व्यवसायाचे ८ मुख्य प्रकार Types Of Business


📈 *व्यवसायाचे ८ मुख्य प्रकार* 

व्यवसाय सुरु करताना नेमका कोणत्या प्रकारचा व्यवसाय सुरु करावा ? असा प्रश्न आपल्याला असतो.

Business च  Registration करताना देखील आपल्याला आपल्या  Business चा प्रकार निवडावा लागतो आणि जर तुम्ही एक व्यवसाय करत असाल किंवा तुम्ही एखादा व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात  असाल तर या काही Basic गोष्टी तुम्हाला माहित असं गरजेचं आहे.

Business चे तसे अनेक Types आहेत पण त्यातील ८ प्रकार हे मुख्य प्रकार आहे. तुमच्या आसपास असलेले जे काही छोटे मोठे व्यवसाय असतील ते Generally याच Business Types मध्ये मोडतात.

 *Individual व्यावसायिकांसाठी व्यवसायाचे प्रकार* 

तुम्ही जर एकट्याने व्यवसाय सुरु करत असाल तर या दोन प्रकारचा व्यवसाय तुम्ही सुरु करू शकता

 *1. Sole Proprietorship ( एकमेव मालकी )* 

Sole Proprietorship हा व्यवसायाचा एक असा प्रकार आहे ज्यामध्ये एक व्यक्ती किंवा Single Individual व्यवसायाचा मालक किंवा Owner असतो.  Sole Proprietorship ला Individual Entrepreneurship असेही म्हणतात.

Sole Proprietorship मध्ये, व्यवसाय आणि त्या व्यवसायाचा मालक या दोघांनाही समान मानले जाते. जेव्हा व्यवसायाच्या मालकाचा मृत्यू होतो तेव्हा व्यवसायाचा देखील मृत्यू होतो असं कायद्याने मानलं जात.

आपण व्यवसायाचा मालक आणि व्यवसाय या दोन्ही मध्ये फरक करू शकत नाही. हे दोघे एकच मानले जातात.

Sole Proprietorship हा सर्वात सोपा आणि लोकप्रिय व्यवसायाचा प्रकार आहे. या प्रकारचा Business तुम्ही अगदी सहजतेने सुरू करू शकता.

व्यवसायाचा मालक एक असतो  म्हणजे असं काही नाही कि तुम्हाला एकट्यालाच काम करावं लागत तुम्ही इतर लोकांना देखील कामावर ठेऊ शकता.

या प्रकारच्या व्यवसायामध्ये व्यवसायाच्या सर्व मालमत्ता या व्यवसायाच्या मालकाच्या असतात.

व्यवसायाचा मालक त्याच्या व्यवसायाला स्वत: च नाव देऊ शकतो जसे कि रमेश, सुरेश, राम, शाम किंवा तो त्याच्या व्यवसायाला इतरही एखाद Brandable नाव शकतो जसे कि Amazon, Apple, Microsoft

तुम्ही जर एकट्याने व्यवसाय सुरू करत असल्यास तुमच्यासाठी हा व्यवसायाचा प्रकार सर्वोत्तम आहे.

Sole Proprietor म्हणून व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही कायदेशीर औपचारिकतेची आवश्यक नसते. Sole Proprietorship साठी कोणत्याही प्रकारचा स्वतंत्र कायदा देखील नाही.

कोणताही Business सुरु करताना तुम्हाला त्याच Registration करावं लागत.  परंतु तुम्ही जर भारतात  Sole Proprietor  म्हणून काम करत असाल तर तुम्हाला तुमचा व्यवसाय नोंदवण्याचीही देखील गरज नाही.

परंतु तुमच्या व्यवसायानुसार किंवा तुम्हीं भारतातील कोणत्या राज्यात व्यवसाय करता त्यानुसार तुम्हाला काही Licenses ची आवश्यकता भासू शकते जसे कि Shop Act license किंवा Food license.


 *Sole Proprietorship या प्रकारच्या व्यवसायाचे फायदे :* 


·         व्यवसाय सुरू करणेअतिशय सोपे असते.

·         तुम्ही लवकरात लवकर तुमचा व्यवसाय सुरू करू शकता.

·         व्यवसायाच्या मालकाचे व्यवसायावर संपूर्ण नियंत्रण असते.

