारपेठेचा बारकाईने अभ्यास केला. नाव देण्यापासून पार्लरमध्ये कुठल्या वस्तू कुठे ठेवायच्या इथपर्यंत सगळ्या गोष्टींचा तिने अभ्यास केला. उत्तम दर्जेदार सेवा यामुळे अल्पावधीत ‘फेम ब्युटी सलॉन’ लोकप्रिय झाले. २०१६ मध्ये, तर सहा विविध ठिकाणी ‘फेम’च्या शाखांचा प्रवास सुरू झाला होता. कल्याणमध्ये दोन स्वत:ची ब्युटी पार्लर, तर दोन भागीदार तत्त्वावर. ठाण्यामध्ये एक शाखा सुरू झाली, पण काही तांत्रिक कारणास्तव ती बंद झाली. काही कारणामुळे गोरेगावला ‘फेम’ची शाखा चालू होऊ शकली नाही. पुढे कल्याणच्या खडकपाडाची शाखासुद्धा बंद झाली. भागीदारी तत्त्वावर सुरु झालेल्या शाखेचा करार वर्षभराच्या कालमर्यादेनंतर संपुष्टात आला.

 👉याच काळात एका व्यावसायिक बैठकीस जात असताना शर्मिलाच्या गाडीला अपघात झाला. तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तिचे दोन व्यावसायिक मित्रदेखील जखमी झाले. निव्वळ ‘दैव बलवत्तर’ म्हणून त्या अपघातातून ते बचावले. वैद्यकीय विश्रांतीसाठी शर्मिलाला व्यावसायिक विश्रांती घ्यावी लागली. विश्रांतीनंतर शर्मिलाने नव्या जोमाने सुरुवात केली. टिळक चौकातील ब्युटीपार्लर सुरुच राहिले. सोबतच तिने ‘फ्रिलान्सिंग’ कामेसुद्धा सुरू केली. सौंदर्यप्रसाधनाच्या काही सेवा ती घरपोच देऊ लागली. या सगळ्या माध्यमातून ती ५० मुलींना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रोजगार देऊ लागली.

👉‘पंतप्रधान कौशल्य विकास योजने’अंतर्गत तिने ४०० हून अधिक विद्यार्थ्यांना सौंदर्यप्रसाधनाचे धडे दिलेले आहेत, तर ‘महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रा’च्या माध्यमातून शर्मिलाने ६० विद्यार्थ्यांना उद्योजकीय प्रशिक्षण दिले आहे. नुकताच तिने ‘इंटरनॅशनल मेकअप कोर्स’ केला. कार्यक्रम व्यवस्थापन क्षेत्रात अग्रेसर असणार्‍या दीपक प्रजापती या उद्योजक तरुणासोबत तिचा विवाह झाला. एका गुजराती कुटुंबात ही मराठमोळी मुलगी सून म्हणून वावरत आहे. तिच्या पुढच्या उद्योजकीय वाटचालीस तिच्या सासरची मंडळी पाठबळ देत आहेत, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. भारतात आणि परदेशात ‘फेम ब्युटी पार्लर’ आणि अकादमीच्या शाखा वाढविण्याचे स्वप्न शर्मिलाला पूर्ण करायचे आहे. त्याचप्रमाणे भारतातील महिलांना सौंदर्यप्रसाधनाचे आणि संबंधित व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा तिचा मानस आहे. “आईने वेळोवेळी मानसिक आधार दिला, भावंडे पाठीशी खंबीरपणे उभी राहिली म्हणून एवढी व्यावसायिक मजल मारु शकले,” असे शर्मिला प्रांजळपणे नमूद करते.

👉यश हे माणसाला सुखावणारे असते, तर अपयश हे शिकवणारे असते. शर्मिला पवार हिने सुखावण्याचा आणि शिकण्याचा दोहोंचा अनुभव घेतला आहे. या अनुभवामुळेच ती भविष्यात सौंदर्यप्रसाधन क्षेत्रातील आघाडीच्या उद्योजिका होईल, याची खात्री वाटते.

🎯 व्यवसाय साक्षर व्हा.....

🎯 उद्योजक बना.......

->"सौंदर्यप्रसाधन क्षेत्रातील ‘पॉवर’फुल उद्योजिका ‘Powerful Entrepreneur in the Cosmetics Sector’"

Post a Comment