व्यवसायासाठी सल्लागार का वापरावे? Services Business

व्यवसायासाठी सल्लागार का वापरावे?



“To get Game-Changing results, start focusing on Game-Changing thoughts.”

- रॉबिन शर्मा


सध्याच्या आर्थिक वातावरणात, खर्च कमी ठेवताना व्यवसायांना स्वबळावर उभे राहणे, व्यवसाय प्रक्रिया सक्षम करणे आणि उत्पन्न वाढवण्याचे मार्ग शोधणे महत्त्वाचे आहे. स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी व्यवसायांना खूप संघर्ष करावा लागतो, म्हणून त्यांच्या व्यवसायाचे दैनंदिन कामकाज व्यवस्थापन अत्यंत व्यस्त असते, विशेषत: लहान व्यवसायांमध्ये जेथे मालक किंवा व्यवस्थापक यांना अनेक जबाबदाऱ्या आणि भूमिका पार पाडाव्या लागतात. त्यासाठी अनुभवी सल्लागाराचे साहाय्य घेतल्यास व्यवसाय वाढण्याची क्षमता वाढते.

तर, व्यवसाय सल्लागार म्हणजे नेमके कोण असतात? व्यवसाय सल्लागार कोणीही तज्ज्ञ व्यक्ती असू शकतो. सर्टिफाईड पब्लिक अकाउंटंट (CPA), बिझनेस लॉ संबंधित कुशल वकील किंवा सेल्स व मार्केटिंग यांसारख्या व्यवसायाशी संबंधित सेवा सेवा ऑफर करणार्‍या कन्सल्टिंग कंपन्या हे सर्व व्यवसाय सल्लागार असू शकतात. व्यवसाय सल्लागारांची महत्त्वाचा फायदा म्हणजे ते व्यावसायिकांना आवश्यक कौशल्य प्रदान करू शकतात. सल्लागार नियुक्त केल्याने कंपन्यांना महागड्या तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्याऐवजी किंवा अनावश्यक कामासाठी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पैसे देण्याऐवजी केवळ त्यांना आवश्यक असलेल्या कामांसाठी पैसे खर्च करण्याची समज मिळते.

सल्लागार संस्थेसाठी महत्त्वपूर्ण मूल्ये प्रदान करतात. ते व्यवसाय वृद्धीसाठी नवीन धोरणे विकसित करण्यात किंवा बिझनेस व्यवस्थापन प्रक्रियेत मदत करू शकतात. सल्लागार विविध व्यवसाय व कॉर्पोरेट कंपन्यांसोबत काम करत असतात. इंडस्ट्रीमधील प्रत्यक्ष अनुभव पाठीशी असल्याने ते व्यवसाय वृद्धीसाठी सर्वोत्तम व सर्जनशील उपाय प्रदान करतात आणि व्यावसायिकांना "आऊट ऑफ द बॉक्स" विचार करण्यास सक्षम करतात. ते एक वस्तुनिष्ठ दृष्टिकोन प्रदान करू शकतात, त्यामुळे तुम्हाला अधिक वैविध्यपूर्ण संकल्पना निर्माण करण्याची क्षमता प्राप्त होते. सल्लागाराकडे उच्च पातळीचे व्यावसायिक कौशल्य असते. व्यवसाय सल्लागार व्यावसायिकांना उच्च कौशल्य पातळी तसेच स्ट्रॅटेजिक प्लॅन प्रदान करू शकतो.

अर्थात, व्यावसायिकांना सल्लागाराद्वारे प्रदान केलेल्या उपायांचा पाठपुरावा करणे सुरू ठेवावे. व्यवसाय जसजसा वाढत जाईल, तसतसे सल्लागाराद्वारे प्रदान केलेल्या सेवा व उपायांची अंमलबजावणी करणे अधिक किफायतशीर होऊ शकते, त्यासाठी व्यवसाय मूल्यांचे नियमित मॉनिटरिंग केले पाहिजे. पूर्ण-वेळ कर्मचारी नियुक्त केल्याने त्यांना अनुभव, विविध संस्थात्मक कर्तव्ये पार पाडण्याची क्षमता, कार्यस्थळावर पूर्णवेळ उपस्थिती आणि निश्चित वेतन यासारखे फायदे मिळतात. तथापि, बर्‍याच कंपन्यांसाठी, व्यवसाय सल्लागाराद्वारे प्रदान केलेली फ्लेक्सिबिलिटी हा व्यवसाय वृद्धी आणि महसूल वाढीसाठी सर्वात किफायतशीर आणि मौल्यवान पर्याय असू शकतो.

सल्लागार नेमण्याचे फायदे:

• कोणतेही कर, व्यवसाय समस्या नसणे 
•  स्केलेबल कॉन्ट्रॅक्ट पद्धती 
• गरज संपल्यास करार संपवणे सोपे
• स्वतंत्र सल्ला समुपदेशन संधी 
•  इंडस्ट्रीमधील अनुभवांमुले नवीन संकल्पनांची विविधता प्राप्त होते
• प्रोजेक्ट संबंधी इतर कामासाठी उपयुक्त 



🎯 व्यवसाय साक्षर व्हा.....

🎯 उद्योजक बना.....

🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

SHARE THIS

->"व्यवसायासाठी सल्लागार का वापरावे? Services Business"

Search engine name