·         निर्णय घेणे अतिशय सोपे असते.

·         व्यवसायाचा संपूर्ण नफा हा त्या व्यवसायाच्या मालकाचा असतो.

·         भविष्यात तुम्ही तुमच्या व्यवसायाचा प्रकार सहजपणे बदलू शकता.

·         व्यवसाय सुरू करण्यासाठी Registration करण्याची आवश्यकता नसते.

 Sole Proprietorship या प्रकारच्या व्यवसायाचे तोटे :

·         व्यवसायावरही सर्व कर्ज आणि तोटे यासाठी व्यवसायाचा मालक हा एकटा जबाबदार असतो.

·         नवीन विचार आणि नवीन Ideas चा अभाव असतो.

·         तुम्हाला जर तुमच्या Business साठी निधी उभा करायचा असेल तर ते अवघड असत.

·         एकच व्यक्ती Business सुरु करत असल्याने Business साठी जे Resources लागतात, जे भांडवल लागलं ते अतिशय Limited असत.

·         व्यवसाय पूर्णपणे व्यवसायाच्या मालकावर अवलंबून असतो.

·         व्यवसाय Scale करणं हे कठीण असत.

 *2. One Person Company ( एक व्यक्ति कंपनी )* 


One Person Company हा Business चा एक नवीन प्रकार Company Act 2013 मध्ये Introduce केला गेला आहे.

हा प्रकार Single व्यावसायिकांसाठी आहे. तुम्हाला जर एकट्याला Business सुरु करायचा असेल तर Sole Proprietorship प्रमाणेच हा अजून एक प्रकार आहे ज्याचा तुम्ही विचार करू शकता. 

Sole Proprietorship च्या तुलनेत याचा एक मोठा फायदा असा आहे कि या प्रकारात तुमची Liability लिमिटेड ( मर्यादित जबाबदारी ) असते म्हणजे व्यवसायाच्या कर्जासाठी आणि नुकसानीसाठी व्यावसायाचा मालक हा  वैयक्तिकरित्या जबाबदार नसतो. 

या प्रकारची कंपनी सुरु करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या Minimum सदस्यांची गरज नसते.  एकटा व्यक्ती देखील One Person Company सुरु करू शकतो. 

 *One Person Company या प्रकारच्या व्यवसायाचे फायदे :* 

·         कंपनी सुरू करणे सोपे असते. 

·         मर्यादित जबाबदारी असते. 

·         एक व्यक्ती देखील कंपनी सुरू करू शकतो. 

·         कंपनीवर मालकाचे पूर्ण नियंत्रण असते. 

·         निर्णय घेणे सोपे असते.

 *One Person Company या प्रकारच्या व्यवसायाचे तोटे :* 

·         One person company सुरु करणं हे Sole Proprietorship च्या तुलनेत थोडं खर्चिक असत.

·         Tax Benefits कमी मिळतात. 

·         व्यवसायाचे ऑडिट करावे लागते.

·         Equity Fund उभारणे शक्य नाही.


 


*Partnership मध्ये व्यवसाय सुरु करण्यासाठी व्यवसायांचे प्रकार* 


जर तुम्हाला Partnership मध्ये व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्ही या दोन Types चा Business सुरु करू शकता.

 *1. General Partnership ( सामान्य भागीदारी )* 

General Partnership किंवा सामान्य भागीदारी हा व्यवसायाचा एक प्रकार आहे ज्यात दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊन व्यवसाय सुरू करतात आणि तो व्यवसाय चालवतात. 

या प्रकारच्या व्यवसायात व्यवसायामध्ये नेहमीच दोन किंवा दोनपेक्षा अधिक मालक असतात.

General Partnership Business हा Indian Partnership Act, 1932 द्वारे नियंत्रित केला जातो.

तुमच्या General Partnership Business मध्ये कमीतकमी 2 आणि जास्तीत जास्त 20 Partners किंवा मालक असू शकतात.

केलेल्या Agreement नुसार, व्यवसायातील नफा आणि तोटा हा व्यवसायातील Partners मध्ये Share केला जातो किंवा विभागाला जातो.

भारतामध्ये General Partnership Business सुरु करण्यासाठी Registration किंवा नोंदणी करण्याची गरज नाही परंतु तरीही मी तुम्हाला Recommend करेन कि तुम्ही Registration करावं त्याच बरोबर पार्टनरशिप च Agreement किंवा करार देखील एकदम व्यवस्थित करावा.

