❤️ *प्रत्येक पालकास विनम्र निवेदन* ❤️🙏🏻
ताज्या तवाण्या दहा वर्षांच्या विद्यार्थ्यांचे जेंव्हा हार्ट ॲटक ने निधन झालं तेंव्हा डॉ.नी दिलेल्या सुचना
१) बालकांची सकाळपर्यंत झोप पूर्ण होऊ द्या.
२) सकाळी अल्पोपहार दिल्या शिवाय शाळेत पाठवु नका.
३) दप्तराचे वजन बालकांच्या वजनापेक्षा जास्त वजन नसेल याची काळजी घ्या.
४) घरचा अभ्यास पुर्ण करण्यासाठी जबरदस्तीकरु नका योग्य पध्दतीने अभ्यास पुर्ण करुन घ्या.
५) बालकांना शिळे अन्न देऊ नका.
६) शाळेतुन आल्याबरोबर जेवणाचा आग्रह करु नका.त्याला घरच्या वातावरणात मिसळु द्या.
७) बालकांना आराम केल्यावर होमवर्क करण्यास सांगा.
८)त्याला विश्वासात घेऊन त्यांच्याशी संवाद साधा.
९) त्यांच्या आवडीनिवडी छंद विषयावर बोला.
१०)गोडी गुलामीने त्यांच्याशी थोडावेळ घालवा.
११)त्यांचे छंद जोपासा अती लाड करु नका.
१३) बौध्दिक विकासा बरोबर शारिरीक विकास होण्यासाठी खेळण्यासाठी वेळ द्या.
१४) बाहेरील पदार्थांपेक्षा घरच्या पदार्थांची सवय लावा.
१५)बाल मनाची पायमल्ली करु नका.
आपणं ४/५वर्षाच्या *कोवळ्या बालकांनामध्ये थेट कलेक्टर, डॉक्टर, इंजिनिअर IPS,IIT,IIM पाहु नका* .
आपणं अगोदर हे पहा कि आपण स्वतः कितव्या वर्षी शाळेत गेलो? काय शिकलो? आपल्या दप्तराचे ओझे किती होते? आपणांस प्रगत साधने किती होती?
विकसित तंत्रज्ञान नसतांना आपण शिकलोच ना? मग का विनाकारण आपणच आपल्या कोवळ्या बालकांच्या मागे हात धुवून लागाता?
उगीचच आपण त्यांच्या बालमनाची पायमल्ली करून स्पर्धेत ढकलता.आपण त्यांचे बालपण हिरावून घेवून त्यांचा घात करतो असं नाही कां वाटत? विचार करा कोणत्याही गोष्टीसाठी मर्यादा आहेत परिपक्व झाल्या शिवाय झाडाचं पानही गळत नाही,फळ ही तुटत नाही.आणी परिपूर्ण पोषण झाल्या शिवाय जन्माला ही येत नाही.
मग हा खोटा स्पर्धेचा हव्यास का करावा. ह्या सर्व गोष्टींचा विचार करणं अत्यंत गरजेचं आणि आवश्यक आहे.
बालकाचा विकास हा मानसशास्त्रीय दृष्टीने वेळेवरच होतो. आणि अघोरी प्रयत्न केला च तर त्याचे दुष्परिणामही होतात.
मग हे सारं समजत असुन सुद्धा जर आपण बालकांना दबावाखाली आणुन घडविण्याच्या नादात कुठेतरी आतातायी पणा करतो असं होईल . आणि अपेक्षा पुर्ण होण्या ऐवजी उपेक्षा पदरी पडेल.
म्हणून बालकांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करुन त्यांचा सर्वांगीण विकासासाठी थोडी सुरक्षितता बाळग वागा . म्हणजे सर्वांगीण विकसीत गुणवत्ता प्राप्त होइल.
->"प्रत्येक पालकास विनम्र निवेदन A Humble Note to Every Parent"