शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करताना दोन भावना जागृत असतात...
१) भीती
२) लोभी वृत्ती ( लालच)
मित्रांनो कायम लक्षात ठेवा...
मार्केट मध्ये तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करायच्या हजारो संधी आहेत पण तुमचा लोभ ,अवास्तव अपेक्षा या मार्केट मधून कधिच पूर्ण नाही होऊ शकत.....
शेअर मार्केट मध्ये बरेच लोक का नुकसान का करतात??
१) धेयनिश्चिती नसणे (GOAL SETTING)
जर आपल्याला कुठे जायचे आहे,कोणत्या रस्ताने जायचं आहे ,कुठे जाऊन थांबायचं आहे..
आपल्या प्रवासात कुठे अडथळे येणार आहेत याचा अभ्यास नसेल तर तुमचा प्रवास कधीच सुखद होणार नाही...
त्याचप्रमाणे ट्रेडिंग करताना आपल्याला दररोज किती फायदा कमवायचा आहे....
मी दररोज जास्तीत जास्त किती तोटा सहन करू शकतो....
या सर्व गोष्टींचा अभ्यास न करता ट्रेड केला तर तोटाच होणार ना....
एखादे दिवशी मार्केट मध्ये संधी नसल्यामुळे ट्रेड नाहीं केला तर तो पण एक फायदेशीर ट्रेड केल्यासारखं च आहे....
२) धेयनिश्चिती करून सुद्धा अधिकची हाव केल्यामुळे तोटा होतो ....
बऱ्याचवेळा तुम्हाला जाणवलं असेल ...
मार्केट च्या पहिल्या सत्रात बरेच लोक profit मध्ये असतात...
पण दुपारनंतर ट्रेडिंग न थांबवल्यामुळे आहे तो profit जाऊन मोठा तोटा होतो... त्यामूळे समाधान मानण्यात आहे...
मार्केट मध्ये प्रत्येक क्षणाला संधी तयार होत असते पण तुमचं daily target पूर्ण झालं असेल तर ती संधी सोडून देण्यात च खरा फायदा असतो...
३) लोभी वृत्ती टाळा -
आजपर्यंत मार्केट मध्ये ज्या ज्या लोकांनी मोठा तोटा केलाय.. त्यांच्या मध्ये एकच गुण दिसून येतो.. अतिहाव.. अतिलोभी वृत्ती.. अशी लोक सतत ट्रेडिंग करत असतात..
कुठे थांबायचं त्यांना समजत नाही.. संधी जरी नसली तरी काही ना काही करून त्यांना ट्रेड करायचाच असतो..
एक लक्षात ठेवा शेअर मार्केट हा पैशांचा अथांग समुद्र आहे पण एकाच वेळी हा समुद्र तुम्ही तुमच्या घरी नाही घेऊन जाऊ शकत.. रोज थोडं थोडं कमवून संयमाने ट्रेडिंग करणाराच हे युद्ध सहज जिंकतो..
तर मित्रानो या 3 गोष्टी लक्षात ठेवा मगच ट्रेडिंग करा.
कायम फायद्यात रहाल
->"शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करताना Trading in the share Market"