कारण Partnership मध्ये Business करत असताना खूप साऱ्या अडचणी येतात आणि Partners मध्ये मतभेद, वाद विवाद हे होतातच.  त्यामुळे सर्व गोष्टी या Legally, करार, Agreement करूनच कराव्या.

भलेही तुमच्या Business मध्ये, तुमचे Partners हे तुमचे मित्र किंवा Family Members असतील तरीही सर्व गोष्टी या Written मध्ये Agreement करूनच कराव्या.

 *General Partnership या प्रकारच्या व्यवसायाचे फायदे :* 

·         या प्रकारचा व्यवसाय सुरू करणे खूप सोपे आहे.

·         कमी खर्चात व्यवसाय सुरू करता येतो.

·         एकत्रितपणे व्यवसाय सुरु केल्याने व्यवसाय करण्यासाठी जास्त भांडवल मिळते. 

·         सर्व काम हे भागीदारांमध्ये विभागले जाते. 

·         ऑडिट करण्याची आवश्यकता नाही

·         व्यवसायाचं Registration करण्याची गरज नाही. 

·         जोखीम, तोटा आणि कर्ज Partners मध्ये विभागले जाते.

 *General Partnership या प्रकारच्या व्यवसायाचे तोटे :* 

·         व्यवसायावरील कर्ज आणि नुकसान यासाठी व्यवसायातील Partners हे वैयक्तिकरित्या जबाबदार असतात. 

·         व्यवसायाचे वेगळे अस्तित्व नाही.

·         व्यवसायावर तुमचे पूर्ण नियंत्रण राहणार नाही.

·         निर्णय घेणे अवघड असते.

·         Partners मध्ये संघर्ष किंवा वाद होण्याची शक्यता असते.

 *2. Limited Liability Partnership ( मर्यादित दायित्व भागीदारी )* 


Limited Liability Partnership हा व्यवसायाचा एक असा प्रकार आहे ज्यात काही Partners किंवा सर्व Partners यांची Liability लिमिटेड असते म्हणजे व्यवसायावरील कर्जासाठी आणि नुकसानीसाठी Partners हे वैयक्तिकरित्या जबाबदार नसतात.

म्हणजे व्यावसायावरील कर्ज वसूल करण्यासाठी फक्त Business मधील मालमत्तेचाच वापर केला किंवा त्यासाठी फक्त तुमचा Business जबाबदार राहतो तुमची खाजगी Property हि Safe असते.

अन्य Partners मुळे निर्माण झालेल्या कर्जासाठी किंवा Liability साठी इतर पार्टनर्स हे जबाबदार नसतात.

या प्रकारच्या Partnership ला बहुतेक लोक प्राधान्य देतात कारण  General Partnership पेक्षा याचे बरेच फायदे आहेत.

या प्रकारच्या व्यवसायामध्ये कमीत कमी 2 सदस्य किंवा Partners असू शकतात. जास्तीत जास्त Partners च्या संख्येवर कोणतीही मर्यादा नाही.

या प्रकारच्या व्यवसायामध्ये व्यवसायाची मालकी Transfer केली जाऊ शकते. Limited Liability Partnership मध्ये, व्यवसाय किंवा कंपनीचे स्वतंत्र अस्तित्व असते, त्यामुळे Partners च्या बदलांमुळे किंवा त्यांच्या मृत्यूमुळे कंपनीच्या अस्तित्वावर परिणाम होत नाही.

या प्रकारचा व्यवसाय हा Limited Liability Partnership Act, 2008 नुसार नियंत्रित केला जातो. 

Partners चे सर्व अधिकार किंवा कर्तव्ये हि लेखी कराराद्वारे निश्चित केली जातात.

 *Limited Liability Partnership या प्रकारच्या व्यवसायाचे फायदे :* 

·         मर्यादित जबाबदारी ( व्यवसायावरील कर्जासाठी आणि नुकसानीसाठी Partners हे वैयक्तिकरित्या जबाबदार नसतात. )

·         या प्रकारचा व्यवसाय सुरू करणे अतिशय सोपे आहे. 

·         अतिशय कमी खर्चात व्यवसाय सुरु करू शकता. 

·         Partners च्या कमाल संख्येवर कोणतीही मर्यादा नाही

·         काम भागीदारांमध्ये विभागले जाते

·         ( Tax ) कर भरताना अनेक फायदे  मिळतात. 

·         ऑडिट करण्याची आवश्यकता नाही. 

·         जोखीम, तोटा आणि कर्ज भागीदारांमध्ये विभागले जाते.

 *Limited Liability Partnership या प्रकारच्या व्यवसायाचे तोटे :* 

·         Partners मध्ये संघर्ष किंवा वाद होण्याची शक्यता.

·         निर्णय घेणे कठीण असते कारण वेगवेगळ्या लोकांचे विचार वेगवेगळे असतात. 

·         व्यवसाय Scale करणे कठीण असते.

 *Growing Stage मध्ये असलेल्या किंवा मोठ्या Level च्या Company साठी व्यवसायाचे प्रकार* 

तुमचा व्यवसाय जर Growing Stage मध्ये असेल किंवा जर तुम्ही मोठ्या Level वर व्यवसाय ( Company )  सुरु करण्याच्या विचारात असाल तर हे दोन प्रकारचे व्यवसाय तुमच्यासाठी.


 *1. Private Limited Company ( प्राइवेट लिमिटेड कंपनी )* 

Private Limited Comapny हा प्रकार वाढत्या व्यवसायांसाठी किंवा जे Business Growing स्टेज मध्ये आहे त्यांच्यासाठी एक उत्तम प्रकार आहे.

या प्रकारच्या व्यवसायाचं Registration Company Act, 2013 नुसार केलं जात.

तुम्हाला जर तुमच्या Business साठी एक मोठा निधी उभा करायचा असेल तर त्यासाठी हा व्यवसायाचा प्रकार उत्तम आहे.

प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कमीत कमी  2 आणि जास्तीत जास्त 200 सदस्य असू शकतात. 

भारतातील बर्‍याच भागात Foreign Investment ला परवानगी आहे.

Private Limited Company त  कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 200 Share Holders असू शकतात. Share होल्डर्स आणि Company चे मालक या दोन्ही गोष्टी एकाच आहे.

 *Private Limited Company या प्रकारच्या व्यवसायाचे फायदे :* 

·         मर्यादित जबाबदारी ( व्यवसायावरील कर्जासाठी आणि नुकसानीसाठी Share Holders हे वैयक्तिकरित्या जबाबदार नसतात. )

·         Private Limited Company हि General Partnership आणि Limited Liability Partnership पेक्षा अधिक विश्वासार्ह मानली जाते.

·         प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे स्वतंत्र अस्तित्व असते.

·         निधी ( Fund ) उभा करण्यासाठी हा व्यवसायाचा प्रकार उपयोगी ठरतो.

·         कंपनी Scale करणं सोपं असत. 

 *Private Limited Company या प्रकारच्या व्यवसायाचे तोटे :* 

·         जास्तीत जास्त सदस्यांच्या संख्येवर मर्यादा असते. 

·         Tax Benefits फार कमी असतात.

·         कंपनीचे शेअर्स सार्वजनिकपणे सादर केले जाऊ शकत नाहीत. ( सर्वसामान्य Public ला तुम्ही तुमच्या कंपनी चे shares खरेदी करण्याचे आवाहन करू शकत नाही. 

·         Shares Transfer करण्याचे अधिकार मर्यादित असतात.


 *2. Public Limited Company ( पब्लिक लिमिटेड कंपनी )* 

एका Public Limited  कंपनीमध्ये, कंपनी चे Shares सार्वजनिकपणे सादर केले जातात. सर्वसामान्य Public देखील या Public Limited कंपन्यांचे Shares करू शकते. 

पब्लिक लिमिटेड कंपनीला शेअर बाजारामध्ये List केले जाऊ शकते किंवा त्या कंपनीला Unlisted देखील ठेवलं जाऊ शकत.

ज्या काही मोठंमोठ्या कंपन्या आहेत त्या सर्व Public Limited कंपन्या आहेत जसे कि Reliance Industries, Tata Consultancy Services, HDFC Bank Limited, Hindustan Unilever, तसेच  भारतातील  ज्या  काही  मोठमोठ्या  बँका आहे त्या  सर्व Public लिमिटेड कंपन्या आहे.

पब्लिक लिमिटेड कंपन्यांचा मालक कोणी एक व्यक्ती नसतो. कंपनी चे जे Share Holders असतात तेच कंपनी चे खरे मालक असतात. 

Public Limited कंपनी चे Registration करण्यासाठी कमीत कमी 7 सभासदांची आवश्यकता असते. या कंपनी प्रकारात जास्तीत जास्त सदस्यांच्या संख्येवर कोणतीही मर्यादा नाही.

पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये कमीतकमी 3 आणि जास्तीत जास्त 15 Directors असू शकतात.

Public Limited Company ला Company Act 2013 नुसार Register केलं जात आणि कंपनी च एक स्वतंत्र अस्तित्व असत.

तुम्हाला जर मोठं Capital Raise करायचं असेल तर या प्रकारच्या व्यवसायाचा उपयोग होतो कंपनी चे Share विकून मोठ्या प्रमाणावर पैसे उभे करता येतात.

Company Act, 2013 नुसार कंपनीच्या नावानंतर ‘Limited’ हा शब्द जोडणे बंधनकारक आहे.

पब्लिक लिमिटेड कंपनीला कंपनीचे Prospectus प्रकाशित करणे आवश्यक आहे.

 *Public Limited Company या प्रकारच्या व्यवसायाचे फायदे :* 

·         भांडवल उभारणीसाठी उपयोगी

·         मर्यादित जबाबदारी

·         मोठ्या कंपन्यांसाठी उपयोगी

·         अतिरिक्त विकास आणि विस्तारासाठी उपयोगी

·         Share होल्डर्स ची जबाबदारी मर्यादित असते. कंपनीच्या कोणत्याही कर्ज आणि तोट्यांसाठी ते वैयक्तिकरित्या जबाबदार नसतात.

·         Share Holders त्यांच्या Shares चा मुक्तपणे व्यापार करू शकतात. ते शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकतात.

 *Public Limited Company या प्रकारच्या व्यवसायाचे तोटे :* 

·         कंपनीवर पूर्ण नियंत्रण नसते. 

·         या प्रकारच्या व्यवसायासाठी अनेक नियम आणि कायदे असतात.



 *व्यवसायांचे इतर प्रकार* 
 *1. Hindu Undivided Family ( हिंदू अविभक्त कुटुंब )* 


Hindu Undivided Family हा Business चा प्रकार फक्त भारतात आढळतो. या प्रकारचा Business हा Hindu Law द्वारे नियंत्रित केला जातो.

अशा प्रकारचा Business हा हिंदू Family मधील Memebers द्वारे सुरु केला जातो आणि Operate केला जातो.

अशा प्रकारचा Business करणाऱ्या हिंदू फॅमिली मध्ये जन्म घेणार मुलं जन्मतःच या Business चा Member बनत त्याच बरोबर दत्तक घेतलेल मुलं देखील या Business च Member किंवा सदस्य बनत.

हा व्यवसाय कुटुंबातील कर्ता म्हणजे कुटुंबातील प्रमुख व्यक्ती द्वारे नियंत्रित केला जातो. कुटुंबातील सर्व व्यक्तींचा Business वर पूर्ण अधिकार असतो.

आजकाल विभक्त कुटुंब पद्धतीमुळे अशा प्रकारचे Business फार कमी होत आहे.

 *Hindu Undivided Family या प्रकारच्या व्यवसायाचे फायदे :* 

·         Business मधील सर्व नफा हा कुटुंबातच राहतो

·         घरात जन्मलेली मुलांना घरातूनच Business करण्याचं शिक्षण मिळत.

·         निर्णय घेणे खूपच सोप असत.

·         व्यवसायातील सर्व Members हे कुटुंबातील सदस्य असतात त्यामुळे Members चा एकमेकांवर विश्वास असतो.

 *Hindu Undivided Family या प्रकारच्या व्यवसायाचे तोटे :* 

·         कुटुंबाबाहेरील व्यक्तींना व्यवसायात प्रवेश मिळत नाही .

·         कामाचा सर्व ताण हा  कर्त्यावर असतो.

·         व्यवसायावर फक्त कर्त्याच नियंत्रण असत. 

·         कुटुंबातील सदस्यांमध्ये होण्याची शक्यता असते.

 *2. Co-Operative Society ( सहकारी संस्था )* 

या प्रकारच्या Business मध्ये समान फायदे आणि सामान उद्दीष्टांसाठी लोक एकत्र येऊन अशा प्रकारचा Business सुरु करतात. Co-operative society ला मराठी मध्ये सहकारी संस्था असं देखील म्हणतात.

Cooperative सोसायटी च Registration करणं हे  Co-Operative Society Act, 1912 नुसार अनिवार्य आहे.

Cooperative Society मध्ये जे व्यवसायाचे सदस्य असतात त्यांचा आर्थिक हित जपण्याचा एक समान हेतू असतो.

Cooperative Society किंवा सहकारी समिती ची स्थापना करणे हे अतिशय सोपं असत. Co-operative Society स्थापनेसाठी 10 प्रौढ व्यक्तींच्या संमतीची आवश्यकता आहे.

Cooperative Society मध्ये Shares च्या माध्यमातून भांडवल उभे केले जाते. Registration केल्यानंतर Cooperative Society ला कायदेशीर ओळख मिळते.

Cooperative Society ची काही उदाहरणे द्यायची झाली तर Consumer’s Cooperative Society, Producers Co-Operative Society, Credit Co-Operative Society, Housing Co-operative  Society.

Cooperative सोसायटी मध्ये मतदान प्रणाली असते ज्यामुळे सर्व सदस्यांचा व्यवसायावर नियंत्रण राहत.

 *Co-Operative Society या प्रकारच्या व्यवसायाचे फायदे :* 

·         व्यवसायामध्ये मतदान प्रणाली असते.

·         सदस्यांची जबाबदारी मर्यादित असते. ( सोसायटी वरील कर्ज आणि नुकसानी साठी कोणताही सदस्य वैयक्तिक रित्या जबाबदार नसतो. )

·         व्यवसायातील सर्व सदस्यांचं समान उद्दिष्ट्य असत.

·         कोणताही व्यक्ती सहकारी संस्थेचा सदस्य होऊ शकतो किंवा त्याची सदस्यता सोडू शकतो. 

·         व्यवसायाला स्वतंत्र अस्तित्व असते. ( सदस्यांच्या येण्या- जाण्याने Business च्या अस्तित्वात काहीही फरक पडत नाही. )

·         सरकारकडून मदत मिळते.

 *Co-Operative Society या प्रकारच्या व्यवसायाचे तोटे :* 

·         प्रभावी व्यवस्थापनाचा ( Management चा ) अभाव असतो.

·         Resources मर्यादित असतात.

·         सरकारचं अतिरिक्त नियंत्रण आणि हस्तक्षेप असतो.

अशा प्रकारे Business चे आठ मुख्य प्रकार आपण बघितले. प्रत्येक प्रकारच्या Business चे काही फायदे असतात तसेच काही तोटे देखील असतात.

 *तुम्ही कोणता व्यवसायाचा प्रकार निवडावा ?* 

मी तुम्हाला Recommend करेल कि जर तुम्ही एकट्याने Business सुरु करत असाल तर तुम्ही Sole Proprietorship ने सुरुवात करावी. कारण अशा प्रकारचा Business सुरु कारण हे अतिशय सोपं असत.

तुम्ही जर Partnership मध्ये Business सुरु करणार असाल तर Limited Liability Partnership हा प्रकार उत्तम आहे कारण General Partnership च्या तुलनेत त्याचे अनेक फायदे आहे.

मग जेव्हा तुमचा Business हळू हळू Grow व्हायला लागलं आणि तुमच्या Business मध्ये चांगला प्रॉफिट यायला लागलं तेव्हा तुम्ही तुमच्या business चा प्रकार बदलू शकता आणि तुमचा Business हा Private Limited Company किंवा Public Limited Company मध्ये Convert करू शकता. 

आता सगळ्यांनाच तस करण्याची काहीही गरज नसते तुम्ही कायमस्वरूपी देखील Sole Proprietor म्हणून Business चालवू शकता.

 *Conclusion* 

प्रत्येकाची गरज वेगवेगळी असते. तुम्ही तुमच्या गरजेनुसार योग्य तो व्यवसायाचा प्रकार निवडावा.

🎯 व्यवसाय साक्षर व्हा....

🎯 उद्योजक बना....

🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

SHARE THIS

->"व्यवसायाचे ८ मुख्य प्रकार Types Of Business "

Search engine name